Air Quality Index Information in Marathi : गेल्या काही दिवसांपासून देशातील हवा बिघडत जातेय. वायू प्रदूषणात वाढ झाल्याने आरोग्याची चिंता सतावतेय. अनेक ठिकाणी श्वसनासंबंधीचे आजार डोके वर काढू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावत जात असल्याचं वृत्त प्रसिद्ध होतंय. पण हवेचा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे काय? त्याचा नेमका वापर काय? तो कसा मोजतात? याचे परिणाम काय? याविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊयात.

हवेचा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे काय? (What is Air QUality Index)

हवेतील प्रदुषणाचे मोजमाप म्हणजेच हवेचा गुणवत्ता निर्देशांक होय. वायुप्रदूषणाची पातळी दर्शविण्यासाठी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index – AQI) सांगितला जातो. त्यावरून त्या त्या दिवसाची वायुप्रदूषण पातळी किती आहे, याचा अंदाज घेतला जातो.

Factors influencing dryland agricultural productivity
कडधान्ये/डाळी पिकविणाऱ्या शेतकऱ्याला “लाडका शेतकरी” म्हणा!
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
What exactly is wealth management
मार्ग सुबत्तेचा : संपत्ती व्यवस्थापन म्हणजे नक्की काय?
Ratan Tata
‘टाटा’असणं हीच जबाबदारीची जाणीव
how the rare Samsaptak Yog formed by Jupiter and Venus after Dussehra
दसऱ्यानंतर गुरू शुक्र निर्माण करतील समसप्तक योग, ‘या’ चार राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अपार पैसा अन् धनसंपत्ती
marburg virus
जगातील सर्वांत घातक विषाणूमुळे आतापर्यंत १२ लोकांचा मृत्यू; काय आहे मारबर्ग व्हायरस? त्याची लक्षणं काय?
Reserve Bank of india loksatta vishleshan
विश्लेषण: रिझर्व्ह बँकही फेडरल रिझर्व्हचे अनुकरण करत व्याजदर कपात करेल?
stock market Nifty Nifty Index investment
बाजाराचा तंत्र-कल : निफ्टीच्या २५,८०० ते २६,१०० या तेजीच्या वाटचालीतील अवघड टप्पा

हवेचा गुणवत्ता निर्देशांक कसा मोजतात?

सुक्ष्म कण (PM 2.5 आणि PM 10), ओझोन (O3), नायट्रोनज डायऑक्साइड (NO2), सल्फर डायऑक्साइड (SO2), कार्बन मोनॉऑक्साइड (CO) हवेत हे प्रदूषित घटक असतात. हे प्रदूषक घटक हवेत मिसळल्यास वायू प्रदूषण होते. या प्रदूषकांची सांद्रता मूल्ये तपासली जातात. त्यानुसार, हवेचा गुणवत्ता निर्देशांक काढला जातो.

हेही वाचा >> पावसामुळे मुंबई, दिल्लीतील वायू प्रदूषण कमी होऊन हवेची गुणवत्ता कशी सुधारली?

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, ‘एक्यूआय’मुळे विविध प्रदूषकांचे हवेतील जटिल प्रमाण एकच संख्या (निर्देशांक), नाव व रंग यांद्वारे पाहता येणे शक्य झाले आहे. ‘एक्यूआय’द्वारे पीएम १०, पीएम २.५ या सूक्ष्म कणांची आणि नायट्रोजन डाय-ऑक्साइड, ओझोन, कार्बन आदी प्रदूषकांची मोजदाद केली जाते.

हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक वाऱ्याचा वेग आणि दिशा, भूप्रदेश, धुराचे लोट, रहदारी, सुक्ष्म कण प्रदूषण उत्सर्जित करणारे इतर स्त्रोत या घटकांनाही प्रभावित करतात.

हवेच्या गुणवत्ता निर्देशांकांच्या सहा श्रेणी

२०१४ साली भारतात रंगांच्या साह्याने एक्यूआय निर्देशांक दाखविण्यास सुरुवात झाली. या निर्देशांकामुळे सरकार आणि सामान्य नागरिकांनाही हवेच्या गुणवत्तेचा अचूक अंदाज घेणे शक्य होत आहे. वैद्यकीय क्षेत्र, वायुप्रदूषण अभ्यासक, शिक्षण क्षेत्र, विविध संस्था अशा क्षेत्रांतील तज्ज्ञांना एकत्र करून, तांत्रिक अभ्यासाद्वारे आयआयटी -कानपूर यांच्यातर्फे एक्यूआय निर्देशांक दाखविण्यास सुरुवात करण्यात आली.

या निर्देशांकाच्या ० ते ५० चांगली, ५० ते १०० समाधानकारक, १०० ते १५० मध्यम प्रदूषित, १५१ ते २०० खराब, २०१ ते ३०० अतिशय खराब व ३०० ते ५०० गंभीर परिस्थिती, अशा सहा श्रेणी आहेत. या सहा श्रेणींनुसार एखद्या शहरातील हवा चांगली की वाईट हे ठरवलं जातं.

या श्रेणींनुसार रंगही दिले जातात

० ते ५० चांगल्या हवेच्या स्थितीला हिरवा रंग आहे, ५० ते १०० समाधानकारक स्थितीला पिवळा रंग, १०१ ते १५० मध्यम प्रदूषित स्थितीला नारिंगी, १५१ ते २०० खराब स्थितीला लाल रंग, २०१ ते ३०० अतिशय खराब स्थितीत निळा रंग आणि ३०० ते ५०० गंभीर परिस्थिती चॉकलेटी रंग दिला जातो.

AQI चा उपयोग काय?

हवेचा गुणवत्ता निर्देशांकामुळे वायू प्रदूषण रोखण्याकरता सरकारी पातळीवर कार्य हाती घेता येतं. दिल्ली, मुंबईसारख्या शहरांत सध्या झपाट्याने वायू प्रदूषण होतंय. त्यावर उपाय म्हणून बांधकामे थांबवण्यात आली आहेत, रस्त्यांवर पाण्याचा फवारा केला जातोय, तर इतरही पर्यावरणी उपायांचा वापर केला जातोय. परिणामी वायू प्रदूषणाची दाहकता कमी करता येते.