What is Cloudburst: सध्या पावसाळयाचे दिवस सुरु आहेत. म्हणून सर्वत्र मुसळधार पाऊस चाललेला आहे. मान्सूनचे आगमन होताच ढगफुटीच्या घटना समोर येतात. ज्यामुळे अनेक जण पुरात वाहून गेल्याचे आपणास ऐकायला मिळते. लेहमध्ये ६ ऑगस्ट २०१० रोजी झालेली ढगफुटी ही जगाला आजपर्यंत माहित असलेल्या ढगफुटींच्या घटनांतील सर्वात मोठी ढगफुटी मानली जाते. ढगफुटीच्या घटनांमुळे अनेक वेळा मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होत आहे. गेल्या महिन्यात हिमाचल प्रदेशातील सोलन आणि हमीरपूर जिल्ह्यात ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अचानक पूर येऊन मोठे नुकसान झाले. अशावेळी आपल्या मनात हा प्रश्न येणे साहजिकच आहे की, ढगफुटी म्हणजे नक्की काय? ती कशी होते? त्याचे काय परिणाम होतात?  यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ढगफुटी म्हणजे काय?

हवामानशास्त्रानुसार, जेव्हा एखाद्या १० ते १५ किलोमीटर एवढे छोटेसे अंतर असलेल्या परिसरामध्ये एका तासाच्या कालावधीत दहा ते बारा सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो तेव्हा त्यास ढगफुटी असे म्हटले जाते. ह्या परिस्थितीत एकापेक्षा जास्त ढग एकावेळी फुटण्याची शक्यता असते. वैज्ञानिक भाषेत याला ‘क्लाउडबर्स्ट’ किंवा ‘फ्लॅश फ्लड’ असेही म्हणतात. ‘अचानक, खूप जोरदार पाऊस’ म्हणजे ढगफुटी. ढगफुटी झाल्यास, कमी कालावधीत भरपूर पाऊस पडतो.

(हे ही वाचा : पावसाचा हाहाकार! पुरात कार वाहून गेली तर विमा क्लेम करता येणार? लाखोंची भरपाई कशी होणार? जाणून घ्या… )

ढग कधी फुटतात?

हवामानशास्त्रज्ञ सांगतात की, जेव्हा पाण्याने भरलेले ढग पर्वतांमध्ये अडकतात आणि उंचीमुळे ढग पुढे जाऊ शकत नाहीत. मग अचानक एकाच ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू होतो. केवळ काही सेकंदात २ सेमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. जेव्हा मोठ्या प्रमाणात आर्द्रता असलेले ढग एका ठिकाणी एकत्र येतात तेव्हा ढगफुटी होते. त्यामुळे तेथे गोळा असलेले पाण्याचे थेंब एकमेकांत मिसळतात. थेंबांचे वजन इतके होते की, ढगाची घनता वाढते. घनता वाढल्याने अचानक मुसळधार पाऊस सुरू होतो.

डोंगरातच सर्वाधिक ढगफुटी का होते?

साधारणपणे, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १२-१५ किमी उंचीवर ढगफुटी होतात. पर्वतांच्या उंचीमुळे ढग पुढे जाऊ शकत नाहीत. मग अचानक एका ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू होतो. २ सेमीपेक्षा जास्त पाऊस काही सेकंदात पडतो. साधारणपणे १५ किमी उंचीवर पर्वतांवर ढग फुटतात.

(हे ही वाचा : नक्षत्रांची वाहने सांगतात पावसाचा अंदाज ? नक्षत्राचे वाहन म्हणजे काय ? पावसालाही टोपणनावे असतात का ? )

ढगफुटीचे काय परिणाम होतात?

ढगफुटीमुळे अचानक पूर येऊ शकतो. अतिवृष्टीमुळे इमारती, घरे, रस्ते आणि इतर मालमत्तेचे नुकसान देखील होऊ शकते, वनस्पती आणि पिकांचे नुकसान होऊ शकते, डोंगराळ आणि डोंगराळ भागात ढगफुटीमुळे अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊ शकते. याव्यतिरिक्त, अतिवृष्टीदरम्यान ढगफुटी दरम्यान वीज पुरवठा खंडित होते.

ढगफुटीनंतर बचाव कसा करायचा?

तुमच्या आजूबाजूला ढगफुटी झाल्यास सुरक्षित राहण्याची पहिली आणि मुख्य गोष्ट म्हणजे शांत राहणे. आपत्कालीन परिस्थितीत कधीही घाबरु नये. अशावेळी बाहेर जाणे टाळले पाहिजे. अतिवृष्टी दरम्यान वीज पुरवठा खंडित होणे सामान्य बाब आहे. अशावेळी जनरेटर किंवा UPS सारखा बॅकअप उर्जा स्त्रोत आधीपासूनच तयार ठेवावे. पाऊस किंवा पुरात उभे राहू नये. विजेच्या खांबापासून दूर राहिले पाहिजे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is cloudburst how such clouds form and what causes the clouds to burst and release all the water at once pdb