बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. हे वादळ अजून कमी होतं ना होतं तोच आता आणखी एका वादळाचं संकट घोंघावत आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे सध्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे आणि येत्या ४८ तासांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.’गुलाब’चा परिणाम अजूनही ओसरला नसताना, शाहीन या वादळाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हे वादळ अरबी समुद्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याला शाहीन हे नाव कतारने दिलं आहे. यानिमित्ताने जाणून घ्या चक्रीवादळ म्हणजे काय आणि त्याला नाव कसं दिलं जातं.

Over 2400 people died in extreme weather events like floods heatwaves and landslides
हवामान प्रकोपाचे गतवर्षांत देशात २४०० बळी, जाणून घ्या, उष्णतेच्या झळांची स्थिती काय
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
pm narendra modi launches mission mausam
‘मिशन मौसम’ला सुरुवात; हवामान विभाग भारतीयांच्या वैज्ञानिक प्रगतीचे प्रतिक, पंतप्रधानांचे गौरवोद्गार
अग्रलेख : ‘मौसम’ है आशिकाना…
rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम
La-Nina, La-Nina active, effect on India ,
अखेर ला – निना सक्रीय, पण कमकुवत; जाणून घ्या, भारतावरील परिणाम
What is Kinkrant| Sankrant and Kinkrant Difference
Kinkrant 2025: किंक्रांत म्हणजे काय? का पाळला जातो हा दिवस; जाणून घ्या संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक
Vaikuntha Ekadashi Vrat
Vaikuntha Ekadashi 2025: गूगलवर ट्रेंड होतेय २०२५ मधील पहिली एकादशी; जाणून घ्या एकादशीचा शुभ मुहूर्त आणि तिथी

चक्रीवादळ म्हणजे काय?

वारे बदलले की एक अख्खा ऋतू बदलतो. निसर्गचक्र पुढे सरकते. नवे वातावरण, शेती, जंगल, प्राण्यांवर त्याचे होणारे परिणाम सारे सारे बदलते. वारे बदलले, हा वाक्प्रचार उगीच रूढ नाही झाला. कधी आल्हाददायक, निसर्गाला नवचेतना देणारे हे वारे कधी कधी अगदी विध्वंसकही होतात. अशाच विध्वंसक वादळांना चक्रीवादळे असं म्हणतात. एखाद्या विशिष्ट ठिकाणी कमी झालेला हवेचा दाब भरून काढण्यासाठी चोहोबाजूंनी वारे वाहू लागतात. समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की वारे जमिनीच्या दिशेने वाहू लागतात. प्रत्येक वेळी वादळ तयार होतंच असं नाही, मात्र वाऱ्यांमध्ये असलेले बाष्प आणि ते किती वेगाने थंड होतात त्यावर वादळांची निर्मिती अवलंबून असते. भारतीय उपखंडामध्ये पावसाळ्याच्या पुढे-मागे अशी स्थिती असते आणि त्यामुळे आपल्याकडे साधारण एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर यादरम्यान बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होतात.

चक्रीवादळांना नावे कशी दिली जातात?

चक्रीवादळांची नावे हा आणखी एक औत्सुक्याचा विषय. नाव दिले की त्या वादळाशी निगडित माहिती मिळवणे व लक्षात ठेवणे सोपे जाते. विशिष्ट भागात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा धोका ज्या ज्या देशांना बसण्याची शक्यता असते ते सर्व देश एकत्र येऊन वादळांच्या नावांची यादी तयार करतात. फुले, नद्या, विशेष शब्द, प्राणी यांची नावे वादळांना दिली जातात. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार व थायलंड या आठ राष्ट्रांनी वादळांची नावे ठरवली आहेत. इतर राष्ट्रांकडूनही प्रत्येकी आठ अशी ६४ नावे देण्यात येतात. ही नावे ओळीने देण्यात येतात. याच पद्धतीने पृथ्वीवरच्या इतर भागातील वादळांची नावे ठरवली जातात. काही ठिकाणी विशिष्ट वर्षांनंतर पुन्हा तीच नावेही दिली जातात, अर्थात त्यातून प्रचंड संहारक ठरलेल्या वादळांची नावे वगळली जातात. जगभरातील वादळांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे वादळाच्या बाहेरच्या बाजूचे वारे कितीही प्रचंड वेगाने फिरत असले तरी वादळाचे केंद्र मात्र शांत असते.

Story img Loader