What is GI Tag : वाराणसीचा प्रसिद्ध बनारसी पान आणि लंगडा आंबा नुकताच भौगोलिक मानांकन (GI) यादीत दाखल झाला आहे. ३१ मार्च रोजी जीआय रजिस्ट्री, चेन्नई द्वारे तब्बल ३३ उत्पादनांना जीआय प्रमाणपत्र देण्यात आले. त्यापैकी 10 युपीचे असून त्यात वाराणसीतील दोघांचा समावेश आहे. बनारसी पान आणि लंगडा आंबाशिवाय, या प्रदेशातील आणखी दोन उत्पादने, रामनगर भांता (वांगी) आणि चंदौसीची आदमचिनी चावल (तांदूळ) यांनाही जीआय टॅग देण्यात आले. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा जीआय टॅग आहे तरी काय?भौगोलिक मानांकन दिला जातो म्हणजे नक्की काय होते? तुमच्या मनातील प्रश्नांची आम्ही येथे उत्तर देणार आहोत. चला जाणून घेऊ या सविस्तर
जीआय टॅग काय आहे?
WIPO या वर्ल्ड इंटरलॅक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनाइजेशननुसार, जीआय टॅग एक प्रकारचा लेबल आहे जो कोणत्याही उत्पादानाच्या भौगोलिक ओळखीच्या रूपात दिला जातो. वस्तूंचे भौगोलिक मानांकन १९९९ मध्ये नोंदणी आणि संरक्षण कायद्यांतर्गत सुरू करण्यात आले होते. हा टॅग भारताच्या अंतर्गत कोणत्याही खास उत्पादनाला मिळणार आहे. हा टॅग एखाद्या खास मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्टला किंवा कोणत्याही खास पिकाला किंवा नैसर्गिक उत्पादनाला दिला जातो.
हेही वाचा : वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी किती डिटर्जंट पावडर वापरावी? जाणून घ्या योग्य प्रमाण
सोप्या भाषेत समजून घ्या जीआय टॅगचा अर्थ
उदाहरणाच्या सहाय्याने तुम्हाला जीआय टॅग चा अर्थ सोप्या भाषेत समजून घ्या. कोल्हापुरची चप्पल देशभर लोकप्रिय आहे, आता समजा कोणीतरी कोल्हापुरी म्हणून अशीच चप्पल बाजारात विकायला सुरुवात केली तर? अशा प्रकारची फसवणूक रोखणे हा जीआय टॅगचा उद्देश आहे. जीआय टॅग मधील जीआय टॅग म्हणजे भौगोलिक मानांकन. हा टॅग एखाद्या उत्पादनाला त्याच्या मूळ प्रदेशाशी जोडण्यासाठी दिलेले चिन्ह आहे.
हेही वाचा : AC नव्हे पाणी वापरुन केले जाते कुलिंग, हिवाळ्यातही ‘येथे’ वापरत नाही हिटर! काय आहे हा जुगाड?
जीआय टॅग कसा मिळवायचा?
कोणत्याही उत्पादनासाठी जीआय टॅग मिळवण्यासाठी, CGPDTM अर्थात भारत सरकारच्या पेटंट, डिझाइन्स आणि ट्रेड मार्क्सचे नियंत्रक यांच्याकडे अर्ज करावा लागतो. एकदा जीआय टॅग प्राप्त झाल्यानंतर तो १० वर्षांसाठी वैध असतो, १० वर्षानंतर हा टॅग पुन्हा एकदा नूतनीकरण करावा लागतो.