Brain Rot Causes Symptoms Treatment : तुमचा मेंदू पूर्वीप्रमाणे कुशाग्रपणे काम करत नाही अशी जाणीव तुम्हाला झाली आहे का? किंवा तुमचा मेंदू पूर्वीप्रमाणे गोष्टी स्मरणात ठेवत नाही असं कधी वाटलं आहे का? असं वाटत असेल तर ‘ब्रेन रॉट’ हा शब्दही तुम्ही वाचलाच असेल. या शब्दाला २०२४ मध्ये ऑक्सफर्ड शब्दाचा मानकरी असा बहुमान मिळाला आहे. मात्र ब्रेन रॉट म्हणजे काय? यापासून वाचण्यासाठी काय उपाय करता येतात? हे आपण जाणून घेऊ.

‘ब्रेन रॉट’ म्हणजे काय ?

शब्दकोशात दिलेल्या अधिकृत अर्थानुसार, ‘ब्रेन रॉट’ म्हणजे एखाद्या व्यक्तीचे मानसिक किंवा बौद्धिक आरोग्य काही प्रमाणात बिघडणे. विशेषतः अतिशय किरकोळ अशा ऑनलाइन साधनांच्या अतिवापरामुळे होणारा परिणाम. याचा थोडक्यात उलगडा करून सांगायचा झाल्यास सोशल मीडियावर तासन् तास रील पाहणे, अपडेट्स पाहणे, नोटिफिकेशन्सवर लक्ष ठेवणे अशा बाबींमुळे मनावर परिणाम होतो. एकाग्रता भंग पावते. मन विचलित होते. सातत्याने हात मोबाइलकडे जातात. सामाजिक स्वास्थ्य बिघडते. एकांगीपणा वाढतो. संवाद हरवतो. मेंदूच्या अशा स्थितीची मांडणी करायची झाल्यास त्याला ‘ब्रेन रॉट’ असं म्हणतात.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Squids Have Hearts in Their Heads
Animal Has Heart in Head : छातीत नव्हे तर चक्क डोक्यामध्ये आहे ‘या’ प्राण्याचे हृदय, तुम्हाला माहितीये का?
Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
Naturopathic Medical Treatment know Ayurvedic Herbal Natural remedies at home
औषधं, गोळ्या घेऊन कंटाळला आहात? जाणून घ्या घरच्या घरी औषधाविना आयुर्वेदिक उपचार कसे कराल?
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
What is Schizophrenia Disorder| Schizophrenia symptoms Treatment in Marathi
Schizophrenia: स्किझोफ्रेनियाग्रस्त आईने केली मुलाची हत्या; काय आहे हा विकार?
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…

ब्रेन रॉटचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात?

१) एकाग्रता कमी होते, दीर्घ काळ लागणारी कामं करण्याची इच्छा होत नाही.

२) आपल्याला ज्या गोष्टी करायच्या असतात त्या विसरी पडतात, अनेकदा दैनंदिन कामंही नीटशी आठवत नाहीत.

३) मोबाइलवर सतत स्क्रोलिंग करणं, सोशल मीडिया पाहिला नाही तर अस्वस्थ वाटणं, सतत ऑनलाइन राहणं यामुळे मेंदू अलर्ट मोडवर राहतो.

४) स्क्रीन टाइम वाढल्याने प्रत्यक्ष संवाद करण्याची क्षमता अनेकदा हरवते. कुटुंबीयांनाही मेसेज किंवा चॅट करुन संवाद साधला जातो.

५) झोपेवर परिणाम होत असल्याने मेंदूची नको असलेली माहिती काढून टाकण्याच्या प्रक्रियेवर विपरित परिणाम. त्यातून मेंदूची कार्यक्षमता कमी होते.

असे दुष्परिणाम ब्रेन रॉटमुळे पाहण्यास मिळतात. सोशल मीडियाचा मर्यादित वापर, स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणं या आणि अशा उपायांद्वारे ब्रेन रॉट मधून बाहेर येता येतं.

ब्रेन रॉटमधून बाहेर येण्यासाठी काय उपाय करता येतात?

१) आपल्या शरीराला सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे झोप. योग्य वेळेत झोप घेणं आणि शरीरासह मेंदूला आराम देणं महत्त्वाचं ठरतं.

२) झोपण्यापूर्वी किमान १५ ते ३० मिनिटं आधी स्क्रीन पाहणं टाळणे, रोज किमान सात ते आठ तास झोप घेणं. झोपेच्या मधे जाग आल्यास मोबाइल न पाहणं

३) स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणं, दैनंदिन व्यायाम, वेळेवर जेवण अशी दिनचर्या आखून घेणं

४) सोशल मीडिया, आभासी जग यापेक्षा आठवड्यातून किमान एकदा जवळच्या व्यक्तीची भेट घेणं, नातेवाईकांना भेटणं.

५) मोबाइल किंवा कुठल्याही स्क्रीन ऐवजी पुस्तकं, वर्तमानपत्रं, इतर छंद यांमध्ये वेळ घालवणं. फिरायला जाणं. सायकलिंग करणं.

असे सोपे आणि अगदी सहज शक्य असलेले उपाय योजल्यास ब्रेन रॉटमधून बाहेर पडता येतं.

Story img Loader