Voter ID Mobile Number Registration Process : देशातील प्रत्येक नागरिकासाठी मतदार ओळखपत्र हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. तुम्ही जेव्हा मतदान करण्यासाठी जाता तेव्हा तुमची ओळख पडताळून करण्यासाठी मतदार ओळखपत्राचा वापर केला जातो. पण फक्त मतदान करण्यासाठीच नाही तर भारताचा नागरिक म्हणून तुमच्याकडे मतदान ओळखपत्र असणे गरजेचे आहे. कारण काही शासकीय कागदपत्र काढण्यासाठी देखील अनेकदा मतदान ओळखपत्राची गरज भासते. पण समजा तुमचे मतदार ओळखपत्र हरवले आहे आणि तुम्हाला ते ऑनलाइन डाउनलोड करायचे आहे (Voter ID Card Online Download), तर त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर मतदार ओळखपत्राशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे (Voter id Mobile Number linking). त्यासह मतदार ओळखपत्र ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी तुम्ही तुमचा इलेक्टोरल फोटो ओळखपत्र क्रमांक (EPIC) लक्षात असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक करता तेव्हा तुमच्यासाठी व्होटिंग कार्डशी संबंधित माहिती ऑनलाइन अपडेट करणे खूप सोपे होते. त्यामुळे मतदार ओळखपत्राला मोबाईल नंबर कशाप्रकारे लिंक करायचा याबाबत काही सोप्या स्टेप्स तुम्हाला सांगणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही तुमचा मोबाईल नंबर मतदार ओळखपत्राशी लिंक केला आहे का?

अनेक लोकांच्या बाबतीत असे घडते की, त्यांचे मतदार ओळखपत्र कुठे ना कुठे गहाळ होते आणि त्यांना कोणता मोबाईल क्रमांक मतदार ओळखपत्राशी जोडलेला (Voter ID Mobile Number Link) आहे हे आठवत नाही. त्याचबरोबर अनेक लोकांचे मोबाईल क्रमांक त्यांच्या मतदार ओळखपत्राशी लिंक केले गेलेले नाहीत. अशा वेळी मतदान ओळखपत्र मोबाईल नंबरशी लिंक (Voter ID Card Mobile Number Linked) केलेले नसेल, तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या

मोबाईल नंबर मतदार ओळखपत्राशी कसा लिंक करायचा? (Voter Card Download)

तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मतदान ओखपत्राशी कसा लिंक करायचा हे जाणून घ्यायचे असेल, तर आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत; जेणेकरून तुम्ही हे काम मोबाईल किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून घरी बसून करू शकता. त्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. मतदार ओळखपत्रामध्ये मोबाईल क्रमांक अपडेट करण्याची प्रक्रिया किंवा दुरुस्त करण्याची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे. पण ते लिंक कसे करायचे ते जाणून घेऊ…

ऑनलाइन मतदार ओळखपत्रासह मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी सोप्या स्टेप्स :

१) सर्वप्रथम ऑफिशियल नॅशनल वोटर्स सर्व्हिस वेबसाईटवर https://www.nvsp.in वर जा.

२) आता या वेबसाईटवर मोबाईल नंबर, ईमेल, पासवर्ड व कॅप्चा कोड भरून लॉग इन करा.

३) तुम्ही नवीन युजर असाल, तर साइन अप करा. त्यासाठी मोबाईल नंबर, ईमेल व कॅप्चा कोड टाकल्यानंतर पुढे जा.

४) तुमच्या दिलेल्या मोबाईल नंबरवर ‘वन टाइम पासवर्ड’ प्राप्त करण्यासाठी ‘रिक्वेस्ट ओटीपी’वर क्लिक करा.

५) मोबाईल नंबरवर मिळालेला ओटीपी टाका. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल.

६) तुमच्या मतदान ओळखपत्रात तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी तुम्हाला होमपेजवर फॉर्म 8 वर क्लिक करावे लागेल.

७) त्यानंतर ‘सेल्फ’ सिलेक्ट करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा. मग Other ऑप्शनवर सिलेक्ट करून Epic भरा आणि सबमिट करा.

८) पुढील स्क्रीनवर तुम्हाला मतदाराचे तपशील दिसतील. त्यानंतर ‘ओके’वर क्लिक करा.

९) मग दुसऱ्या क्रमांकावर दिलेला करेक्शन पर्याय निवडा.

१०) आता तुमच्या समोर फॉर्म 8 ओपन होईल, तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर किंवा ईमेल टाका आणि Next वर क्लिक करा.

११) यानंतर प्लेस भराआणि कॅप्चा कोडदेखील टाका. मग ‘सेंड ओटीपी’ बटणावर क्लिक करा.

१२) त्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला OTP भरा आणि फॉर्म डिटेल्स एकदा नीट वाचून घ्या. मग ‘सबमिट’वर क्लिक करा.

१३) आता ४८ तासांनंतर तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक केला जाईल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voter id card 2024 how to link mobile number in voter card online link mobile number with voter id card mobile number change in voter id follow step by step process sjr