What is Bonus Shares: शेअर मार्केट हा अनेकांच्या आवडीचा विषय आहे. अनेक मंडळी शेअर्सद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवतात त्यामुळे शेअर माक्रेटमधील छोट्या छोट्या घडामोडींकडे लोकांचे लक्ष असते. शेअर मार्केटमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याविषयी अनेकांना माहिती नसते. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयासंदर्भात जाणून घेणार आहोत. तुम्हाला बोनस शेअर म्हणजे काय, माहितीये का? हा बोनस शेअर कोणाला मिळतो? या बोनस शेअर्सचा फायदा काय आहेत, आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. (what is bonus share and To whom does the company give bonus shares read details)

बोनस शेअर्स म्हणजे शेअर होल्डर्सना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय दिलेले अतिरिक्त शेअर्स. हे शेअर्स शेअर होल्डर्सच्या मालकीच्या शेअर्सच्या संख्येवर आधारित असतात. हे प्रमाण कंपनी ठरवते. ही कंपनीची साठवलेली कमाई असते, जी शेअर होल्डर्सना काही शेअर विनामोबदला म्हणजे मोफत देते.

Amol Mitkari On Maharashtra Cabinet Expansion
Amol Mitkari : मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? गृहमंत्रिपद कोणाकडे जाणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं भाष्य
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
8 December Aries To Pisces Horoscope Today
८ डिसेंबर पंचांग: कोणाला होईल अचानक धनलाभ ते कोणाचा वाढेल ताण; जन्मराशीनुसार आजचा रविवार १२ राशींसाठी कसा असणार?
Vishal Mega Mart IPO
Vishal Mega Mart IPO Date : तुफान कमाई करून देणार ८,००० कोटींचा हा आयपीओ; पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, जाणून घ्या संपूर्ण माहिती….
Bigg Boss 18 Karan Veer Mehra Opens Up About His Ex Wives watch new promo
Bigg Boss 18: करणवीर मेहराने पूर्वाश्रमीच्या दोन पत्नीविषयी केलं भाष्य, भावुक होत म्हणाला, “दोघींच्या आयुष्यात मी…”
Upcoming Tata Cars in India 2024 & 2025
Upcoming Tata Cars : पैसे तयार ठेवा, नवीन वर्षात टाटाच्या ‘या’ ३ जबरदस्त कार होणार लाँच; जाणून घ्या दमदार फिचर्स
GPS Full form what is gps stands for how it works
‘GPS’चा फूल फॉर्म तुम्हाला माहितीये का? ते कसे काम करते व त्याचा वापर काय, जाणून घ्या

हेही वाचा : ‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी

कंपनी बोनस शेअर का देते?

कंपनीला आपला व्यवसाय वाढवायचा असतो आणि गुंतवणूकदाराला लाभांश हवा असतो. हा लाभांश दिला तर कंपनी अधिक गुंतवणूक करून व्यवसाय वाढवू शकणार नाही, म्हणून अशा परिस्थितीत कंपनी काही जास्तीचे शेअर विनामोबदला देते. हे जास्तीचे शेअर विकून शेअर होल्डर्स त्यांना हवा तेवढा पैसा घेऊ शकतात.

कोण असतात बोनस शेअरसाठी पात्र

जे लोक एक्स डेट आणि रेकॉर्ड डेटपूर्वी कंपनीच्या शेअर्सचे मालक आहेत त्यांना बोनस शेअर मिळू शकतात. भारतात शेअर्स मिळवण्यासाठी T+2 रोलिंग सिस्टम आहे, ज्यामध्ये रेकॉर्ड डेट ही एक्स डेटच्या दोन दिवस मागे असते.
बोनस शेअरचा मुख्य उद्देश कंपनीमध्ये सहभाग आणि कंपनीची किंमत वाढवणे होय.

हेही वाचा : Vishal Mega Mart IPO Date : तुफान कमाई करून देणार ८,००० कोटींचा हा आयपीओ; पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, जाणून घ्या संपूर्ण माहिती….

बोनस शेअर्सचा गुंतवणूकदारांना काय फायदा होतो?

गुंतवणूकदारांना कंपनीचे बोनस शेअर मिळवताना कोणताही टॅक्स भरावा लागत नाही.

बोनस शेअर कंपनीच्या लाँग टर्म शेअर होल्डर्ससाठी फायदेशीर आहे, ज्यांना गुंतवणूक केलेली रक्कम वाढवायची असते.

बोनस शेअर शेअर होल्डर्ससाठी फ्री असतात, कारण हे शेअर्स कंपनीद्वारे जारी केले जातात, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे कंपनीमध्ये शेअर वाढतात आणि स्टॉकची किंमतसुद्धा वाढते.

Story img Loader