आजकाल बाजारात अनेक प्रकारचे स्मार्ट वॉच उपलब्ध आहेत. आपल्यापैकी अनेक जण स्मार्ट वॉच वापरतात. वेळ पाहण्याव्यतिरिक्त या वॉचमध्ये अनेक खास फीचर्सदेखील आहेत. त्यामुळेच याला स्मार्ट वॉच म्हणतात. तुम्ही तुमच्या स्मार्ट वॉचमध्ये हिरवा दिवा (हिरवी लाईट) चमकताना कधी पाहिला आहे का? घड्याळाच्या मागील बाजूस हा हिरवी दिवा चमकत असतो; पण त्याचे काम काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्मार्ट वॉचच्या हिरव्या दिव्याचा हृदयाशी काय संबंध?

तुम्हाला माहीत नसेल; पण स्मार्ट वॉचमध्ये चमकणाऱ्या हिरव्या दिव्याचा हृदयाशी संबंध आहे. वास्तविक, या हिरव्या दिव्यामुळेच हृदयाचे ठोके मोजण्यास मदत होते. स्मार्ट वॉचमधील हा हिरवा दिवा म्हणजे हृदय गतीचा सेन्सर असतो, जो LED लाईट आणि प्रकाश संवेदनशील फोटोडिओड (Photodiode) वापरून हृदय गती तपासतो.

स्मार्ट वॉचमधील हिरवी लाईट उत्सर्जित होती जी तुमच्या त्वचेत शिरते आणि रक्तवाहिन्यांच्या हालचालींचा मागोवा घेते. त्याचबरोबर एक सेन्सर रक्तवाहिनीच्या आकारातील बदलांवर लक्ष ठेवतो. या दोन्ही क्रियाकलापांमुळे हृदयाची गती ओळखणे शक्य होते. या प्रक्रियेला फोटोप्लेथिस्मोग्राफी म्हणतात आणि घड्याळ या डेटाचा वापर आपल्या हृदय गतीची गणना करण्यासाठी करते.

हेही वाचा – जगातील सर्वात महागडा दात कोणाचा आहे माहित्येय का? एका दाताची किंमत आहे….

इन्फ्रारेड लाइट किंवा घड्याळातील इतर सेन्सर्स रक्तातील ऑक्सिजन संपृक्तता (oxygen saturation) यांसारखी अधिक आकडेवारी गोळा करण्यास सक्षम आहेत. हे डेटा पॉइंट्स तुमच्या संग्रहित डेटासह (तुमची उंची, वजन व लिंग) एकत्र केले जातात आणि तुमच्या आरोग्याचा अंदाज लावण्यासाठी किंवा आपल्या श्वासाचा मागोवा घेण्यासाठी वापरले जातात. घड्याळातील एक्स्लेरोमीटर तुमच्या व्यायामाचा मागोवा ठेवण्यासाठी तुमच्या बदलत्या हृदयाच्या गतीचे मोजमाप करतात.

हेही वाचा – भारतातील सर्वात श्रीमंत गाव आहे महाराष्ट्रात! ‘या’ गावातील शेतकरी आहेत कोट्याधीश अन् लक्षाधीश

स्मार्ट वॉचमधील हिरवा दिवा नेमका कसे काम करतो?

आपले रक्त लाल आहे. कारण- ते लाल प्रकाश परावर्तित करते आणि हिरवा प्रकाश शोषून घेते. म्हणूनच तुमच्या स्मार्ट वॉचमध्ये हिरवा दिवा वापरला जातो. तुमच्या मनगटातून रक्त प्रवाह सुरू असतो; पण जेव्हा मनगटावरील स्मार्ट वॉचमधील हिरवा दिवा चमकतो तेव्हा हा दिवा रक्तात शिरून हृदयाचे ठोके मोजतो.

हृदयाची गती जाणून घेण्यासाठी मनगटावर बांधलेल्या स्मार्ट वॉचमधील हिरवा दिवा वेगाने चमकू लागतो. एका मिनिटात हृदय किती वेळा धडधडत आहे याची अचूक माहिती मिळविण्यासाठी चमकणारा हिरवी प्रकाश एका सेकंदात अनेक वेळा चमकतो. हा प्रकाश रक्ताद्वारे जितक्या वेगाने शोषला जाईल, तितक्या वेगाने तुमचे स्मार्ट वॉच दर मिनिटाला हृदयाचे ठोके मोजते.

हेही वाचा –विमान उड्डाण करताना तुम्ही फोन ‘एअरप्लेन’ मोडवर न ठेवल्यास काय होते? तज्ज्ञांनी केला खुलासा….

घड्याळात फक्त हिरवा दिवा का वापरला जातो?

स्मार्ट वॉचमधील हृदयाची सुस्थितीशी (हार्ट फिटनेसशी) संबंधित वापरला जाणारा दिवा हा हिरवाच असतो. कारण- हिरवा प्रकाश हा इतर कोणत्याही रंगाच्या प्रकाशापेक्षा कमी संवेदनशील असतो. याचा अर्थ असा की, हा हिरवा प्रकाश इतरांच्या तुलनेत सभोवतालच्या प्रकाशावर जास्त परिणाम करणार नाही. अशा प्रकारे हा प्रकाश स्पंदनेंद्रिय क्रियाकलाप (puls sense activity) करत असताना अधिक अचूक रिझल्ट देऊ शकतो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What do the green lights on the smartwatch and how it saves life snk