बाहेर खायची इच्छा झाली की काही मोजक्या फूड आऊटलेट्सची नावं तोंडात येतात. त्यापैकी एक नाव म्हणजे KFC होय. केएफसीचे अनेक स्टोअर तुम्ही लहान-मोठ्या शहरांमध्ये पाहिले असतीत. पण या केएफसीचा फुल फॉर्म काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहीत तर आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. तसेच केएफसीची सुरुवात कोणी केली, हेही जाणून घेऊयात.
केएफसीचा फूल फॉर्म काय?
केएफसीचा फुल फॉर्म केंटकी फ्राइड चिकन असा आहे. ही अमेरिकन फास्ट-फूड रेस्टॉरंट चेन आहे. केएफसीचे फ्राइड चिकन जगप्रसिद्ध आहे. या कंपनीने मागच्या वर्षीपर्यंत फ्राइड चिकनचे थोडेथोडके नाही तर तब्बल २० बिलियन पेक्षा जास्त पिसेस ग्राहकांना सर्व्ह केले आहेत.
OYO चा फूल फॉर्म माहितीये का? ओयोची सुरुवात कशी झाली? जाणून घ्या
केएफसीचे संस्थापक कोण?
KFC ची स्थापना १९३० मध्ये हार्लंड सँडर्स यांनी केली होती, ते कर्नल सँडर्स म्हणून ओळखले जातात. आपल्या घरी बनणाऱ्या चिकन रेसिपीची चव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी हा बिझनेस सुरू केला होता. सगळं नीट सुरू असतानाच दुसर्या महायुद्धात कर्नल सँडर्स यांचे घर आणि बिझनेस उद्ध्वस्त झाले. त्यानंतर पुन्हा फूड बिझनेस सुरू करण्यापूर्वी त्यांनी काही काळ केंटकीमध्ये पोलीस म्हणून काम केलं. १९५२ साली पुन्हा व्यवसाय सुरू केला. नंतर त्याची वाढ झाली आणि आता जगभरातील अनेक देशांमध्ये त्यांचे आऊटलेट्स आहेत.
हेही वाचा – वेळ सांगताना वापरल्या जाणाऱ्या AM आणि PM चा फुल फॉर्म माहितेय? जाणून घ्या त्याचे महत्त्व
त्यांच्या रेस्टॉरंटमधील फ्राईड चिकन रेसिपी प्रचंड लोकप्रिय आहे. एकेकाळी एकट्या अमेरिकेत केएफसीची ४०० पेक्षा जास्त फ्रँचायझी स्टोअर्स होती, यावरून तुम्हाला त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल. दरम्यान, १९३० पासून आजपर्यंत केएफसीने त्यांच्या फ्राइड चिकनची रेसिपी तिच ठेवली आहे, त्यात बदल केला नाही.