बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे बदललेली आहे. आता पुर्वीप्रमाणे लांब रांगांमध्ये बँक खाते उघडण्यासाठी वाट पाहावी लागत नाही. घरबसल्या अगदी काही मिनिटांमध्ये ऑनलाईन बँक खाते उघडता येते. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि काही आवश्यक कागदपत्र सबमिट केल्यास काही मिनिटांमध्ये बँक खाते उघडता येते. बँक खात्याबाबत तुम्ही ‘झिरो बॅलन्स अकाउंट’ असे ऐकले असेल. हे खाते काय असते? ते कसे सुरू करायचे जाणून घ्या.
झिरो बॅलन्स अकाउंट हे कोणत्याही इतर बँक खात्याप्रमाणेच असते. फक्त या खात्यामध्ये किंमत रक्कम शिल्लक असावी अशी अट नसते. ज्या व्यक्तींना शिल्लक रक्कम ठेवायची चिंता न करता सेविंग्स अकाउंटचा लाभ घ्यायचा असेल त्यांच्यासाठी झिरो बॅलन्स अकाउंट उत्तम पर्याय आहे. ऑनलाईन झिरो बॅलन्स अकाउंट कसे उघडायचे जाणून घ्या.
आणखी वाचा: ‘यात्रीगण कृपया ध्यान दे…’ रेल्वे स्थानकांवर ऐकू येणाऱ्या आवाजामागील चेहरा; जाणून घ्या कशी झाली निवड
ऑनलाईन झिरो बॅलन्स अकाउंट उघडण्यासाठी पुढील स्टेप्स वापरा
- बँकेची अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल बँकिंग अॅप उघडा.
- मोबाईल नंबर सबमिट करून प्रक्रिया सुरू करा.
- त्यानंतर विचारण्यात आलेले सर्व डिटेल्स (आयडी प्रूफ, फोन नंबर इ.) सबमिट करा.
- आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स अशी सर्व आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. याव्यतिरिक्त २ पासपोर्ट साईज फोटोंची पण आवश्यकता असते.
- त्यानंतर व्हिडीओ केवायसी व्हेरीफीकेशन करा. केवायसी व्हेरीफीकेशन सर्व ऑनलाईन बँकिंगसाठी अनिवार्य करण्यात आले आहे.
- सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर खातेधारकाला अकाउंट नंबर आणि कस्टमर आयडी नंबर पाठवला जाईल. या नंबरचा वापर करून खातेधारकाला झिरो बॅलन्स सेविंग्स अकाउंटमध्ये सहज लॉग इन करता येईल.