तुम्ही वापरत असलेल्या स्मार्टफोनमध्ये Airplane Mode नावाचे सेटिंग असते त्याला ‘फ्लाइट मोड’ असंही म्हणतात. याचा वापर विमानातून प्रवास करताना केला जातो. पण विमान प्रवासादरम्यान आपला फोन फ्लाईट मोडवर ठेवायला का सांगतात? तो फ्लाईट मोडवर ठेवल्यामुळे आणि न ठेवल्यामुळे प्रवासात काय फरक पडतो. शिवाय या मोडमध्ये आपण मोबाईल वापरु शकतो का? असे अनेक प्रश्न तुम्हाला कधीतरी पडले असतील, या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे तुमचा फोन फ्लाइट मोडवर असताना त्याचा वापर कसा करायचा ? याबद्दल जाणून घेऊया Airplane Mode मध्ये मोबाईलचा वापर कसा करायचा.

सर्वात महत्वाची गोष्टी म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये Airplane Mode अ‍ॅक्टीव्ह करता त्यावेळी रेडिओ-फ्रिक्वेंसी सिग्नल ट्रान्समिशन बंद केलं जातं. त्यामुळे तुमचा सेल्युलर नेटवर्कशी संपर्क तुटतो. हा संपर्क तुटल्यामुळे तुम्ही तुमच्या फोनद्वारे कोणाला कॉल, मेसेज पाठवू शकत नाही. तसंच इंटरनेचा वापरही करता येत नाही.

पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य X/@Official_PIA)
Pakistan Airlines : पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Image Of passengers
Mumbai-Prayagraj Flight Fare : महाकुंभमुळे विमान प्रवास १६२ टक्क्यांनी महागला, जाणून घ्या मुंबई-प्रयागराज विमानाचे तिकीट दर
Sudhir Mehta expressed his opinion regarding Pune Airport Pune news
‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
Ban, laser light beam, Shirdi airport area,
शिर्डी विमानतळ परिसरात लेझर प्रकाश किरण वापरास बंदी
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
Drones will monitor illegal fishing and boat entry in Thane and Palghars bay
अनधिकृत मासेमारी आणि नौकांवर ड्रोनद्वारे नजर
Chief Minister Devendra Fadnavis orders to complete airport works at the earliest Mumbai news
विमानतळांची कामे वेगाने पूर्ण करा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

हेही वाचा- प्रवाशांसाठी खुशखबर! विमान प्रवासादरम्यान वापरता येणार मोबाईल, Airplane Mode होणार भूतकाळात जमा; कारण…

‘फ्लाइट मोड’मध्ये मोबाईल वापरता येतो का ?

तुमचा मोबाईल ‘फ्लाइट मोड’वर टाकला तरी तुम्हाला तो वापरता येतो. तुम्ही फोटो काढण्यासाठी किंवा व्हिडिओ शूट करण्यासाठी मोबाईलचा वापर करु शकता. तसंच गाणी ऐकणं, ऑफलाइन गेम खेळण्यासह अनेक गोष्टी तुम्ही मोबाईलमध्ये करु शकता. मात्र, ज्या ऑफलाई सुविधा आहेत त्याच गोष्टींचा तुम्ही लाभ घेऊ शकता. कारण, या ‘फ्लाइट मोड’मध्ये ‘इंटरनेटची सुविधा उपलब्घ नसते.

तुमचा स्मार्टफोन ‘फ्लाइट मोड’वर कसा टाकाल?

  • मोबाईलमधील सेटिंग्ज अ‍ॅप उघडा.
  • इंटरनेट आणि नेटवर्क’ पर्यायावर क्लिक करा.
  • Airplane Mode अ‍ॅक्टीव्ह करा.

यानुसार तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये Airplane Mode अ‍ॅक्टीव्ह करु शकता. मात्र, जेव्हा तुम्ही या मोडवर मोबाईल टाकाल, तेव्हा तुमच्या मोबाईलमधील ब्लूटूथ, Wi-Fiआणि मोबाइल नेटवर्क या सुविधा आपोआप बंद होतील. तुम्ही जर आयफोन वापरत असाल तर तुम्हाला कंट्रोल सेंटर उघडावं लागेल. त्यानंतर Airplane Mode च्या बटणावर क्लिक करावं लागेल. तसंच फोन सेटिंग्जमध्ये जाऊनही तुम्ही हा मोड अ‍ॅक्टीव्ह करु शकता.

हेही वाचा- व्हिडीओकॉल सुरू असताना वापरता येणार दुसरे अ‍ॅप्स; काय आहे WhatsApp चे नवे फीचर जाणून घ्या

‘फ्लाइट मोड’ काय करतो?

तुम्ही ‘फ्लाइट मोड’ अ‍ॅक्टीव्ह केल्यानंतर तुमच्या स्मार्टफोनमधील सेल्युलर डेटा, Wi-Fi आणि GPS या कार्यप्रमाणाली आपोआप डीअ‍ॅक्टीव्ह होतात.

  • सेल्युलर – सेल्युलर सेवा बंद झाल्यानंतर तुमच्या मोबाईलचा आणि मोबाईल टॉवर्सच्या नेटवर्कचा संपर्क तुटतो. ज्यामुळे तुम्ही कोणालाही कॉल वा मेसेज करु शकत नाही.
  • Wi-Fi – ‘फ्लाइट मोड’ अ‍ॅक्टीव्ह करताच तुम्ही आधीपासून लॉग इन केलेले Wi-Fi नेटवर्क डिस्कनेक्ट केले जाते.
  • GPS – ‘फ्लाइट मोड’मध्ये GPS प्रणाली अकार्यक्षम होते.

विमान प्रवासात ‘फ्लाइट मोड’ का महत्वाचा असतो?

हेही वाचा- Laptop खराब होण्याची चिंता विसरा; स्वच्छ करताना वापरा ‘या’ सोप्या टिप्स

विविध राष्ट्रांच्या विमान प्रवासाच्या नियमांनुसार सिग्नल प्रसारित करणारी उपकरणे विमानात वापरली जाऊ शकत नाहीत. विमानचालक आणि नियंत्रण कक्षातील संभाषण रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे होत असते. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणं विमान संप्रेषण आणि नेव्हिगेशन प्रणाली सारखे Frequency Signal सोडू शकतात. या संप्रेषणामुळे विमानातील संवेदनशील उपकरणे खराब होण्याची शक्यता असते. जे विमानाच्या सिग्नलमध्ये व्यत्यय आणू शकतात. म्हणून विमान प्रवासादरम्यान मोबाईल ‘फ्लाइट मोड’वर टाकतात जेणेकरुन प्रवासात काही अडथळा येणार नाही.

मोबाईल ‘फ्लाइट मोड’ वर असताना नेमकं काय होतं?

मोबाईल ‘फ्लाइट मोड’मध्ये असताना मोबाइलची इतर सर्व कार्यप्रणाली काम करणं बंद करते. त्यामध्ये मोबाइल डेटा वाय-फाय सह GPS प्रणालीचा समावेश असतो.

विमान प्रवासादरम्यान ‘फ्लाइट मोड’ का वापरावा ?

तुमच्यासह इतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमान प्रवासादरम्यान मोबाईल ‘फ्लाइट मोड’ वर टाकायला हवा. कारण, तुमच्या मोबाईल फोनमधील नेटवर्कच्या Frequency Signal मुळे विमानातील काही गंभीर उपकरणे खराब होण्याची शक्यता असते.

विमान प्रवासात WhatsApp वापरू शकता का?

विमान प्रवासादरम्यान तुम्ही नक्कीच व्हॉट्सअ‍ॅप वापरु शकता, परंतु केवळ Wi-Fi द्वारे कनेक्ट केले असताना. कारण. मोबाईल ‘फ्लाइट मोड’वर असताना सेल्युलर कनेक्शन वापरण्यास मनाई असते. त्यामुळे तुम्ही एसएमएस पाठवू शकत नाही.

‘फ्लाइट मोड’ चालू/बंद कधी करायचा ?

विमानातील क्रूने तुम्हाला सूचना देताच, तुमचा मोबाईल ‘फ्लाइट मोड’वर टाका. शिवाय तुमचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर विमानाचे दरवाजे उघडताच, किंवा क्रूने पुन्हा सुचना करताचं तुम्ही ‘फ्लाइट मोड’ बंद करू शकता.

Story img Loader