What are strong rooms: येत्या काही महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक सुरू होणार असून, काही दिवसांत निवडणूक आयोगाकडून यासाठीची तयारी सुरू होईल. निवडणुकीच्या काळात अनेक गोष्टींची खूप व्यवस्थित काळजी घेतली जाते. त्यामध्ये विशेषतः मतदानानंतर ईव्हीएम ठेवण्यासाठी स्ट्राँग रूमही तयार केल्या जातात. पण, या स्ट्राँग रूम्स म्हणजे नक्की काय आणि ती कशी तयार केली जाते ते या बातमीच्या आपण जाणून घेऊया.

स्ट्राँग रूम म्हणजे काय? (What are strong rooms)

मतदानानंतर ज्या ठिकाणी EVM (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) आणि VVPAT (व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल) मशीन सुरक्षित ठेवल्या जातात, त्या जागेला स्ट्राँग रूम म्हणतात. तसेच याला स्ट्राँग रूम म्हणण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे या रूममध्ये एकदा मशीन आत गेल्यावर त्या खोलीत कोणीही प्रवेश करू शकत नाही. तसेच जेव्हा ही मशीन मतमोजणीसाठी बाहेर काढली जाते तेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणीही या रूममध्ये पुन्हा प्रवेश करीत नाही.

helium leaks discovered on boeings starliner
विश्लेषण :अंतराळयानामध्ये हेलियमचा वापर का केला जातो? बोईंग स्टारलाइनरचा पेच हेलियम गळतीमुळे?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
badoda bnp paribas large and mid cap fund
‘ग्रोथ ॲट रिझनेबल प्राइस’ हेच गुंतवणूक सूत्र!
docudrama Mai, documentaries, documentary,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आकाशपाळण्यातील धाडस..
Recognition of prize shares by Reliance Industries
रिलायन्स इंडस्ट्रीजकडून १:१ बक्षीस समभागास मान्यता
russia missile strike on ukraine
Russia Attack On Ukraine : रशियाचा युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्र हल्ला, पोल्टावामधील लष्करी शिक्षण संस्थेला केलं लक्ष्य; ५० जणांचा मृत्यू, २७१ जखमी
nse marahti news
जागतिक सकारात्मकतेने निर्देशांक तेजी कायम, ‘सेन्सेक्स’ ८२,३६५ च्या विक्रमी शिखरावर
Skoda Kylaq spotted testing: New details revealed Know Features & Design Details
Skoda Kylaq: टेस्टिंगदरम्यान स्पॉट झाली स्कोडा Kylaq; मिळणार अनेक नवीन बदल, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

स्ट्राँग रूम कुठे बनवल्या जातात?

स्ट्राँग रूम कुठेही बनवल्या जात नाहीत. त्या फक्त सरकारी इमारतींमध्येच बनवल्या जातात. ज्या सरकारी इमारतीत स्ट्राँग रूम बांधायची आहे, त्या इमारतीची आधीपासूनच निवड करण्यात येते आणि त्यानंतर तिच्या सुरक्षेसाठी पूर्ण व्यवस्था केली जाते. तसेच कोणत्याही पोलीस ठाण्यातही स्ट्राँग रूम बनवली जात नाही. स्ट्राँग रूम निवडण्यासाठी बरेच नियम पाळले जातात.

स्ट्राँग रूमच्या सुरक्षिततेसाठी काय केले जाते?

स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी जिल्हा अधिकारी व पर्यवेक्षक सातत्याने स्ट्राँग रूमला भेट देतात. स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी सेंट्रल पॅरा मिलिटरी फोर्स तैनात केली जाते. सेंट्रल पॅरा मिलिटरी फोर्स स्ट्राँग रूमच्या आतील बाजूचे संरक्षण करतात. या रूमच्या बाहेरील सुरक्षेची जबाबदारी राज्य सुरक्षा दलांची आहे. ते हातात बंदूक घेऊन असतात आणि तिसऱ्या ठिकाणी स्थानिक इमारतीभोवती पोलिस तैनात केले जातात. स्ट्राँग रूमची सुरक्षा खूप सतर्क असल्याने ती तोडून खोलीत प्रवेश करणे जवळपास अशक्य आहे. तसेच स्ट्राँग रूम ज्या ठिकाणी असते, तो संपूर्ण परिसर सीसीटीव्हीमध्ये कैद असतो आणि अधिकारी नियंत्रण कक्षात बसून निरीक्षण करतात.

हेही वाचा: Top 10 Poorest Country In The World: जगातील सर्वांत जास्त गरीब देश कोणते? पहिल्या दहामध्ये भारताचा समावेश आहे का? पाहा यादी

मतमोजणीच्या दोन तास अगोदर प्रत्येक स्तरावर लक्ष ठेवून स्ट्राँग रूम उघडली जाते आणि त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीच्या ठिकाणी नेली जातात. साधारणत: ज्या ठिकाणी स्ट्राँग रूम बांधली आहे किंवा त्याच्या शेजारीच मतमोजणी केली जाते. तसेच EVM डेटा १५ वर्षांसाठी सुरक्षित ठेवला जातो.