Sugar Monitoring Patch : अभिनेत्री कतरिना कैफच्या हातावर एक पॅच लावण्यात आला आहे. या पॅचमुळे शुगर मॉनिटरिंग पॅच चर्चेत आला आहे. तसंच कतरिना कैफला मधुमेह जडला आहे का? अशीही चर्चा सुरु झाली आहे.
कतरिनाला मधुमेह झाला?
कतरिना कैफ स्टाईल आयकॉन आहे. कतरिना कैफचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये कतरिना छानश्या साडीमध्ये दिसते आहे. डिझायनर साडीतला तिचा लूक लक्ष वेधून घेतो आहे. अशातच तिच्या दंडावर एक काळी पट्टी बांधलेली दिसते आहे. या पॅचनेही लक्ष वेधलं आहे. हा पॅच पाहून कतरिना कैफला मधुमेह झाल्याची चर्चा रंगली आहे. मात्र अधिकृत रित्या अशी कुठलीही माहिती कतरिनाने दिलेली नाही.
डायबिटीस ब्लॅक पॅच म्हणजे काय?
ग्लुकोज मॉनिटर पॅच असं डायबिटिस ब्लॅक पॅचला म्हटलं जातं. यामुळे रक्तातील साखरेची पातळी समजण्यास मदत होते. अन्न आणि औषध प्रशासनाची मान्यता मिळालेलं हे पॅच आहे. मधुमेहाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे हे पॅच वापरण्याचा सल्ला अनेकदा डॉक्टरांकडून दिला जातो. हा ब्लॅक पॅच लावण्याची मुदत सात दिवस किंवा चौदा दिवस असते. यानंतर जो अहवाल येतो त्या अहवालानुसार व्यायाम आणि आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
डायबिटिस ब्लॅक पॅचचे प्रकार किती आहेत?
शरीरातील साखरेचं प्रमाण ओळखण्यास हा ब्लॅक पॅच मदत करतो. या पॅचला इन्सुलिन पॅच म्हटलं जातं. हा पॅच शरीराला चिकटलेला असतो. यामध्ये लहान काडतुसाप्रमाणे इन्सुलिन भरलेलं असतं. इन्सुलिन पॅचमध्ये सुई असते. त्यामधून इन्सुनिलन रक्तात सोडलं जातं. या पॅचमुळे वेदना होतात पण त्या कमी प्रमाणात असतात. या पॅचचा दुसरा प्रकार आहे तो ज्यांना धूम्रपान सोडायचं आहे त्यांच्यासाठी निकोटीन पॅच असतात. याबाबत संशोधन सुरु आहे. WebMD ने ही माहिती दिली आहे.
शरीरावर लावण्यात येणारं हा पॅच एका अॅपशी कनेक्ट करता येतं. या अॅपद्वारे शरीरातील ग्लुकोजच्या पातळीचं रिअल टाइम तपासता येतं आहे. हा पॅच कतरिनाने दंडवर लावला आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे हा ब्लॅक पॅच चर्चेत आला आहे.
ब्लॅक पॅच का लावला जातो?
कतरिना कैफच नाही तर अनेकजण हा पॅच लावतात. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे फिटनेस. रक्तातील साखरेचं प्रमाण, हृदयाची गती, झोपेचा नमुना याचं निरीक्षण हा पॅच करतो. मधुमेह असलेले लोक टाइप १ आणि टाइप २ मधुमेह प्रकारांसाठी पॅच लावततात. रक्तातील साखरेचं प्रमाण किती आहे? ते पॅचचा अहवाल सांगतो ज्यानंतर काय आहार घ्यायचा आणि काय व्यायाम करायचा हे ठरवता येतं.