दरवर्षी वीज कोसळल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. वीज चमकणे एक नैसर्गिक घटना आहे. जेव्हा जास्त उष्णता आणि आर्द्रता असते तेव्हा विशेष प्रकारचे विजांचे मेघगर्जना करणारे ढग बनतात आणि वादळाचे रुप धारण करतात. पृष्ठभागापासून सुमारे ८-१० किमीवर या ढगांच्या खालच्या भागात निगेटिव्ह उर्जा आणि वरच्या भागात पॉझिटीव्ह उर्जा जास्त असते. जेव्हा दोन्हींमधील अंतर कमी होते तेव्हा त्यातून वीज वेगाने बाहेर येते. आपण ढगांमधील गडगडाट पाहू शकतो आणि त्यात कोणतेही नुकसान होत नाही. मात्र ढगांवरून वीज जमिनीवर आल्यावर मोठे नुकसान करते. वीज कोसळताना पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात ऊर्जा असलेला एक छोटासाच भाग खाली येतो. एकदा वीज कोसळल्याने कित्येक दशलक्ष वॅट्स ऊर्जा निर्माण होते. यामुळे आसपासचे तापमान १०,००० अंशांपासून ३०,००० अंशांपर्यंत वाढू शकते. परंतु, वीज कोसळल्याने होणारी जीवितहानी आणि वित्तहानी आता रोखता येऊ शकते. त्याकरता लाइटनिंग डिटेक्टर डिव्हाईस (Lightning Detection Device) उपलब्ध झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा