What is in the Briefcase of India’s PM Bodyguards: पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौरा आटोपून भारतात दाखल झाले आहेत. मोदी ग्रीसवरून थेट बंगळुरू येथे दाखल झाले. चांद्रायान३ च्या यशानंतर पंतप्रधान मोदी यांनी बंगळुरू येथील इस्त्रोच्या मुख्यालयात जाऊन शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. यावेळी त्यांच्यासाठी रोड शो चे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींची सुरक्षितता लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आले होते. या रोडचे फोटो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये मोदींच्या सुरक्षेत गुंतलेल्या एका गार्डने हातात एक सुटकेसही धरली असल्याचे दिसत आहे. जी अनेकदा पंतप्रधानांच्या सुरक्षेतील एका गार्डच्या जवळ दिसते. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, मोदींच्या बॉडीगार्डसोबत कायम ही काळ्या रंगाची ब्रीफकेस का असते, तिचा वापर कशासाठी होतो माहित आहे का? चला तर जाणून घेऊया सविस्तर…
देशात पंतप्रधान मोदी यांची सुरक्षा सर्वात कडक असून ज्याची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (Special Protection Group) वर आहे. SPG ची स्थापना १९८८ साली करण्यात आली असून, SPG 4 ऑपरेशन्स, ट्रेनिंग, इंटेलिजन्स अँड टूर आणि प्रशासन या चार भागांमध्ये काम करते. पंतप्रधान बुलेटप्रूफ, रेंज रोव्हर, मर्सिडीज आणि BMW 760Li (BMW 7-Series 760Li) या गाड्यांमध्ये प्रवास करताना दिसतात. या कार्स सुरक्षित फीचर्सने सुसज्ज आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या वेळी कार्यक्रमस्थळाच्या मार्गापासून ते कार्यक्रमस्थळापर्यंतच्या सुरक्षेशी संबंधित नियम स्थानिक पोलीस ठरवतात. पोलिसांच्या निर्णयावर एसपीजी अधिकारी देखरेख ठेवतात.
(हे ही वाचा : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान अन् प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपतीच का फडकवतात तिरंगा माहितीये? ‘हे’ आहे खरं कारण )
मोदींच्या सुरक्षारक्षकांजवळ असलेल्या काळ्या रंगाच्या ब्रिफकेसमध्ये काय असतं?
तुम्ही नेहमी पाहिले असेल की, पीएमसोबत जे SPGचे कमांडोज असतात. त्यांच्या हातात नेहमी एक ब्रिफकेस असते. ही काळ्या रंगाची ब्रिफकेस दिसायलाही अगदी लहान असते. परंतु, एवढ्याशा या ब्रिफकेसमध्ये नक्की काय असतं? ही काळ्या रंगाची ब्रिफकेस खरं तर, आपल्या पंतप्रधानांसारख्या व्हीआयपींसाठी संरक्षणात्मक बुलेटप्रूफ कवच आहे. हे आपत्कालीन परिस्थितीत आपल्या पंतप्रधानांना तात्काळ संरक्षण प्रदान करते, असं म्हटलं जाते. जी एखाद्या वेळेस हल्ला झाल्यास अशा कठीण प्रसंगी उघडली जाऊ शकते.
या ब्रीफकेसमध्ये एक गुप्त पाकीटही असते. ज्यात एक विशेष प्रकारचे बंदूक असते. पंतप्रधानांवर कोणताही हल्ला झाल्यास त्या स्थितीमध्ये बॉडीगार्ड ब्रीफकेसमधून बंदूक काढून पीएमना वाचवू शकतात. पंतप्रधान जेथेही जातात, तेथे प्रत्येक पावलावर अचूक शूटर्स तैनात असतात. ही ब्रीफकेसही अनेकदा सुरक्षा कर्मचार्यांकडे असते. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे, व्हीव्हीआयपींना त्वरित संरक्षण देण्यासाठी ही ब्रिफकेस ढाल म्हणून काम करते.