India’s Shortest Train Route : भारतात प्रवासासाठी बहुसंख्य लोक ट्रेनचा वापर करतात. मग प्रवास लांबचा असो वा कमी अंतराचा रेल्वेचे जाळे सर्वदूर पसरल्याने लोक आरामात प्रवास करू शकतात. विशेष बाब म्हणजे रेल्वे प्रवास आरामदायी असण्यासह खिशाला परवडणारा आणि जलद आहे आणि त्यामुळे बहुसंख्य लोकांचे रोजचे जीवन भारतीय रेल्वेवर अवलंबून आहे. भारतीय रेल्वेदेखील प्रवाशांना आरामदायी प्रवासासाठी अनेक सेवा-सुविधा देण्याचा प्रयत्न करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यासाठी अनेक नव्या ट्रेन सुरू केल्या जातात; पण या गाड्यांचे भाडे त्यांच्या सुविधांवर अवलंबून असते. जर एखादी ट्रेन जास्त अंतर कापत असेल, तर तिचं भाडं जास्त असतं. अंतरानुसार हे भाडे वाढते. पण तुम्हाला माहितेय का भारतात असा एक रेल्वेमार्ग आहे, ज्यावर फक्त तीन किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रवाशांकडून तब्बल १२५५ रुपये भाडं आकारलं जातं. तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही; पण हे पूर्णत: सत्य आहे.

ट्रेनची तिकिटं मिळविण्यासाठी करावी लागते प्रतीक्षा

फक्त नऊ मिनिटांच्या या रेल्वे प्रवासाचे भाडं खूपच जास्त आहे. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे यानंतरही या मार्गावरील ट्रेनची तिकिटं मिळविण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते.

याहून विशेष म्हणजे हा सर्वांत लहान रेल्वे प्रवास महाराष्ट्रातील एका भागात सुरू आहे. होय, आपण महाराष्ट्रातील नागपूर ते अजनी या स्थानकादरम्यान धावणाऱ्या ट्रेनबद्दल बोलत आहोत. या मार्गावर अनेक गाड्या धावतात. दोन्ही स्थानकांमधील अंतर फक्त तीन किलोमीटर आहे, जे पार करण्यासाठी नऊ मिनिटांचा कालावधी लागतो.

ट्रेन दोन्ही स्थानकांवर दोन मिनिटं थांबते. या दोन्ही स्थानकांदरम्यान बुकिंगसाठी प्रतीक्षा यादी दिसते. या मार्गावर अनेक गाड्या धावत असूनही प्रतीक्षा यादी पाहून लोकही आश्चर्यचकित होत आहेत.

यात चकित करणारी गोष्ट म्हणजे या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाडीच्या तिकिटासाठी प्रवाशांना अंतराच्या तुलनेत मोठी रक्कम मोजावी लागते. बरेच लोक त्यांच्या कार्यालयात येण्या-जाण्यासाठीही या रेल्वेमार्गाचा वापर करतात. या मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्यांपैकी एक असलेल्या विदर्भ एक्स्प्रेसच्या प्रथम वर्गाच्या तिकिटासाठी तुम्हाला १२५५ रुपये मोजावे लागतात. लोक त्यांच्या सोईनुसार तिकिटांचे आरक्षण करतात. काही लोक ज्यांना दररोज प्रवास करावा लागतो, ते सामान्य दर्जाच्या तिकिटावरही प्रवास करतात.