Places In India Where Indians Are Not Allowed: बर्‍याच लोकांना प्रवास करायला आवडते. प्रवास करायची आवड झाली तर प्रत्येकालाच वाटते की, आपण मनसोक्त कुठेही प्रवास करण्याचा आनंद घेऊ शकतो. पण तुम्ही कधी विचारही केला नसेल, आपण ज्या देशात राहतो त्याच देशातील काही ठिकाणी आपल्याला जाण्यास मनाई असेल. हे खरं आहे, भारतात असे काही ठिकाणे आहेत जेथे भारतीयांचाच प्रवेश नाकारण्यात आला आहे. या ठिकाणी फक्त परदेशी लोकांना परवानगी आहे. चला तर आज आपण ही भारतातील ठिकाणे कोणती आहेत जाणून घेऊयात…

देशातील ‘या’ ठिकाणी भारतीयांना जाण्यावर बंदी

१. फ्री कसोल कैफे (Free Kasol Cafe) हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील भव्य पर्वत आणि दऱ्याखोऱ्यात बुडून जाणाऱ्या नद्या यासह, हिमाचल प्रदेश उत्तर भारतातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, जे सर्व प्रकारच्या प्रवाशांची पर्यटनाची यादीत आहे. हिमाचलमध्ये वसलेले कासोल गाव हे पर्यटकांचे पहिले आवडते ठिकाण आहे. तुम्हाला हे जाणून थोडे आश्चर्य वाटेल पण येथे भारतीयांपेक्षा जास्त इस्रायली फिरताना दिसतात. इथे स्थानिक दुकानदार व्यापारी परदेशी पर्यटकांना प्राधान्य देतात. त्यामुळे येथे भारतीयांसाठी बंदीसदृश्य स्थिती असते. इतकेच नाही तर येथील फ्री कसोल कॅफे रेस्टॉरंटमध्ये भारतीयांना येण्यास बंदी आहे. या रेस्टॉरंटमध्ये येणारे बहुतांश भारतीय पर्यटक हे पुरुष असतात, जे इतर पर्यटकांशी गैरवर्तन करतात, असे सांगितले जाते.

EY India , Infosys, employee , work culture,
शहरबात : ‘आयटीनगरी’ची कथा अन् व्यथा : ईवाय इंडिया ते इन्फोसिस…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Rahul Gandhi Criticized Mohan Bhagwat
Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
Himalayan breed dog now becomes India fourth registered indigenous breed
‘हिमालयन शेफर्ड डॉग’ ठरली चौथी अस्सल भारतीय श्वान प्रजाती… याचे महत्त्व काय?
manik kokate chhagan bhujbal
भुजबळांविषयी न बोलण्याचा माणिक कोकाटे यांना अजित पवार गटाचा आदेश
devendra fadnavis sanjay raut
“संजय राऊत रिकामटेकडे…मी नाही”, देवेंद्र फडणवीसांचा टोला

(हे ही वाचा: बाथरुमपासून ते बेडरुमपर्यंत! कोट्यवधी किंमत असलेल्या ‘व्हॅनिटी व्हॅन’ला एवढं महत्त्व का? जाणून घ्या ‘या’ माहीत नसलेल्या गोष्टी)

२. ‘फॉर्नर्स ओन्ली’ बीच (Foreigners Only Beaches) गोवा

गोवा हे भारतातील सर्वात आवडते पर्यटन स्थळ आहे, तसेच परदेशातही त्याची बरीच चर्चा आहे. गोवा हे तरुण आणि जोडप्यांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. पर्यटकांना येथील नाइटलाइफ आणि मजा आवडते. प्रत्येकाला गोव्याच्या समुद्रकिना-याच्या दृश्यांचा आनंद घ्यायचा असतो. पण तुम्हाला माहित आहे का की, गोव्यात असे अनेक खाजगी समुद्रकिनारे आहेत, जिथे इथे स्थानिक दुकानदार व्यापारी परदेशी पर्यटकांना प्राधान्य देतात. त्यामुळे येथे भारतीयांसाठी बंदीसदृश्य स्थिती असते.

३. ब्रॉडलैंड लॉज (Broadlands Hotel) चेन्नई

चेन्नई हे दक्षिण भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. चेन्नईबद्दल पर्यटकांना कायमच आकर्षण राहिले आहे. दरवर्षी हजारो पर्यटक चेन्नईला भेट द्यायला येतात. पण येथे अशी अनेक हॉटेल्स आहेत जिथे भारतीयांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. त्यातीलच एक म्हणजे ब्रॉडलैंड लॉज आहे. खरं तर हा लॉज जुन्या काळात राजा-महाराजांचा वाडा असायचा, जो आजच्या काळात हॉटेल बनला आहे आणि ‘नो इंडियन पॉलिसी’वर चालतो. इथे फक्त परदेशी लोकांना राहण्यासाठी खोल्या दिल्या जातात.

(हे ही वाचा: इलेक्ट्रिक कारची बॅटरी किती वर्षे टिकते माहितेयं का? आकडा ऐकून तुम्हीही व्हाल थक्क)

४. फॉरेनर्स ओन्ली बीच (Foreigners Only Beaches) पुद्दुचेरी

गोव्याप्रमाणेच पुडुचेरीमध्येही एक समुद्रकिनारा आहे, इथे स्थानिक दुकानदार व्यापारी परदेशी पर्यटकांना प्राधान्य देतात. त्यामुळे येथे भारतीयांसाठी बंदीसदृश्य स्थिती असते.

५. युनो-इन हॉटेल (Uno-In Hotel) बेंगळुरू

पर्यटकांना आकर्षित करणारे दक्षिण भारतातील बेंगळुरू हे शहर एक सुंदर शहर असून, ते सर्वच क्षेत्रांतील लोकांचे आवडते ठिकाण आहे. २०१२ साली Uno-In हे हॉटेल खास करून जपानी पर्यटकांसाठी बांधण्यात आलं होतं. जेव्हा भारतीयांना या हॉटेल मध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता तेव्हा त्यावरून काही काळ वाद देखील उफाळला होता. पण अखेर प्रशासनाने या हॉटेलवरच कायमची बंदी आणली.

Story img Loader