What Is Birthday Blues : वाढदिवस म्हणजे आनंदाने घालवलेल्या क्षणांकडे मागे वळून पाहणे, वाढदिवस असणारा दिवस साजरा करणे आणि येणाऱ्या नवीन दिवसांची वाट पाहणे. काही जण वाढदिवसासाठी खूप दिवस आधीपासूनच तयारी करण्यास सुरुवात करतात, नवीन कपडे घेतात. पण, काही जण त्यांच्या वाढदिवसासाठी उत्साही नसतात, त्यांना थकवा जाणवतो. म्हणजेच प्रत्येकाचाच वाढदिवस हा आनंदी नसतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाढदिवसाच्या दिवशी काहींच्या मनात नकारात्मक विचार येतात. एखादे दुःख, चिंता सतत भेडसावत राहतात किंवा काही जण वाढदिवसाच्या दिवशी रडतात, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वाढदिवस साजरा होत नाही. जर तुमच्याही वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला असे अनुभव येत असतील, तर तुम्ही एकटे नाही आहात. कारण वाढदिवसाच्या दिवशी दुःखी किंवा निराश होणे यालाच ‘बर्थ डे ब्लूज’ ( Birthday Blues )असं नाव देण्यात आलं आहे आणि असे अनुभव येणारे जगात अनेक लोक आहेत; असे थेरपिस्ट अँड्रिया इव्हगेनिओ यांनी म्हटले आहे.

तर वाढदिवसाच्या दिवशी नेमकं असं का घडतं? ‘बर्थ डे ब्लूज’ची नेमकी (Birthday Blues) कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखातून सविस्तर जाणून घेऊयात…

१. पहिलं कारण म्हणजे वाढदिवस असा काळ असतो, जेव्हा लोक त्यांच्या भूतकाळाकडे वळून पाहतात आणि त्यांच्या इच्छा, आकांक्षांचा न्याय करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच जेव्हा त्यांना असे वाटते की, त्यांना ज्या गोष्टी हव्या होत्या त्या त्यांनी वर्षभरात सिद्ध केल्या नाहीत आणि तेव्हा त्यांना कमीपणा वाटू लागतो.

२. वाढदिवस आपल्या आवडत्या व्यक्तींसह साजरा करण्याची इच्छा प्रत्येकाला असते. तर वाढदिवसाच्या दिवशी जेव्हा एखाद्या प्रिय व्यक्तीचे निधन होते किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीपासून आपण विभक्त होतो किंवा त्यांना आपल्यासाठी वेळ नसतो, तेव्हा वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या अनुपस्थितीची उणीव भासू लागते आणि म्हणून आपण दुःखी होतो.

हेही वाचा…Shravan 2024: उत्तर भारतात व महाराष्ट्रात वेगवेगळ्या तारखांना का सुरू होतो श्रावण? ‘हे’ आहे कारण; जाणून घ्या

३. काही जण मित्र-मैत्रिणींना पार्टी द्यायची आहे, आपल्याला मिळालेल्या महागड्या भेटवस्तूच्या बदल्यात आपण समोरच्याला रिटर्न गिफ्ट म्हणून काय देणार आदी गोष्टींचा विचार त्यांना तणावग्रस्त करू शकतो. म्हणजेच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी वाढदिवस हा तणावपूर्व असू शकतो.

४. माझ्या वाढदिवसाला मला काय गिफ्ट मिळेल, मला कसं सरप्राईज दिल जाईल, या गोष्टीचा आपण तर्कवितर्क लावून किंवा अपेक्षा मनात बाळगून मोकळे होतो. मग वाढदिवस एका विशिष्ट पद्धतीने साजरा होत नाही आणि मग तेव्हा एखाद्या व्यक्तीचं मन दुखावलं जाऊ शकतं.

५. जेव्हा लोकांना वाढदिवसाच्या दिवशी कोणी मेसेज, कॉल करत नाही, त्यांना भेटायला येत नाही; तसेच एखाद्या जवळच्या व्यक्तीचे निधन होणे आदी अनेक गोष्टी घडल्या की हे प्रसंग त्यांना राहून राहून आठवतात आणि त्यांना दुःखी करू शकतात.

तर वाढदिवसाच्या दिवशी दुःखी होण्याची म्हणजेच ‘बर्थ डे ब्लूज’ ( Birthday Blues ) च्या लक्षणांची ही मुख्य कारणे आहेत.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is birthday blues from losing a loved one to financial crunch birthdays can make us feel negative and unhappy asp