IPL 2025 Retention Rules Details In Marathi: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) २०२५ च्या हंगामापूर्वी बीसीसीआयने काही नवीन बदल केले आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊंन्सिलने वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) रिटेंशन नियमांमधील मोठे बदल मंजूर केले आहेत. IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझी सहा खेळाडूंना कायम ठेवू शकते. राईट टू मॅच (RTM) कार्ड ६ वर्षांनंतर आयपीएलमध्ये परत आले आहे, तर इम्पॅक्ट प्लेअर नियमही कायम राहणार आहे.

इम्पॅक्ट प्लेअर नियम

ONGC Bharti 2024
ONGC Bharti 2024 : १०वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी! ONGC अंतर्गत २२३६ पदांची भरती सुरू; जाणून घ्या, किती मिळणार पगार ?
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
wife was keeping Physical relationship with customers for money after husband goes to work
पती कामावर जाताच पत्नी पैशासाठी ठेवायची ग्राहकांशी शारीरिक संबंध
ITBP CAPF Medical Officer Recruitment 2024: Notification For 345 Vacancies Out, Check Details
ITBP CAPF Recruitment 2024: मेडिकल ऑफिसरसाठी बंपर भरती सुरू; जाणून घ्या अर्जप्रक्रिया
Loksatta kutuhal Field tactics through artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेतून मैदानातील डावपेच
The fake SBI branch was opened in Chhattisgarh's Sakti district
SBI Fake Branch : चित्रपटाला शोभेल अशी कथा! चक्क SBI ची बनावट शाखा सुरू केली, खोट्या नियुक्त्या अन् बरंच काही; कुठे घडला हा भयंकर प्रकार?
wheat flour get moldy if it is stored for a long
गव्हाचे पीठ जास्त दिवस साठवल्यास किडे होतात? ‘या’ सोप्या उपायांनी जास्त दिवस टिकू शकेल पीठ
IPL Auction 2025 BCCI Reveals Deadline for Franchises to Announce retained players list As Per Reports
IPL Auction 2025: आयपीएल संघांना मिळाली डेडलाईन? ‘या’ तारखेपर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार

आयपीएलच्या सर्वोच्च परिषदेने इम्पॅक्ट प्लेयर नियम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मासह काही ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी या निर्णयावर टीका केली होती, त्यानंतर अशी चर्चा रंगली होती की बीसीसीआय हा नियम हटवू शकते पण हा नियम आगामी आयपीएलमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च परिषदेने २०२७ पर्यंत हा नियम कायम ठेवला आहे.

हेही वाचा – IND vs NZ: भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर BCCIने काढलं फर्मान, प्रत्येक खेळाडूने मुंबईतील सामन्यापूर्वी…

पाच खेळाडू रिटेन

रिटेनशन पॉलिसीमध्ये सर्व १० संघांना प्रत्येकी पाच खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याच वेळी, प्रत्येक संघाला कोणत्याही एका खेळाडूवर राईट टू मॅच (RTM कार्ड) वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. मागच्या वेळी प्रत्येक संघाची पर्स १०० कोटी रुपये होती, मात्र यावेळी ही पर्स १२० कोटी रुपये झाली आहे.

राईट टू मॅच

आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत राईट टू मॅच नियम परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लिलावापूर्वी पाच खेळाडूंना कायम ठेवणाऱ्या फ्रँचायझीला एकूण १२० कोटी रुपयांपैकी ७५ कोटी रुपये पर्समधून खर्च करण्याची परवानगी असेल. राईट टू मॅच म्हणजे लिलावापूर्वी एखादा संघ आपल्या कोणत्याही खेळाडूला कायम ठेवू शकला नाही, तर लिलावाच्या वेळी त्याला पुन्हा आपल्या संघात घेण्याची संधी मिळते, परंतु त्यासाठी त्या काळात इतर काही फ्रँचायझीने त्या खेळाडूसाठी जेवढे पैसे दिले आहेत ते त्याने बोली लावलेल्या रकमेत समाविष्ट करू शकतात. ही किंमत त्या खेळाडूच्या मागील किमतीपेक्षा कमी किंवा जास्त असू शकते.

हेही वाचा – आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनसाठी पुन्हा लागू करण्यात आलेला ‘राईट टू मॅच’ नियम काय आहे माहितेय का?

आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या नव्या रिटेंशन नियमानुसार, जर एखाद्या फ्रँचायझीने ५ कॅप्ड आणि एक अनकॅप्डसह ६ खेळाडूंना रिटेन केले तर, तर त्यांना लिलावादरम्यान आरटीएम नियम वापरण्याची संधी मिळणार नाही . यावेळी ६ खेळाडूंमधून जास्तीत जास्त भारतीय आणि परदेशी खेळाडूंची निवड करता येईल, असे नियमात स्पष्ट करण्यात आले आहे.

मॅच फी

आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मॅच फी लागू करण्यात आली आहे. प्रत्येक प्लेईंग इलेव्हनमधील खेळाडूला (प्रभावी खेळाडूसह) प्रत्येक सामन्यासाठी ७.५ लाख रुपये मॅच फी मिळेल, जी त्यांच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त असेल. परदेशी खेळाडूंना आयपीएल लिलावासाठी नावाची नोंदणी करणे अनिवार्य असेल. परदेशी खेळाडूने नोंदणी न केल्यास तो पुढील वर्षी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावात नोंदणीसाठी अपात्र ठरेल. एखाद्या खेळाडूची लिलावात निवड झाल्यानंतर, हंगाम सुरू होण्यापूर्वी जर सामने खेळण्यासाठी उपलब्ध नसेल तर, त्याला स्पर्धेत भाग घेण्यास आणि २ हंगामांसाठी लिलावात बंदी घालण्यात येईल.

हेही वाचा – Mohammed Shami: “BCCI आणि चाहत्यांची माफी मागतो पण…”, मोहम्मद शमीने अचानक पोस्ट शेअर करत का मागितली माफी? पाहा VIDEO

कमीत कमी एक अनकॅप्ड खेळाडू

फ्रँचायझी ज्या सहा खेळाडूंना रिटेन करू इच्छिते, त्यापैकी किमान एक खेळाडू हा अनकॅप्ड भारतीय खेळाडू असला पाहिजे. उर्वरित पाच भारतीय किंवा परदेशी खेळाडू असू शकतात. याशिवाय, ज्या सहा खेळाडूंना फ्रँचायझी कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे त्यांना एकतर थेट धारणा आणि RTM पर्यायांच्या संयोजनाद्वारे किंवा फक्त RTM पर्यायांतर्गत राखले जाऊ शकते.