गेल्या काही वर्षांपूर्वीच पनामा पेपर लीक प्रकरण उजेडात आले होते. त्यात २०१६ मध्ये ऐश्वर्याबरोबर अमिताभ बच्चन यांचेही नाव पनामा पेपर्समध्ये आले होते. ‘द इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ऐश्वर्यावर ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये अमीर पार्टनर्स नावाची कंपनी उघडल्याचा आरोप आहे. याशिवाय पती अभिषेक बच्चनच्या परदेशी बँक खात्यातही मोठी रक्कम जमा केल्याचा आरोप होता. टॅक्स हेवन्स देशात पैसे पाठवण्यासाठी किंवा परदेशातून पैसे भारतात पाठवण्यासाठी ऑफशोर कंपन्या किंवा बँक खाती वापरली गेल्याचा दावाही केला गेला होता. तेव्हापासून ऑफशोर कंपन्यांचा मुद्दा चर्चेत आला होता. खरं तर तांत्रिकदृष्ट्या ऑफशोर कंपन्या बेकायदेशीर नाहीत. परंतु बहुतांश कर छावणी (Tax havens)ची सूट असलेल्या देशांमध्ये अशा कंपन्या कोणत्या ना कोणत्या प्रकारचा कर, आर्थिक किंवा कायदेशीर फायदा मिळवण्यासाठी छुप्या पद्धतीने सुरू केल्या जातात. या कंपन्यांच्या माध्यमातून संबंधित व्यक्ती त्यांच्या देशातील प्राप्तिकर, कॉर्पोरेट कर, भांडवली नफा कर असे अनेक प्रकारचे कर वाचवतात. ऑफशोर कंपन्यांना फायदे कसे मिळतात आणि कर कशा पद्धतीन बुडवतात हे जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर चुकवेगिरीसाठी इतर देशांत कंपन्या उघडण्यामागे त्यात सामील असलेले लोक हे एक मोठे कारण आहे. त्यांना आपली ओळख लपवायची असते. याचा एक मार्ग म्हणजे टॅक्स हेवन देशात कंपनी उघडल्यानंतर तिची शाखा भारतात उघडली जाते. कंपनी परदेशात उघडली असल्याने अशा परिस्थितीत ती कंपनी भारतीय कायद्याच्या कक्षेत येत नाही. कोणताही कायदेशीर परिणाम होत नाही, जर झालाच तर तो कंपनीच्या भारतात उघडल्या जाणाऱ्या शाखेवर असेल.

अनेक जण यासाठी शेल कंपन्याही उघडतात. म्हणजे कागदावर दाखवण्यासाठी कंपनीची स्थापना केली जाते. जेणेकरून निर्यात आणि सेवांचे फायदे भारतात आणि परदेशात मिळू शकतील. खोटे करार दाखवून शेअर बाजारात त्याचा वापर केला जातो. जेणेकरून कंपनीचे मूल्यांकन वाढवता येते. हा देखील करचुकवेगिरीचा एक मार्ग आहे. टॅक्स हेवन्स देशांमध्ये अशा कंपन्या तयार करणे खूप सोपे आहे आणि ते अनेक प्रकारच्या दायित्वांपासूनही वाचतात.

हेही वाचाः चालू आर्थिक वर्षात प्रथमच ऑक्टोबरच्या निर्यातीत वाढ होण्याची अपेक्षा

टॅक्स हेवन्स देश काय आहेत?

पनामा, बर्म्युडा, मोनाको, अंडोरा, बहामा, बर्म्युडा, बेलीज, केमन आयलंड, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, कुक आयलंड हे देश टॅक्स हेवन देशांच्या यादीत येतात. या देशांमध्ये परदेशी व्यक्ती किंवा व्यावसायिकांवर कर दायित्व कमी किंवा नगण्यच आहे. टॅक्स हेवन देशांमध्ये कर लाभ मिळवण्यासाठी व्यावसायिकाने त्याच देशात राहणे आवश्यक नाही किंवा त्याच देशात व्यवसाय चालवणे आवश्यक नाही. अशा परिस्थितीत हे देश करचुकवेगिरीसाठी योग्य मार्ग बनतात.

हेही वाचाः मोदी सरकार पुढील ७ वर्षांत कोळशाच्या उत्पादनात ५० टक्क्यांची वाढ करणार

इंटरनॅशनल बिझनेस कंपनी (IBC) म्हणजे काय?

IBC ही एक कंपनी आहे जी तिच्या देशात व्यावसायिक हालचाली करीत नाही. ती अनिवासी कंपनी म्हणूनही ओळखली जाते. विशेष म्हणजे सर्व ऑफशोर कंपन्या या IBC नाहीत. IBC शेअरधारकांची माहिती सार्वजनिकपणे उघड करत नाही. शिवाय IBC च्या भागधारकांची मालमत्ता कायदेशीररीत्या कंपनीच्या मालमत्तेपासून विभक्त केली जाते. कंपनीचे बँक खाते असल्यास कॉर्पोरेशनच्या भागधारकांची माहिती बँकेला उघड करणे बंधनकारक असते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are offshore companies how are they operated vrd