Types of GST in India : GST अर्थात वस्तू आणि सेवा कर होय. या करासंदर्भातलं विधेयक २०१७ मध्ये मांडण्यात आलं होतं. २९ मार्च २०१७ या दिवशी या विधेयकाचं रुपांतर कायद्यात झालं. त्यानंतर १ जुलै २०१७ या दिवसापासून देशभरात जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर लागू झाला. एक्साईज ड्युटी, VAT, सर्व्हिस टॅक्स या सगळ्यांना पर्याय म्हणून जीएसटी (GST) आणण्यात आला. मोदी सरकारने त्यांच्या पहिल्या कार्यकाळात हा निर्णय घेतला. या टॅक्सला विरोधकांनी गब्बर सिंग टॅक्स असं संबोधलं होतं. मात्र जीएसटी काही बंद झाला नाही. जीसएटी म्हणजे नेमकं काय? त्याचे प्रकार किती हे आपण जाणून घेणार आहोत.
जीएसटी म्हणजे काय? (What is GST?)
GST अर्थात वस्तू आणि सेवा कर हा घरगुती वापराच्या वस्तूंपासून विविध सेवांच्या पुरवठ्यावर आकारला जाणारा मूल्यवर्धित कर आहे. जीएसटी हा संपूर्ण देशासाठी सर्वसमावेशक आहे. वस्तू आणि सेवा कर अर्थात GST हा एखाद्या उत्पादनाच्या किंवा सेवेच्या अंतिम किंमतीत समाविष्ट केला जातो. उदाहरणार्थ तुम्ही एखादी वस्तू १०० रुपये खर्च करुन घेत असाल तर त्यात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर किती घेतला आहे? याची माहिती नोंद केलेली असते. केंद्र सरकार या कराची आकारणी करते. राज्यांतर्गत व्यवहारांच्या बाबत हा कर CGST आणि SGST अर्थात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात वितरित केला जातो.
हे पण वाचा- जीडीपी वाढ ६.३ टक्क्यांवरच मर्यादित राहण्याची शक्यता – स्टेट बँक
जीएसटीची उद्दीष्टे काय आहेत?
१) बहुविविध करप्रणालीचं उच्चाटन करण्यासाठी हा कर आणला गेला आहे.
२) व्यवसायवृद्धी व्हावी हा जीएसटी आणण्यामागचा एक प्रमुख हेतू आहे.
३) वस्तूंच्या किंमती कमी करणे किंवा मर्यादित ठेवणे हादेखील एक उद्देश आहे.
४) देशाच्या महसुलाला चालना देण्यासाठी वस्तू आणि सेवा कर आणण्यात आला आहे.
कोणत्या करांच्या जागी जीएसटी लागू करण्यात आला आहे?
१) व्हॅट
२) जकात
३) करमणूक कर
४) लॉटरीवरील कर
५) चैनीच्या वस्तूंवरील कर
६) खरेदीवरील कर
७) सेवा कर
८) अतिरिक्त उत्पादन शुल्क
९) केंद्रीय उत्पादन शुल्क
या प्रमुख नऊ करांसह विविध करांच्या ऐवजी केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कराचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.
जीएसटीचे किती प्रकार आहेत?
सीजीएसटी (केंद्रीय वस्तू आणि सेवा कर)
एसजीएसटी (राज्य वस्तू आणि सेवा कर)
यूटीजीसएसटी (केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर)
आयजीएसटी (एकात्मिक वस्तू आणि सेवा कर)
एसजीएसटी म्हणजे काय?
राज्य वस्तू आणि सेवा कर हा जीएसटीच्या प्रकारांपैकी एक आहे ज्याला विशेष राज्याची सरकार लागू करते. राज्य सरकार राज्यातील वस्तू आणि सेवांवर कर आकारते (आंतरराज्य, उदाहरणार्थ म्हैसूर), आणि कलेक्ट केलेल्या महसुलाचा एकमेव लाभार्थी राज्य सरकार आहे. एसजीएसटी विविध राज्यस्तरीय करांची जागा घेते जसे की लॉटरी कर, लक्झरी कर, व्हॅट, खरेदी कर आणि विक्री कर. तथापि, जर मालाचा व्यवहार आंतरराज्य (राज्याबाहेर) होत असल्यास, एसजीएसटी आणि सीजीएसटी दोन्ही लागू होतात. परंतु, जर वस्तू आणि सेवांचे व्यवहार राज्यात असतील तर फक्त एसजीएसटी लावला जातो. जीएसटीचा दर दोन प्रकारच्या जीएसटीमध्ये समान रुपात विभागला आहे. उदाहरणार्थ, जेव्हा व्यापारी त्यांच्या वस्तू राज्यात विकतात, तेव्हा त्यांना SGST आणि CGST भरावा लागतो. SGST मधून मिळणारा महसूल राज्य सरकारचा आणि CGST मधून मिळणारा महसूल केंद्र सरकारचा आहे. विविध वस्तू आणि सेवांची एसजीएसटी वेळोवेळी प्रकाशित केलेल्या सरकारी अधिसूचनेवर अवलंबून असते.
जीएसटी कसा ठरवला जातो?
वस्तू आणि सेवांच्या विक्रेता आणि खरेदीदाराच्या स्थानावर आधारित जीएसटी निश्चित केला जातो.
सीजीएसटी आणि एसजीएसटी वस्तू आणि सेवांच्या आंतरराज्य पुरवठ्यावर लागू होतात. याउलट, आयजीएसटी वस्तू आणि सेवांच्या आंतरराज्य पुरवठ्यावर लागू होते.
अशा प्रकारे, आयजीएसटी दर हे सीजीएसटी आणि एसजीएसटी दरांचे संयोजन आहे.