What is Benching in Dating : गेल्या काही वर्षांपासून मैत्री, प्रेम या नात्यातील संकल्पना बदलत गेल्या. शाळातील मैत्री, शाळेतील प्रेम किंवा कॉलेजची मैत्री, कॉलेजचं प्रेम या संकल्पना जुनाट ठरल्या अन् मागे पडत गेल्या. त्यामुळे नात्यांतील नव्या संकल्पनांचा उगम झाला. अगदी आताचा प्रवास सिचवेशनशिपपर्यंत (Situationship) आला आहे. याही पलिकडे जाऊन काही प्रेमीयुगुल भावनिकदृष्ट्या अधिक गुंतून न राहता एकमेकांना फक्त बेंचिग करत असतात. म्हणजे एकमेकांकडे फक्त पर्याय म्हणून बघत असतात. आजच्या तरुणांमध्ये या बेंचिगचं वेड अधिक वाढल्याचं दिसतंय. त्याविषयी अधिक जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिंजर डिन या सायकोथेरेपिस्टने बेचिंगचा अर्थ उलगडून सांगितला आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय की, बेचिंग या प्रकरात दोघांपैकी एकही जण डेटिंग प्लान करत नाही. पण ते मेसेज वा कॉल्सवरून एकमेकांशी सतत कनेक्टेड राहतात. तुमच्याकडून कोणत्याही भावनिक नात्याची अपेक्षा न करता तुम्हाला बॅकअप प्लान म्हणून तुमच्या संपर्कात राहतात.

हेही वाचा >> Diamond Crossing : महाराष्ट्रातील ‘या’ शहरात आहे डायमंड क्रॉसिंग; चारही बाजूने धावतात ट्रेन, तरीही होत नाही अपघात

म्हणजेच बेचिंग म्हणजे डेटिंगमधील एक अशी पद्धत जी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीमध्ये थोड्या वेळासाठी किंवा तात्पुरते रस दाखवते. पण ही व्यक्ती दीर्घकाळ आयुष्यात राहावी यासाठी प्रयत्न करत नाही. आजच्या शब्दांत सांगायचं झालं तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ‘राखीव’ ठेवते. म्हणजे त्या व्यक्तीला तत्काळ नकार देत नाही किंवा दूरही लोटत नाही. पण त्याचा वापर दुसऱ्या पर्यायांची चाचणी घेण्यासाठी किंवा होल्ड करण्यासाठी केला जातो.

बेचिंगची वैशिष्ट्य काय?

  • बेचिंग करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला थोडाफारच वेळे देते किंवा अधून मधून भेटत राहते. बेचिंग करणाऱ्या व्यक्तींच्या संवादात फारसं गांभीर्य नसतं. त्यामुळे या नात्यांत फारशी गुंतागुंत होत नाही.
  • काही प्रकरणात बेचिंग करणारी व्यक्ती डेटिंगलाही जाते. पण हे डेटिंग दीर्घकाळ ठेवण्याबाबत अनिश्चित असते.
  • बेचिंगप्रकारात एखादी व्यक्ती दुसरे पर्यायही बाहेर शोधत असते.
  • इतर नात्यांप्रमाणे बेचिंग प्रकारातील जोडपीही कनेक्टेड राहण्याकरता सोशल मीडियाचा वापर करतात. पण प्रत्यक्ष भेटीला टाळाटाळ केली जाते.

बेचिंगचे दुष्परिणाम

एखाद्या प्रेमीयुगुलात एखादी व्यक्ती बेंच करत असेल तर त्याचा निश्चितच दुसऱ्यावर परिणाम होतो. यातून नातेसंबंध तुटण्याचीही शक्यता असते. नात्यात गोंधळ निर्माण होतो. हे नातं ठेवावं की ठेवू नये अशीही परिस्थिती निर्माण होते. तसंच, विश्वासघाताचे प्रमाण यामुळे वाढते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is benching in dating new idea of relationship in next generation sgk