Voter ID Card Photo Change Process: मतदार ओळखपत्र हे भारतीय नागरिकांसाठी अत्यावश्यक दस्तऐवज आणि ओळखपत्र आहे. वैध फोटो ओळखपत्र म्हणून मतदार ओळखपत्राचा वापर केला जातो. निवडणुकीच्या वेळी तुम्हाला मतदान करायचे असेल तर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असावे लागते.

आधार कार्डच्या (Aadhar Card) आधी मतदार ओळखपत्र (Voter ID Card) हे सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र म्हणून वापरले जात होते. आताही पासपोर्टसाठी अर्ज करायचा असेल, ड्रायव्हिंग लायसन्स हवे असेल, वयाचा पुरावा हवा असेल तर त्यासाठी मतदार ओळखपत्राचा वापर केला जातो. जर तुमच्या मतदार ओळखपत्रावर चुकीचा फोटो असेल किंवा तो अस्पष्ट दिसत असेल किंवा तुम्हाला तुमचा फोटो आवडत नसेल आणि तो फोटो बदलायचा असेल तर ते तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकता.

Bangladeshi nationals residing in Pimpri issued passports from Goa Pune news
पिंपरीत वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांनी गोव्यातून काढले पासपोर्ट
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Loan App Harassment
Loan App Scam: दोन हजारांच्या कर्जासाठी पत्नीचे फोटो मॉर्फ करत व्हायरल केले, लोन App च्या छळवणुकीला कंटाळून पतीची आत्महत्या
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Donald Trump
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प घेणार ऐतिहासिक निर्णय! जन्मताच अमेरिकेचे नागरिकत्व बहाल करणारा कायदा बदलणार
priyanka chopra
लेक आणि पतीसह प्रियांका चोप्राची न्यूयॉर्क ट्रिप! चिमुकल्या मालतीला लावली खोटी नखं; फोटो व्हायरल
Supriya Sule, Supriya Sule on Assembly Election ,
Supriya Sule : विधानसभा निकालानंतर निवडणूक आयोगाबाबत खासदार सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य, म्हणाल्या…!

हेही वाचा- ‘आयुष्मान कार्ड’ ऑनलाइन कसे काढायचे? मोफत उपचार कोणत्या आजारांवर होतात, योजनेसाठी पात्रता काय? जाणून घ्या

मतदार ओळखपत्रावरील फोटो बदलण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत

तुम्ही घरबसल्या ऑनलाइन तुमच्या मतदार ओळखपत्रावरील फोटो बदलू शकता. यासाठी तुमच्याकडे नवीन पासपोर्ट साइज फोटो असावा लागतो.

  • व्होटर कार्डमधील फोटो बदलण्यासाठी सर्वात आधी नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टरलच्या वेबसाईटवर जा.
  • यानंतर पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यावर लॉग इन करा.
  • लॉग इन केल्यावर होम स्क्रीन दिसेल. तिथे तुम्हाला Correction in Personal Details हा पर्याय दिसेल. तिथे क्लिक करा.
  • त्यानंतर फॉर्म 8 पर्याय निवडा. तिथे तुम्ही तुम्हाला हवी ती भाषा निवडू शकता. त्या फॉर्ममध्ये सर्वात वरती तुम्हाला भाषा बदलायचा पर्याय मिळेल.
  • आता फॉर्ममध्ये जी माहिती मागितली आहे, ती सगळी माहिती अचूक भरा. यात तुम्हाला राज्य, विधानसभा मतदारसंघाचे नाव, जिल्हा ही माहिती विचारली जाईल. यानंतर तुम्हाला तुमचे नाव, सीरियल नंबर, ओळखपत्र क्रमांक ही माहिती भरावी लागेल.
  • यानंतर खाली स्क्रोल करा आणि तुम्हाला दुरुस्तीसाठी इतर पर्याय दिसतील. तुम्हाला जर फोटो बदलायचा असेल तर फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करा.
  • यानंतर Browse वर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचा नवीन फोटो सिलेक्ट करून अपलोड करावा लागेल.
  • फोटो अपलोड केल्यावर सर्वात खाली मोबाईल नंबर व ईमेल आयडी तसेच जागेचे नाव भरण्यास सांगितले जाईल.
  • हे सर्व तपशील भरल्यावर Captcha कोड एंटर करा आणि Submit बटणवर क्लिक करा.
  • हा फॉर्म सबमिट झाल्यावर तुम्हाला स्क्रीनवर एक रेफरन्स नंबर दिसेल, तो लिहून घ्या.

रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? आवश्यक कागदपत्रे कोणती, फायदे काय? जाणून घ्या

या रेफरन्स नंबरच्या मदतीने तुम्ही केलेल्या अॅप्लिकेशनचे स्टेटस तपासू शकता. अॅप्लिकेशन सबमिट झाल्यावर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबर व ई-मेल आयडीवर मेसेज येईल. मतदार ओळखपत्रावरील फोटो बदलल्याची माहिती तुम्हाला एका महिन्याने मिळेल किंवा पुढील मतदार यादी येईल तेव्हा तुम्हाला तुमचा फोटो बदललेला दिसेल.

Story img Loader