ऑक्टोबर २०२४ मध्ये चीनबरोबर संवाद साधताना भारताने संभव या स्मार्टफोनचा वापर केला होता. हे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांमध्ये वितरीत गेले आहेत. वार्षिक पत्रकार परिषदेत आर्मी चिफ जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संभव हे स्मार्टफोन सुरक्षित संभाषणासाठी बनवले गेले असल्याचे म्हटले आहे. जवळजवळ ३० हजार स्मार्टफोनचे वितरण सैन्य अधिकाऱ्यांमध्ये वितरित केले आहेत. एका अधिकाऱ्याने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोनमध्ये महत्वाची माहिती शेअर करण्याचे अ‍ॅप्लिकेशन आहेत. गेल्या वर्षी या प्रोजेक्टची सुरूवात झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय लष्कर वापरत असलेला संभव स्मार्टफोनमध्ये कोणत्या खास गोष्टी आहेत?

संभव स्मार्टफोनमध्ये एम-सिग्मा(M-Sigma)सारखे अ‍ॅप्लिकेशन आहे. मेसेज, डॉक्युमेंट, फोटो पाठवण्यासाठी ज्या प्रकारे व्हॉट्सअपचा वापर केला जातो, त्याच पद्धतीने याचा वापर केला जाणार आहे. यामुळे महत्वाची माहिती चोरी होण्याचा धोका कमी होणार आहे. यापूर्वी, लष्करी अधिकारी माहिती पाठवण्यासाठी व्हॉट्सॲप आणि अशा इतर ॲप्सवर अवलंबून होते. ज्यामुळे वारंवार महत्वाची माहिती चोरी होण्याच्या घटना घडत होत्या. हे स्मार्टफोन एअरटेल व जिओ या नेटवर्कवर वापरता यावेत, अशी आशा लष्कराकडून केली जात आहेत. विविध नेटवर्कवर प्रभावीपणे ऑपरेट करण्यासाठी हा मोबाईल तयार केला आहे.

याबरोबरच,या मोबाईलमध्ये मुख्य अधिकाऱ्यांच्या संपर्काचे तपशील आधीच इंस्टॉल केले आहेत, ज्यामुळे अधिकाऱ्यांना हे नंबर सेव्ह करावे लागत नाहीत. भारतीय लष्कराने तात्काळ संपर्क साधणे सोपे होण्यासाठी एंड-टू-एंड सुरक्षित मोबाइल इकोसिस्टम विकसित केली आहे. संभव स्मार्टफोन आधुनिक ५G तंत्रज्ञानावर चालतो आणि पूर्णपणे एनक्रिप्टेड आहे.

दरम्यान, १७ जानेवारीला डिजिटल भारत निधी (DBN) द्वारे वित्तपुरवठा केलेल्या ४G मोबाइल साइट्सचे प्रदर्शन करणारा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान सरकारने इंट्रा सर्कल रोमिंग (ICR) सुविधा सुरू केली आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the special features of sambhav smart phone used by indian army know nsp