What is a sinkhole: पुणे शहरातील एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय. रस्ता खचल्यामुळे एक ट्रक पाहता पाहता रस्त्याच्या खड्ड्यात नाहीसा होतो, असे व्हिडीओत दिसते. ट्रकसह दोन दुचाकीही खड्ड्यात जातात. हा खड्डा ४० फूट खोल असल्याचे सांगितले जात आहे. अनेकांनी या घटनेवरून आश्चर्य व्यक्त केले आहे, तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी भाजपाने हा खड्डा सिंकहोल असल्याचा दावा केला आहे. मुंबईच्या सहार येथेही काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेल्या दिल्ली-मुंबई महामार्गावर राजस्थानच्या दौसा येथे असाच सिंकहोल पाहायला मिळाला होता.

सिंकहोल म्हणजे नेमके काय?

चीनमध्ये २०२० साली अशाचप्रकारचे मोठे खड्डे आढळून आले होते. त्यानंतर द इंडियन एक्स्प्रेसने त्या संदर्भात माहिती देणारा एक लेख प्रकाशित केला होता. सिंकहोल हे जमिनीच्या पृष्ठभागावर अचानक मोठे छिद्र निर्माण झाल्यामुळे तयार होते. ज्या ठिकाणी जमिनीखाली चुनखडी किंवा पाण्याने ठिसूळ होणारा दगड असेल, त्या ठिकाणी सिंकहोल होण्याची शक्यता असते. जमिनीच्या पृष्ठभागावरून जेव्हा पाणी झिरपते तेव्हा त्याच्यामुळे जमिनीखालील चुनखडी किंवा ठिसूळ दगडाचे विघटन होत राहते. अशावेळी जमिनीखालील दगडाची झिज झाल्यास त्या ठिकाणी भगदाड पडते. या भगदाडाला सिंकहोल म्हणतात.

60 feet road at chinchpada in kalyan east in worse condition
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील ६० फुटी रस्त्याची दुर्दशा; शाळकरी विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
maharashtra bjp chief bawankule s son audi hits several vehicles in nagpur driver arrested
बावनकुळेंच्या मुलाच्या कारची पाच वाहनांना धडक; नागपुरातील घटना; चालकासह एकाला अटक
pune markets crowded
पुणे: पूजा साहित्य, सजावट खरेदीसाठी शहराच्या मध्य भागात गर्दी, नदीपात्रातील रस्ता बंद असल्याने वाहतूक कोंडीमध्ये भर
pune metro, jangali maharaj road, FOB
जंगली महाराज रस्त्यावरील मेट्रोच्या पादचारी पुलामुळे नवा वाद? पुलाची उंची कमी असल्याबाबत गणेश मंडळांची नाराजी
Busy roads in Dombivli are closed for traffic on Krishna Ashtami
कृष्ण अष्टमीच्या दिवशी डोंबिवलीतील वर्दळीचे रस्ते वाहतुकीसाठी बंद
criminal murder pune, criminal murder by bouncer,
पुणे : मद्यालयातील बिलाच्या वादातून बाऊन्सरकडून सराइताचा खून, सिंहगड रस्ता भागातील घटना
old woman injured, leopard attack Ratnagiri Pali,
रत्नागिरी पाली येथे बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी

हे वाचा >> पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेला मुंबई-दिल्ली महामार्ग उंदरामुळे खचला, अजब दावा करणाऱ्या कर्मचाऱ्याची हकालपट्टी

मराठी विकीपीडियाने मुक्त ज्ञानाकोशातून दिलेल्या माहितीनुसार सिंकहोलला मराठीत विलयछिद्र किंवा भूछिद्र अशी नावे दिली आहेत. जमिनीत पाणी मुरल्यानंतर चुनखडीसारख्या खडकाचे विघटन होऊन एक पोकळी तयार होते. सिंकहोल तयार होण्याची प्रक्रिया अचानक किंवा संथपणेही घडू शकते.

सिंकहोल होण्याचे मानवी कारण?

सिंकहोल होण्याची नैसर्गिक कारणे वर पाहिली. तसे काही मानवी कारणांमुळेही सिंकहोल होऊ शकतो. ब्रिटीश जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, जमिनीखालील नाले, गटार, मलमूत्र वाहून नेणारे पाईप यांची पावसाच्या पाण्यामुळे होणारी हानी, मुसळधार पाऊस आणि वादळ यामुळे जमिनीखाली मानवनिर्मित नाल्यांची हानी होते. अशा नाले, गटारांमध्ये असलेली चुनखडी किंवा माती भुसभुशीत होऊन त्या ठिकाणी मोठा खड्डा पडतो.

पुण्यात पडलेले भगदाड सिंकहोल होते का?

पुण्यात रस्त्याला मोठे भगदाड पडल्यानंतर पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी याबाबत माध्यमांना माहिती देताना सांगितले की, ज्या ठिकाणी ट्रक रस्त्यात खचला, त्या ठिकाणी पूर्वी विहीर असल्याच्या खुणा दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी त्या जागेवर बांधकाम करून त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले होते. आज त्याच जागेवर ट्रक थांबविण्यात आला होता आणि त्या ट्रकचे वजन अधिक असल्याने पेव्हर ब्लॉक खचले, त्यामुळे क्षणात ट्रक पूर्णपणे खड्ड्यामध्ये गेल्याची घटना घडली.

खड्डा आणि सिंकहोल यात फरक काय?

एक्सवर आम्ही रायगडकर या अकाउंटवर सिंकहोल कसा तयार होतो, याबाबतचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. टेक इनसायडरचा हा व्हिडीओ सिंकहोलबाबत आपल्याला दृश्य माध्यमातून सविस्तर माहिती प्राप्त करून देतो. जमिनीच्या पृष्ठभागावर झीज झाल्यावर त्याला खड्डा म्हणतात, मात्र जमिनीच्या पृष्ठभागाखाली झीज झाल्यानंतर जे भगदाड पडते, त्याला सिंकहोल म्हणत असल्याचे या हँडलवर सांगितले गेले आहे.

महाराष्ट्रात बहुतेक करून बेसाल्ट खडकापासून जमीन तयार झाली आहे. त्यामुळे चुनखडकाचे विघटन होऊन भगदाड पडणे अवघड आहे. मात्र, मोठी गटारे किंवा सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईपची दुरूस्ती किंवा देखभाल न केली गेल्यास, असे भगदाड पडण्याची दाट शक्यता असते.

चीनमध्ये २०२० साली सिंकहोलमुळे दुर्घटना घडल्या होत्या. यावर सिंकहोल (sinkhole) नामक सिनेमाही आलेला आहे. निसर्गाला न जुमानता केलेला विकास मानवाच्या अंगाशी येत असल्याचे या चित्रपटात दाखविले गेले होते.