पॅलेस्टाईनमधील हमास संघटनेने शनिवारी (७ ऑक्टोबर) गाझा पट्टीमधून इस्रायलवर अचानक हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढला असून युद्धाला सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजुंनी झालेल्या हल्ल्यात दोन्ही देशांतील शेकडो निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. तर हजारो लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबतचे थरकाप उडवणारे अनेक फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण इस्रायलवर हल्ला करणारी ‘हमास’ संघटना नेमकी काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला तर मग जाणून घेऊयात…

हमास संघटना नेमकी काय आहे?

हमास ही पॅलेस्टाईनमधील इस्लामिक प्रतिकार चळवळ आहे. १९८७ साली पहिल्या पॅलेस्टिनी इंतिफादा (उठाव) दरम्यान या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेला शियापंथीय इराणचा पाठिंबा आहे. हमास ही संघटना १९२० च्या दशकात इजिप्तमध्ये स्थापन झालेल्या मुस्लीम ब्रदरहूडच्या इस्लामी विचारसरणीला मानते. २००७ पासून हमासची गाझा पट्टीवर सत्ता आहे. पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या नेतृत्वाखालील फतह चळवळीशी एकनिष्ठ असलेल्या सैन्याशी गृहयुद्ध केल्यानंतर गाझा पट्टीवर हमासने वर्चस्व स्थापन केलं. २००६ मध्ये पार पडलेल्या पॅलेस्टिनी संसदीय निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर हमासने गाझा पट्टी ताब्यात घेतली आहे.

JP Singh met Afghanistan Interim Defense Minister Maulana Mohammad Yakub in Kabu
तालिबानी राजवटीशी पहिलाच संवाद!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Strategies to Counter Terrorism Amit Shah statement at the conference of National Investigation Agency
दहशतवादाचा सामना करण्याची रणनीती; राष्ट्रीय तपास संस्थेच्या परिषदेत अमित शहा यांचे प्रतिपादन
Stone pelted on Prof Laxman Hake vehicle in Nanded news
नांदेडमध्ये प्रा. लक्ष्मण हाकेंचे वाहन फोडले
maharashtra vidhan sabha election 2024, candidates, worship, trimbakeshwar
त्र्यंबकनगरीत पूजाअर्चेसाठी उमेदवारांची गर्दी वाढली
Rebel Vani Umarkhed, Mahayuti Vani, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडी, महायुतीतील बंडखोरांना घरचा रस्ता
Resolution to grant special status to Jammu and Kashmir approved
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर; विधानसभेत जोरदार खडाजंगी
loksatta readers feedback
लोकमानस: उतावीळपणा पुन्हा अंगलट!

हेही वाचा- “ना मोहीम, ना गोळीबार…हे युद्ध आहे”, हमासच्या हल्ल्यानंतर नेतान्याहूंनी ठणकावलं; म्हणाले, “त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी…!”

तेव्हापासून हमास आणि इस्रायलमध्ये अनेकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. यामध्ये बऱ्याच वेळा हमासने गाझामधून इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. तर इस्रायली सैन्यांनी हवाई हल्ले करत गाझावर बॉम्बफेक केली. हमासने यापूर्वी गाझा पट्टीला इस्रायलचं राज्य म्हणून मान्यता देण्यास विरोध केला आहे. तसेच १९९० च्या दशकात इस्रायल आणि पीएलओने (Palestine Liberation Organization) केलेल्या ‘ओस्लो शांतता करारा’ला हमासने हिंसक विरोध केला होता.

हेही वाचा- रशिया-युक्रेन युद्धात उत्तर कोरियाची उडी? किम जोंग-उन यांच्याकडून व्लादिमीर पुतिन यांना युद्धसामग्रीचा पुरवठा

इज्ज अल-दीन अल-कासम ब्रिगेड ही हमासची सशस्त्र संघटना आहे. या संघटनेद्वारे बंदूकधारी लोक आणि आत्मघाती बॉम्बर्स इस्रायलमध्ये पाठवले जातात. यामुळे इस्रायल, युनायटेड स्टेट्स, युरोपियन युनियन, कॅनडा, इजिप्त आणि जपानने हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. गाझा हा हमासचा बालेकिल्ला आहे. मात्र पॅलेस्टाईनमधील इतरही काही प्रदेशात हमासचे समर्थक आहेत. कतारसह मध्य पूर्वेतील देशांमध्येही हमासचे समर्थक पसरलेले आहेत.