NAV And iNAV Mutual Fund Investors : म्युच्युअल फंड हे गुंतवणूक करण्याचं एक माध्यम आहे. जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल, तर तु्म्हाला एनएव्ही (NAV)आणि आयएनएव्ही (iNAV) या दोन्ही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. तर, तुम्हाला एनएव्ही आणि आयएनएव्ही म्हणजे काय, हे माहीत आहे का? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या जबाबदार बनवण्यासाठी एनएव्ही आणि आयएनएव्ही या दोन गोष्टींबाबतचा आढावा घेणे गरजेचे आहे.

एनएव्ही (NAV)

एनएव्ही (NAV) म्हणजे ‘नेट ॲसेट व्हॅल्यू’, जी विशिष्ट म्युच्युअल फंडाच्या प्रत्येक शेअरचे बाजार मूल्य सांगते. एनएव्ही जाणून घेण्यासाठी ॲसेट व्हॅल्यूमधून एकूण खर्चाचा रेशो वजा केला जातो आणि त्याला बाकी युनिट्सच्या संख्येने विभाजित केले जाते.

प्रत्येक फंड युनिटची किंमत जाणून घेण्यासाठी कोणत्याही पोर्टफोलिओचे बाजार मूल्य काढा आणि ते चालू फंड युनिटच्या एकूण संख्येने विभाजित करा.
उदा. एखाद्या फंडाची एकूण मालमत्ता १०० कोटी रुपये, खर्च केलेला रेशो १० कोटी आणि त्यातील ९० लाख युनिट्स बाकी असेल, तर एनएव्ही (NAV) खालीलप्रमाणे असेल :
(१०० कोटी – १० कोटी )/९० कोटी = एनएव्ही

जरी एनएव्ही तुमच्या मालमत्तेच्या मूल्यात वाढ दाखवीत असेल, तर तो नफा नव्हे, तर त्यातून फंडाचे मूल्य आणि फंड कसे काम करतोय, हे दिसते. एनएव्हीमुळे गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडाच्या भूतकाळातील एकूण रेकॉर्ड तपासण्यास आणि इतर फंडांशी तुलना करण्यास मदत होते. एनएव्ही ओपन एंडेड म्यच्युअल फंडामध्ये शेअर्स खरेदी (Entry Point) करण्यासाठी आणि विकण्यासाठी (Exit Point) किंमत ठरवतात.

आयएनएव्ही (iNAV)

आयएनएव्ही (iNAV) म्हणजे ‘इंडिकेटिव्ह नेट ॲसेट व्हॅल्यू’ जे शेअर मार्केट सुरू असताना एक्सचेंज-ट्रेडेड फंडाच्या (ETF) फक्त एकूण मालमत्ता मूल्याचा रिअल-टाइम इंट्रा डे अंदाज आहे.
iNAV हे सक्रिय गुंतवणूकदार किंवा ट्रेडर्ससाठी आवश्यक सूचक म्हणून काम करतो, जे ट्रेडिंग वेळेदरम्यान एक्स्चेंज-ट्रेडेड फंडाची (ETF) खरेदी आणि विक्री करतात.
आयएनव्ही गुंतवणूकदारांना एक्सचेंज-ट्रेडेड फंडाची किंवा फंड शेअर्सची किंमत त्यांच्या खऱ्या मूल्यापेक्षा जास्त किंवा कमी आहे का, हे ठरवण्यास मदत होते. एक्सचेंज-ट्रेडेड फंडसाठी हे खूप महत्त्वाचे आहे. कारण- गुंतवणूकदार दिवसभर हे शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकतात. आयएनव्ही हे रिअल-टाइम किमतींवर अवलंबून असल्याने जेव्हा शेअर बाजार अस्थिर असतो तेव्हा त्यात मोठ्या प्रमाणात बदल दिसून येतो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are nav and inav and why is it more important for mutual fund investors read details share market news ndj