What Are Movable And Immovable Property : संपत्ती हा माणसाच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. याच संपत्ती किंवा मालमत्तेच्या आधारावर व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम राहते. त्यामुळे आयुष्यात जास्तीत जास्त संपत्ती जमा करणे, हे अनेकांचे ध्येय असते. मालमत्तेशी संबंधित अनेक कायदेशीर बाबी समजून घेणे खूप गरजेच्या आहेत. जसे की अनेकांना आपल्याकडे कोणत्या प्रकारची मालमत्ता आहे, याविषयी संभ्रम असू शकतो. त्यामुळे आज आपण मालमत्तेचे प्रमुख प्रकार आणि त्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत. कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी ही माहिती तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. (What Are Movable And Immovable property Difference between movable and immovable property Read What The Law Says)
मालमत्तेचे प्रकार (Types Of Property)
मालमत्तेचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे जंगम मालमत्ता आणि दुसरी म्हणजे स्थावर मालमत्ता.
जंगम मालमत्ता (Movable Property)
जंगम मालमत्ता म्हणजे अशी संपत्ती जी सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येते. उदा. कार, दागिने आणि लॅपटॉप. नोंदणी अधिनियम, १९०८ च्या कलम २(९) नुसार, जंगम मालमत्तेमध्ये लाकूड, पिके, गवत, फळे इत्यादी गोष्टींचासुद्धा समावेश करता येतो.
स्थावर मालमत्ता (Immovable Property )
ज्या मालमत्तेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येत नाही, त्या मालमत्तेला स्थावर मालमत्ता म्हणतात. उदा. घर, दुकान, कारखाना इत्यादी. सामान्य कलम कायदा, १८९७ कलम ३(२६) नुसार स्थावर मालमत्तेत जमीन आणि इतर गोष्टींचा समावेश असतो ज्यांचा जमिनीशी कायमस्वरूपी संबंध असतो. स्थावर मालमत्तेवर कायदेशीर नियम लागू होतात आणि या मालमत्तेवर करसुद्धा भरावा लागतो.
जंगम आणि स्थावर मालमत्तेतील फरक (Difference Between Movable and Immovable Property)
जंगम मालमत्तेसाठी नोंदणी आवश्यक नाही. स्थावर मालमत्तेची किंमत १०० रुपयांपेक्षा जास्त असल्यास, नोंदणी कायदा १९०८ अंतर्गत या मालमत्तेची नोंदणी आवश्यक आहे.
जंगम मालमत्ता कोणालाही सहजपणे भेट दिली जाऊ शकते. स्थावर मालमत्ता मृत्युपत्र तरतुदीशिवाय किंवा कायदेशीर विभाजन केल्याशिवाय ती कोणाच्याही मालकीची होऊ शकत नाही. ही मालमत्ता सहज विभागली जाऊ शकत नाही.