What is a cancelled cheque: हल्ली दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या सोशल मीडियाच्या वापरामुळे पूर्वीच्या आणि आताच्या अनेक गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात फरक पाहायला मिळतो. आता बँकिंग क्षेत्रातही अनेक नवे बदल करण्यात आले आहेत. आता बँक ग्राहकांना इंटरनेट बँकिंग सुविधा पुरवते; ज्यामुळे ग्राहकांना पैसे भरणे किंवा रोख पैसे काढणे आणि इतर सेवांसाठी बँकेच्या शाखांना भेट देण्याची गरज लागत नाही. त्यामुळे चेकबुक, डिपॉझिट स्लिप्स आणि इतर कागदी फॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. पण, पूर्वी या सर्व गोष्टी महत्त्वाचा भाग होत्या. दरम्यान, आता आपण कितीही आधुनिक झालो असलो तरीही बँकेशी संबंधित काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. त्या माहितीअंतर्गत रद्द केलेला चेक काय सूचित करतो आणि असा चेक कोणत्या परिस्थितीत उपयोगी पडू शकतो हे जाणून घ्या.

रद्द केलेला चेक कसा असतो?

रद्द केलेल्या चेकमध्ये दोन समांतर रेषाअसतात. या ओळींमध्ये ‘रद्द’ हा शब्द लिहिणेदेखील आवश्यक आहे. रद्द केलेल्या चेकवर स्वाक्षरी करण्याची गरज लागत नाही. रद्द केलेला चेक खाते क्रमांक, खातेदाराचे नाव, MICR कोड, बँकेचे नाव व शाखेचे नाव आणि IFSC कोड यांसारखे तपशील गोळा करण्यासाठी वापरला जाईल. तसेच, बँकेत जमा केलेल्या चेकमधून एकदा रक्कम काढली की, तो चेक रद्द केला जातो; जेणेकरून तो चेक पुन्हा वापरला जात नाही.

रद्द केलेला चेक काय दर्शवतो?

रद्द केलेला चेक बँकेत खाते उघडण्यासाठी पुरावा म्हणून उपयोगी येऊ शकतो. तुमच्या बँक खात्याच्या तपशिलांची पुष्टी करण्यासाठी तुम्ही रद्द केलेला चेक सबमिट करू शकता.

रद्द केलेला चेक कधी लागतो?

  • EMI

तुम्ही एखादी महागडी वस्तू खरेदी करता तेव्हा मासिक हप्ते (EMI) ही सर्वांत जास्त मागणी असलेली पेमेंट पद्धत आहे. कार लोन, होम लोन, एज्युकेशन लोन व पर्सनल लोन यांसारख्या कर्जाच्या बाबतीतही अनेक जण मासिक हप्ते भरतात. मासिक हप्त्यांची प्रक्रिया सुरू करण्यासाठी, तुम्ही बँक खाते असल्याचा पुरावा म्हणून रद्द केलेला चेक सबमिट करणे आवश्यक आहे.

  • म्युच्युअल फंड

जर तुम्ही म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करीत असाल, तर तुम्ही डीमॅट खाते उघडले पाहिजे. गुंतवणुकीशी संबंधित बँक खाते प्रत्यक्षात तुमचे आहे की नाही हे दाखविण्यासाठी आणि खाते उघडण्यासाठी तुम्ही रद्द केलेला चेक सबमिट करावा, असा कंपनीचा नियम आहे.

  • इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सेवा

इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सेवा तुम्ही केलेल्या कोणत्याही व्यवहारासाठी दर महिन्याला तुमच्या खात्यातून पैसे आपोआप कापते. या प्रकरणात आपण इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सेवा सेट करणे आवश्यक आहे.

हेही वाचा: जगातील ‘या’ देशांमध्ये आहेत सर्वाधिक नद्या; जाणून घ्या भारतातील नद्यांची संख्या

  • EPF पैसे काढण्यासाठी

जेव्हा तुम्ही तुमचे EPF पैसे काढू इच्छित असाल, तेव्हा कंपनी साधारणपणे रद्द केलेला चेक मागते.

  • विमा पॉलिसीसाठी

तुम्ही विमा पॉलिसी खरेदी करतानाही रद्द केलेला चेक आवश्यक असतो.