Do You Know Everyone Roams Naked in This Village: जगभरात प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक समाज, गाव, राज्य, देश हा वेगवेगळ्या परंपरा पाळतो. जेवणाच्या, कपड्यांच्या, शिक्षणाच्या ते अगदी हक्कांच्या बाबत सर्व देशात काहीश्या फरकाने वेगवेगळे नियम आहेत. आजवर आपण संपूर्ण कपडे घालण्याचा अगदी कठोर नियम असणाऱ्या देशांविषयी खूप ऐकलं असेल पण तुम्हाला माहित आहे का जगात असे एक गाव आहे जिथे एकही व्यक्ती अंगावर एकही कपडा घालत नाही. एवढंच नव्हे तर या गावात येणाऱ्या- जाणाऱ्या पर्यटकांना सुद्धा हा नियम पाळावा लागतो. परदेशातच नव्हे तर आपल्या भारतातही असं एक गाव आहे बरं का.. नेमक्या काय कारणाने या दोन्ही ठिकाणी असा नियम पाळला जातो जाणून घेऊयात..
ब्रिटनमधील स्पीलप्लाट्ज़ या गावात कपडे न घालण्याचा नियम मागील ८५ वर्षांपासून पाळला जातो. विशेष म्हणजे हे काही दुर्लक्षित केलेले आदिवासी जमातीचे गाव नसून चक्क सुशिक्षित व श्रीमंतांचे गाव आहे. इथे आपल्या देशातील मोठ्या शहरांप्रमाणेच मोठे क्लब, स्विमिंग पूल सुद्धा आहेत. भरपूर पैसे व शिक्षण असूनही या देशात आबालवृद्धांपर्यंत कोणीही कपडे घालत नाही. अगदी महिला- पुरुष असाही भेदभाव इथे केला जात नाही.
पर्यटकांना इथे येताना पाळावा लागतो ‘हा’ नियम
१९२९ मध्ये इसुल्ट रिचर्डसन याने या गावाचा शोध लावला होता. केवळ थंडीच्या दिवसात कपडे न घालणे हे ऐच्छिक असते पण अन्यथा पर्यटकांसह सर्वांनाच हा नियम पाळावा लागतो. जेव्हा या गावातील लोक भरताच्या अन्य भागात जातात तेव्हा ते बाहेर कपडे घालून जातात पण पुन्हा गावी येताच कपडे काढून यावे लागते. आपल्या वागण्या बोलण्यात सहजता यावी यासाठी हा नियम पाळला जातो.
हे ही वाचा<< मुंबई लोकलमध्ये ‘चौथ्या सीटचा’ नियम नेमका काय आहे? कुणी विचारलं तर थेट द्या ‘हे’ उत्तर
भारतात ‘या’ गावी ५ दिवस महिला कपडे घालत नाहीत कारण..
हिमाचल प्रदेशात स्थित मणिकर्ण घाटी भागात पीणी नामक एक गाव आहे ज्यात वर्षातील ५ दिवस महिलांना विवस्त्र राहावे लागते. श्रावण महिन्यात पाच दिवसांसाठी हा नियम पाळला जातो, या पाच दिवसात महिला आपल्या घरातच राहतात पण त्यांना पुरुषांसमोर येण्याची मुभा नसते.