गेल्या काही दिवसांपासून बिझनेस जार्गन म्हणजे व्यवसाय कर्मचार्यांनी अनन्य कल्पना आणि दिशानिर्देश देण्यासाठी वापरलेले शब्द आणि वाक्ये जसे की खूप मेहनत घेणे, क्लायंटला माहिती पाठवणे किंवा मध्यम स्तरीय कर्मचाऱ्यांना अधिक अधिकार देणे यासाठी काही शब्द म्हणजेच संज्ञा वापरले जातात, त्यांनाच बिझनेस जार्गन असे म्हणतात. गेम चेंजर हासुद्धा व्यावसायिक भाषेत वापरला जाणारा एक शब्दच आहे. मुख्यतः गेम चेंजरचा अर्थ त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्यासाठी जुन्या योजनांमधून आधुनिक व्यवसाय धोरणाकडे जाणाऱ्या कंपन्यांना परिभाषित करण्यासाठी वापरला जातो.
नावाप्रमाणेच गेम चेंजर ही एक संज्ञा आहे, जी एखाद्या व्यक्तीचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते, जसे की रणनीती बदलते किंवा कार्य कसे पार पाडते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास गेम चेंजरची व्याख्या एखाद्या व्यक्तीसाठी वापरली जाऊ शकते, जी आपली इच्छित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नवीन आणि आधुनिक धोरणावर अवलंबून असते. मूलभूतपणे ते त्यांच्या पारंपरिक कल्पना आणि पद्धती बदलतात, त्या बदलून व्यवसाय ऑपरेशनमध्ये आधुनिक आणि प्रभावी धोरणे आणतात. हे बदल कंपन्यांना अधिक सर्जनशील बनण्यास मदत करतात आणि त्यांची निर्धारित उद्दिष्टे गाठण्यासाठी अधिक हुशार आणि उत्तम धोरणे तयार करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा