What is cold moon : डिसेंबर महिन्यात दिसणाऱ्या पूर्ण चंद्राला ‘कोल्ड मून’ म्हणतात. त्याला ‘लाँग नाईट मून’ असेही म्हणतात. ही एक खगोलीय घटना आहे; जी वर्षाच्या शेवटी दिसून येते. या घटनेदरम्यान चंद्र हा ९९.५ टक्के पूर्ण दिसतो. डिसेंबरमधील या पौर्णिमेला जगाच्या विविध भागांत वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. काही ठिकाणी यूल किंवा ओक चंद्र; तर काही ठिकाणी दत्त जयंती, काही ठिकाणी कार्तिकाई दीपम उत्सव चंद्रसुद्धा म्हणतात. (what is cold moon a rare cosmic wonder once in 19 years read about full moon)
‘कोल्ड मून’ का दिसतो?
चंद्राची कक्षा ही सूर्याभोवती फिरणाऱ्या पृथ्वीच्या कक्षेशी जुळते. त्यामुळे सूर्य आकाशात कमी दिसतो आणि त्याविरुद्ध चंद्र हा जास्त वेळ आणि पूर्ण आकारात दिसतो. हिवाळ्यात संक्रांतीच्या जवळची ही पौर्णिमा असल्याने याला लाँग नाईट मून, असे सुद्धा म्हणतात.
हेही वाचा : White City Of India : भारतातील ‘हे’ ठिकाण White City नावाने ओळखतात; पण कारण काय? जाणून घ्या
कोल्ड मून कधी आणि कुठे दिसतो?
यंदा १५ डिसेंबरपासून पुढे तीन रात्री कोल्ड मून दिसणार आहे. आकाशातील हे एक सुंदर दृश्य आहे. उत्तर कॅनडा, वायव्य युरोप, ग्रीनलँड मॅसाच्युसेट्स व आइसलँडमध्ये राहणारे लोक कोल्ड मून पाहू शकतात. विशेष म्हणजे कोल्ड मून उघड्या डोळ्यांनी बघू शकतो; पण तुम्हाला हा कोल्ड मून नीट पाहायचा असेल, तर तुम्ही दुर्बीण किंवा टेलिस्कोपचासुद्धा वापर करू शकता. जवळपास १९ वर्षांनी ‘कोल्ड मून’ ही घटना दिसते.
कोल्ड मून आणि धार्मिक महत्त्व
कोल्ड मूनदरम्यान पूर्ण चंद्र दिसतो म्हणजेच त्यादरम्यान पौर्णिमा असते. ही पौर्णिमा हिंदू धर्मातील लोक दत्त जयंती म्हणून साजरी करतात. ही पौर्णिमा हिंदू पंचागानुसार मार्गशीर्ष महिन्यात येते.
तमिळनाडू, केरळ आणि श्रीलंकेतील काही भागांत हिंदू कार्तिकाई दीपम उत्सव किंवा कार्तिक दीपोत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो. यादरम्यान या भागातील लोक हा सण साजरा करण्यासाठी काही दिवस दिवे लावतात.