What are VVPAT and How VVPAT Machines Works In Elections : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक आयोगानं जाहीर केलं आहे. ही निवडणुक एकाच टप्प्यात होणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.  तुम्ही VVPAT हा शब्द ऐकला आहे का? निवडणुकीदरम्यान VVPAT हा शब्द अनेकदा ऐकायला मिळतो किंवा वाचायला मिळतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तुम्हाला माहिती आहे का VVPAT म्हणजे नेमकं काय आहे आणि हे मशीन कसे काम करते? खरं तर निवडणूक प्रक्रियेत VVPAT मशीनचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आज आपण याच VVPAT विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

VVPAT म्हणजे नेमकं काय? (what are VVPAT?)

VVPAT म्हणजे व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (Voter Verifiable Paper Audit Trail). मतांची पडताळणी करणे, हे या मशीनचे मुख्य काम आहे. हे मशीन थेट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) शी जोडलेली आहे. VVPAT मशीन ही मतदारांना दिसणारी एक कागदी स्लिप तयार करते, जी मतदारांचे मत इव्हीएमवर अचूकपणे नोंदवण्यात आले की नाही, याची पडताळणी करते. या स्लिपमध्ये मतदाराने कोणत्या पक्षाला आणि चिन्हाला मत दिले, याविषयी माहिती असते. (what are VVPAT or Voter Verifiable Paper Audit Trail what is the importance of VVPAT in election process)

हेही वाचा : Maharashtra Assembly Seats : महाराष्ट्रात विधानसभेच्या किती जागा आहेत? जिल्ह्यानुसार सर्व जागांची यादी एका क्लिकवर वाचा

याशिवाय मशीनमध्ये एक पारदर्शक बॉक्स असतो, ज्याद्वारे मतदार या स्लिपचे नीट निरीक्षण करू शकतो. शेवटी ही स्लिप मशीनच्या सीलबंद डब्यात सुरक्षितपणे जमा होते.

धिक पारदर्शकता आणण्यासाठी कोणते उपाय राबवले जाऊ शकतात, याची चर्चा करण्यासाठी २०१० मध्ये निवडणूक आयोगाने बैठक घेतली होती. त्यामध्ये VVPAT ची संकल्पना मांडण्यात आली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ही मशीन सुरू करण्यात आली. तेव्हा याचा वापर मर्यादित राज्यात करण्यात आला होता पण जून २०१७ पर्यंत VVPAT चा १०० टक्के वापर करण्यात आला.

VVPAT निवडणुकीदरम्यान का चर्चेत असते?

विरोधकांकडून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. विरोधकांच्या मते, EVM मतांबरोबरच VVPAT स्लिप्सचीही १०० टक्के मोजणी व्हायला हवी. ही स्लिप थेट खालील बॉक्समध्ये न पडता मतदारांच्या हातात आली पाहिजे. मतदाराने आपल्या मताची पडताळणी केल्यानंतर ती स्लिप एका बॉक्समध्ये जमा केली पाहिजे, जेणेकरून पारदर्शक मतदान प्रक्रिया पार पडेल.

हेही वाचा : विधानसभा निवडणुकीआधी ‘एबी’ फॉर्मची चर्चा; एबी फॉर्म म्हणजे काय? निवडणुकीत या फॉर्मला इतके महत्त्व का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४

सध्या महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम पाहायला मिळत आहे. यंदा या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेस यांची महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये प्रामुख्याने ही निवडणूक होईल. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असेल त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.