Blue Zone : एका अहवालानुसार एक व्यक्ती सरासरी ७० ते ८० वर्षे जगतो. मात्र, जगात अशीही काही ठिकाणे आहेत त्या ठिकाणी लोक सरासरी १०० वर्ष जगतात. एवढंच नाही तर त्या ठिकाणी राहणारे लोक फक्त १०० वर्ष जगत नाहीत तर ते निरोगी जीवन जगतात. आता तुम्हाला जर सांगितलं की अशी काही ठिकाणे आहेत, जिथे लोक १०० वर्षे राहतात? अनेकांना यावर विश्वास बसणार नाही. मात्र, जगभरात पाच ठिकाणे असे आहेत की त्या ठिकाणी लोक इतर ठिकाणांपेक्षा जास्त काळ राहतात. या संदर्भातील माहिती आपण आज जाणून घेऊयात.
जगभरातील पाच ‘ब्लू झोन’ कोणते?
जगभरात असे काही ठिकाणे आहेत तेथे लोक १०० वर्षांपेक्षा जास्त काळ जगतात. अशा ठिकाणांना ब्लू झोन असं म्हटलं जातं. जगभरात असे ब्लू झोन हे कोस्टा रिकामधील निकोया, इटलीमधील सार्दिनिया, जपानमधील ओकिनावा, ग्रीसमधील इकारिया, अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील लोंबा लिंडा या ठिकाणी आहेत. या ठिकाणी राहणाऱ्यांचं सरासरी वय १०० वर्षे आहे. याच ठिकाणांना ब्लू झोन म्हटलं जातं.
हेही वाचा : ट्रॅफिक लाइटचा शोध कोणी लावला? जाणून घ्या यामागचा इतिहास
दरम्यान, २००४ मध्ये जियानी पेस आणि मिशेल पौलेन या संशोधकांनी इटलीमधील सार्दिनिया नावाचे ठिकाण शोधून काढले. त्या ठिकाणी लोक इतर ठिकाणांपेक्षा जास्त काळ राहतात. त्यानंतर डॅन बुएटनर यांनी ब्लू झोन म्हणून ओळखले जाणारे आणखी चार ठिकाणे शोधली. या भागात राहणारे लोक इतरांच्या तुलनेत जास्त निरोगी आयुष्य जगतात.
ब्लू झोनमध्ये लोक १०० वर्षे कसे जगतात?
तज्ञांच्या मते त्या ठिकाणची पर्यावरणीय परिस्थिती, आहाराच्या सवयी, जीवनशैली, सवयी आणि या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची जीवनशैली ही प्रामुख्याने वनस्पती आधारित आहाराभोवती फिरते. येथील लोक मांस आणि मासे यांचे सेवन फार मर्यादित करतात. तसेच धान्य, फळे आणि भाजीपाला त्यांच्या आहारात जास्त असतो. तसेच विशेष म्हणजे ब्लू झोनमध्ये राहणाऱ्या लोकांची जीवनशैली साधी आणि सोपी असते.
सिंगापूर नवीन ब्लू झोन बनला?
जगभरात अशी पाच ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी लोकांचे सरासरी आयुष्य १०० वर्षे आहे. या पाच ठिकाणांमध्ये आता आणखी एक नावाचा समावेश झाल्याची माहिती सांगितली जाते. यामध्ये सिंगापूर हा नवीन ब्लू झोन बनला आहे. यामध्ये २०१०, २०२०, २०२३ या काळात १०० वर्षांवरील लोकांची संख्या दुप्पट झाल्यामुळे सिंगापूरला सहावा नवा ब्लू झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र, अजूनही काही लोक सिंगापूरला ब्लू झोन मानत नाहीत.