दिवाळीनंतर हिंदू धर्मातील लोक आपापल्या परंपरेनुसार लग्न करू लागतात. भारतासारख्या महान देशात, हिंदू धर्मात अनेक लहान-मोठे समुदाय आहेत, ज्यांची स्वतःची स्थानिक संस्कृती हिंदू चालीरीती आहे. त्यापैकी एक मैतेई समाजाचे लोक आहेत. ही प्रथा भारतातील मणिपूर राज्यातील आहे. नुकताच बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा याने त्याची गर्लफ्रेंड, मॉडेल लिन लैश्राम हिच्याबरोबर मैतेई परंपरेनुसार लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रणदीप हुड्डा यांनी ज्या परंपरेनुसार लग्न केले, त्याबाबत जाणून घेऊ या?

अभिनेता रणदीप हुड्डा यांनी मणिपूर येथील मॉडेल-अभिनेत्री लिन लैश्राम हिच्याशी २९ नोव्हेंबर रोजी इम्फाळमध्ये लग्न केले. त्यांच्या विवाह सोहळ्यात पारंपरिक मणिपुरी संस्कृतीची झलक सर्वांना पाहायला मिळाली. लग्नामध्ये त्याचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. मैतेई हा मणिपूरमधील लोकांचा एक जातीय समुदाय आहे. मणिपूरच्या सांस्कृतिकमध्ये रुजलेला मैईती विवाह हा परंपरा, समुदाय आणि विधी यांच्या मिश्रणाचा उत्सव आहे.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Indian communities Unity in Diversity
भारतात खरोखरच ‘विविधतेत एकता’ आहे का?
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
PM Modi
PM मोदींचा ‘मेक इन इंडिया’ पाठोपाठ आता ‘वेड इन इंडिया’वर भर; देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दलही केलं मोठं वक्तव्य

रणदीप हुड्डा यांनी एक्स (ट्विटर)वर शेअर केलेल्या लग्नाच्या आमंत्रणात महाभारताचे एक पान काढण्याचा उल्लेख केला होता. “अर्जुनाने मणिपुरी योद्धा राजकुमारी चित्रांगदाशी लग्न केलेल्या महाभारताचे एक पान काढून आम्ही आमच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रांच्या आशीर्वादाने लग्न करत आहोत,” असे त्याने पोस्टमध्ये लिहिले होते.

मैतेई परंपरेनुसार कसे पार पडते लग्न?


एबीपी न्यूजच्या माहितीनुसार, मैतेई पंरपरेनुसार वधूच्या कुटुंबातील तीन ज्येष्ठ महिला नवरदेवाच्या कुटुंबाचे स्वागत करतात. केळीच्या पानांनी झाकलेल्या प्लेटमध्ये सुपारी देऊन त्यांचे स्वागत केले जाते, ज्यामध्ये शुभेच्छा दिल्या जातात. या विधीमध्ये वधू आणि वर एका विशिष्ट प्रकारच्या पोशाखात असतात, ज्यामध्ये वधू पोटलोई स्कर्ट परिधान करते आणि नवरदेव पांढरा धोती कुर्ता परिधान करतो. येथे साक्षीदार म्हणून तुळशीच्या रोपांसह विवाह प्रक्रिया पूर्ण केली जाते. वधू-वरांना वर्तुळात बसवून लोक त्यांना पैसे देऊन त्यांचा सन्मान करतात. वधू, वराला हार घालून त्याचे स्वागत करते. या मैतेई विवाह सोहळ्याला मणिपुरी विवाह, ‘लुहोंगबा’ आणि ‘यम पानबा’ अशी अनेक नावे आहेत.

वधू वरला लग्नादिवशी कृष्ण आणि राधाच्या रूपात पाहिले जाते.

indianexpress.com शी संवाद साधताना मणिपूरमधील २५ वर्षीय अकोइजाम सुरंजॉय सिंग याने सांगितले की, “लग्नाच्या दिवशी वधू आणि वरांना भगवान कृष्ण आणि राधाच्या रूपात पाहिले जाते. लग्नाच्या दिवशी गायली जाणारी गाणी, ज्याला स्थानिक मैतेई बोलीमध्ये ‘लुहोंगबा’ म्हणतात, ते भगवान कृष्ण आणि राधा यांनाही समर्पित आहेत.

वधूसाठी लग्नाआधी काही तास खास तयार केला जातो पोटलोई स्कर्ट

वधू लिनने पोटलोई स्कर्ट परिधान केला होता, जो मजबूत फॅब्रिक आणि बांबूपासून बनलेला एक पारंपरिक पोशाख आहे. ड्रमसारख्या मणिपुरी वधूच्या पोशाखात कुशल पारंपरिक विणकरांनी हाताने भरतकाम केलेले महत्त्वपूर्ण धार्मिक आकृतिबंध आहेत. विशेष म्हणजे लग्नाच्या काही तास आधी वधूला पोटलोई शिवली जाते. पोटलोई ब्लाउजसह येतो, सामान्यत: गडद हिरव्या रंगाचा, कंबरेभोवती विणलेला पट्टा आणि इन्नाफी, जी वरच्या शरीराभोवती गुंडाळलेली नाजूक मलमलची शाल असते. सोन्याचे दागिने आणि शिरोभूषण (Headdress) वधूचे प्रतीक म्हणून परिधान केले जाते. कारण राधाला ‘झापा’ (Jhapa) म्हणतात, असे सुरंजय यांनी सांगितले.

पवित्रता आणि शांततेचे प्रतीक असलेले पांढरे वस्त्र नवरदेव परिधान करतो.

हुड्डा यांनी कोक्यात (Kokyet) नावाच्या पारंपरिक पगडीसह पांढरा कुर्ता, पांढरे धोतर परिधान केले होते. समारंभात त्यांनी एक साधी पांढरी शालदेखील परिधान केली होता, जी पवित्रता आणि शांततेचे चिन्ह आहे.

सुहास चॅटर्जी यांनी त्यांच्या A Socio-Economic History of South Assam या पुस्तकात जे लिहिले आहे त्यानुसार, “मैतेई जातीतील हिंदू धर्म बंगालच्या वैष्णव धर्मातून आणला गेला आहे, मैतेई हिंदूंचे विवाहामध्ये बंगालींच्या पारंपरिक वैवाहिक शैलीशी साम्य आहेत.”

मैतेई कोण आहेत?

मैतेई , ज्याला ‘मिताई, ‘मैथियी’ किंवा मणिपुरी असे देखील म्हणतात. मैतेई हा ईशान्य भारतातील मणिपूर राज्यातील प्रबळ वांशिक गट आहे. मैतेई मुख्यतः आजच्या मणिपूरच्या इम्फाळ खोऱ्यात राहतात, त्या शिवाय मोठ्या प्रमाणात आसाम, त्रिपुरा, नागालँड, मेघालय आणि मिझोराम या इतर भारतीय राज्यांमध्ये स्थायिक झालेले आहेत. भारतीय जनगणनेच्या २०११ च्या अहवालानुसार मणिपूरच्या लोकसंख्येच्या सुमारे ५३ टक्के लोकसंख्या मैतेई वंशीय गटाचे आहेत. मैतेई समाज मेइटी भाषा बोली म्हणून वापरतात, ही भाषा मणिपुरी भाषा म्हणूनही ओळखली जाते आणि ही भाषा भाषाशास्त्रानुसार तिबेटो-बर्मन भाषेच्या उप-कुटुंबात येते. भारताच्या मान्यताप्राप्त अधिकृत भाषांपैकी एक म्हणून ती १९९२ साली भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

मैतेई समाजाच्या धार्मिक परंपरा?

२०११ च्या जनगणनेनुसार, मैतेई समाज फक्त दोन धर्मांचे मोठ्या प्रमाणात पालन करतात, बहुतेक मैतेई हिंदू धर्माचे पालन करतात. सुमारे १६ टक्के मैतेई पारंपारिकपणे ‘सनमाही’ देवाच्या नावावर असलेल्या सनमाही धर्मावर विश्वास ठेवतात. सुमारे ८ टक्के मैतेई इस्लामचे पालन करतात. हिंदू रीतिरिवाजांचे पालन करणारे मैतेई आसपासच्या डोंगरी जमातींपासून सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न आहेत. हिंदू धर्म स्वीकारण्यापूर्वी त्यांनी मांस खाणे, गुरेढोरे बळी देणे आणि शिकार करणे सामान्य होते, परंतु आता ते मांस वर्ज्य मानतात (पण मासे खातात), मद्यपान करत नाहीत, गाईचा आदर करतात. कृष्णाच्या विशेष भक्तीसह हिंदू देवतांच्या पूजा करता परंतु पारंपारिकरित्या चालत आलेल्या देवतांच्या आणि आत्म्यांच्या उपासनेला मात्र ते विसरलेले नाहीत

Story img Loader