Lok Sabha Election 2024 : मतदार ओळखपत्र हे देशातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मतदान करण्यासाठी आणि तुमची ओळख पडताळून करण्यासाठी मतदार ओळखपत्राचा वापर केला जातो. जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक करता तेव्हा तुमच्यासाठी व्होटिंग कार्डशी संबंधित माहिती ऑनलाइन अपडेट करणे खूप सोपे होते. त्यात समजा तुमचे मतदार ओळखपत्र हरवले आहे आणि तुम्हाला ते ऑनलाइन डाउनलोड करायचे आहे (Voter ID Card Online Download), तर त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर मतदार ओळखपत्राशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे (Voter id Mobile Number linking). त्यासह मतदार ओळखपत्र ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी तुम्ही तुमचा इलेक्टोरल फोटो ओळखपत्र क्रमांक (EPIC) लक्षात असणे आवश्यक आहे.

तुम्ही तुमचा मोबाईल नंबर मतदार ओळखपत्राशी लिंक केला आहे का?

अनेक लोकांच्या बाबतीत असे घडते की, त्यांचे मतदार ओळखपत्र कुठे ना कुठे गहाळ होते आणि त्यांना कोणता मोबाईल क्रमांक मतदार ओळखपत्राशी जोडलेला (Voter ID Mobile Number Link) आहे हे आठवत नाही. त्याचबरोबर अनेक लोकांचे मोबाईल क्रमांक त्यांच्या मतदार ओळखपत्राशी लिंक केले गेलेले नाहीत. अशा वेळी मतदान ओळखपत्र मोबाईल नंबरशी लिंक (Voter ID Card Mobile Number Linked) केलेले नसेल, तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

Who Will Get First installment of 4,500 rs in Ladki Bahin Yojna?
Ladki Bahin Yojana: ‘या’ महिलांना मिळणार ४,५०० रूपये! लाडकी बहीण योजनेतील बदललेला ‘हा’ नियम माहितीये का?
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Who is Akshay Shinde
Who is Akshay Shinde : चिमुकलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे कोण? महिलांच्या शौचालयात त्याला परवानगी कशी?
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Shilpa Shetty Post on Ladki Bahin Yojana
Shilpa Shetty : लाडकी बहीण योजनेवर शिल्पा शेट्टीची पोस्ट, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी..”
Raj Thackeray on Badlapur
Raj Thackeray on Badlapur School Case : “जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा…”, बदलापूर प्रकरणावरून राज ठाकरेंनी सरकारला धरलं धारेवर!
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Badlapur News
Badlapur Crime : “माझ्या मुलाला सोडा, मला..” बदलापूर आंदोलनातल्या मुलाला अटक होताच आईचा आक्रोश

मोबाईल नंबर मतदार ओळखपत्राशी कसा लिंक करायचा? (Voter Card Download)

तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मतदान ओखपत्राशी कसा लिंक करायचा हे जाणून घ्यायचे असेल, तर आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत; जेणेकरून तुम्ही हे काम मोबाईल किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून घरी बसून करू शकता. त्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. मतदार ओळखपत्रामध्ये मोबाईल क्रमांक अपडेट करण्याची प्रक्रिया किंवा दुरुस्त करण्याची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे. पण ते लिंक कसे करायचे ते जाणून घेऊ…

ऑनलाइन मतदार ओळखपत्रासह मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी सोप्या स्टेप्स :

१) सर्वप्रथम ऑफिशियल नॅशनल वोटर्स सर्व्हिस वेबसाईटवर https://www.nvsp.in वर जा.

२) आता या वेबसाईटवर मोबाईल नंबर, ईमेल, पासवर्ड व कॅप्चा कोड भरून लॉग इन करा.

३) तुम्ही नवीन युजर असाल, तर साइन अप करा. त्यासाठी मोबाईल नंबर, ईमेल व कॅप्चा कोड टाकल्यानंतर पुढे जा.

४) तुमच्या दिलेल्या मोबाईल नंबरवर ‘वन टाइम पासवर्ड’ प्राप्त करण्यासाठी ‘रिक्वेस्ट ओटीपी’वर क्लिक करा.

५) मोबाईल नंबरवर मिळालेला ओटीपी टाका. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल.

६) तुमच्या मतदान ओळखपत्रात तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी तुम्हाला होमपेजवर फॉर्म 8 वर क्लिक करावे लागेल.

७) त्यानंतर ‘सेल्फ’ सिलेक्ट करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा. मग Other ऑप्शनवर सिलेक्ट करून Epic भरा आणि सबमिट करा.

८) पुढील स्क्रीनवर तुम्हाला मतदाराचे तपशील दिसतील. त्यानंतर ‘ओके’वर क्लिक करा.

९) मग दुसऱ्या क्रमांकावर दिलेला करेक्शन पर्याय निवडा.

१०) आता तुमच्या समोर फॉर्म 8 ओपन होईल, तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर किंवा ईमेल टाका आणि Next वर क्लिक करा.

११) यानंतर प्लेस भराआणि कॅप्चा कोडदेखील टाका. मग ‘सेंड ओटीपी’ बटणावर क्लिक करा.

१२) त्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला OTP भरा आणि फॉर्म डिटेल्स एकदा नीट वाचून घ्या. मग ‘सबमिट’वर क्लिक करा.

१३) आता ४८ तासांनंतर तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक केला जाईल.