बॉलिवूड आणि प्रणयदृश्यं हे समीकरण जुनं नाही. त्यात आता खूप प्रगती झाली आहे. सध्याच्या घडीला इंटिमेट सीन्स, बोल्ड सीन्स हे सर्रास बघायला मिळतात. वेब सीरिज आल्यापासून तर हे सीन्स मोठ्या प्रमाणावर पाहण्यास मिळत असतात. अशात बॉलिवूडमध्ये इंटिमेट को ऑर्डिनेटर, इंटिमसी को ऑर्डिनेरट हा ट्रेंड रुळतो आहे. नेमका हा प्रकार काय आहे? याची सुरुवात कुठल्या सिनेमापासून झाली चला जाणून घेऊ. अनेकदा अभिनेते आणि अभिनेत्री हे बोल्ड सीन करताना म्हणावे तसे कम्फर्टेबल नसतात. त्यांना कम्फर्ट करण्याचं महत्त्वाचं काम हे इंटिमसी को ऑर्डिनेटर करत असतात.
गहराईयाँ सिनेमापासून सुरु झाली इंटिमसी को ऑर्डिनेटरची चर्चा
दीपिका पदुकोणचा ‘गहराईयाँ’ हा सिनेमा जेव्हा आला होता तेव्हा सुरुवातीला इंटीमसी को ऑर्डिनेटर हा शब्द चर्चेत आला होता. दीपिकाचा जो बोल्ड अवतार या सिनेमात बघायला मिळाला त्यामागे काही टेक्निकल लोकांचा वाटा होता. त्यानंतर आता सेटवर इंटीमसी को ऑर्डिनेटर हायर करण्यास सुरुवात झाली आहे. हे नेमकं कसं काम करतात? आपण जाणून घेऊ.
कोण असतात इंटीमसी को ऑर्डिनेटर?
इंटीमसी को ऑर्डिनेटर फिल्म युनिटचाच एक भाग असतात. मुख्यत: हे को ऑर्डिनेटर अभिनेते, अभिनेत्री, परफॉर्मर, डायरेक्टर आणि प्रोड्युसर यांच्यात चर्चा घडवून आणतात. सिनेमात जर कुठला भावनिक, बोल्ड किंवा सेन्सिटिव्ह सीन असेल तर त्याची एक निश्चित रुपरेषा आखली जाते. याचा सर्वात मोठा नियम असतो ज्या दोन अभिनेते-अभिनेत्रींमध्ये हा सीन चित्रीत केला जातो आहे त्यावेळी हे दोघंही जास्तीत जास्त कम्फर्टेबल कसे असतील. तसंच तो सीन करायची या दोघांची मनाची तयारी करणं हे इंटीमसी को ऑर्डिनेटरचं मुख्य काम असतं.
गहराईयाँ सिनेमापासून आला हा ट्रेंड
इंटीमेट को ऑर्डिनेटर हायर करण्यास कधी सुरुवात झाली?
इंटीमेट को ऑर्डिनेटर भारतात सर्वात आधी आला तो मस्तराम शोच्या वेळी. मस्तराम या वेबसीरिजसाठी एक इंटीमसरी को ऑर्डिनेटर कॅनडातून आला होता. ही पहिली वेळ होती जेव्हा कुठल्या तरी शुटिंगसाठी एखाद्या प्रॉडक्शन हाऊसने इंटीमेसी को ऑर्डिनेटर बोलवला होता. बॉलिवूडमध्ये या ट्रेंडची सुरुवात झाली ती दीपिकाच्या गहराईयाँ सिनेमापासून. काही छोट्या प्लॅटफॉर्म्सनी इंटिमसी को ऑर्डिनेटर हायर केला होता. इंटीमेट को ऑर्डिनेटर आस्थाने आज तकला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की फेम गेम नावाचा एक शो नेटफ्लिक्सवर आला होता. त्यासाठी तिने इंटीमसी को ऑर्डिनेटर म्हणून काम केलं होतं. कोबाल्ट ब्लू नावाचाही एक सिनेमा होता त्यातही इंटिमसी को ऑर्डिनेटर होता.
हॉलिवूडमध्ये बराच जुना आहे हा ट्रेंड
इंटीमसी को ऑर्डिनेशन हे हॉलिवूडमध्ये सर्रास केलं जातं. हिंदी सिनेमासृष्टीत याची सुरुवात व्हायला बराच उशीर झाला. त्याविषयी विचारलं असता आस्थाने सांगितलं की सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना आम्हालाही करावा लागला. अनेकदा आम्हाला सेटवर बोलवलं जायचं आणि सांगितलं जायचं चला काम सुरु करा. मात्र अनेकजण समजून घ्यायचे नाहीत की काम काय आहे? मग विचारायचे याचे तुम्ही पैसे कसे काय मागता? सुरुवातीला पैसेही मिळायचे नाहीत. आम्हाला दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री बोलवलं की आम्ही जातो. मात्र आमच्यासाठी वेगळं बजेट नसायचं. पैसे देण्यासाठी दिग्दर्शक थोडी काचकूच करत असत. त्यानंतर मी माझं आधी मानधन किती असेल ते ठरवून घेतलं. त्यामुळे हळूहळू फायदा झाला. अनेक लोक माझ्यासारख्या अडचणी सहन करत पुढे आले आहेत असंही तिने सांगितलं.
आस्थाने सांगितलं की एकदा मी एक लेस्बियन किसिंग आणि मेकआऊट शो केला होता. या शोमध्ये अॅक्टर्स स्ट्रेट होते. सुरुवातीला सीन करत असताना दोघंही काही वेळ थोडेसे गोंधळलेले, नर्व्हस अवस्थेत होते. जे अॅक्टर्स स्ट्रेट असतात त्यांना असे सीन देण्यासाठी अडचणी येतात. मग मी त्या दोघांशीही बोलले. काही एक्सरसाईज या दोन्ही अॅक्टर्सना दिले. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. मग सीन करताना या दोघांना काही अडचण आली नाही. प्रत्यक्ष सीन करत असतानाही त्यांना थोडसं अवघडलेपण आलं होतं. पण नंतर त्यांनी अगदी सुरळीतपणे टेक दिला आणि सीन शूट झाला.
गहराईयाँ सिनेमा सुरु असताना अनेक छोट्या छोट्या अडचणी आल्या. त्यावेळी मी सेटवरच थांबले होते. क्लास या वेबसीरिजमध्येही काही इंटिमेट सीन होते. त्यांच्याकडून विशिष्ट सीन करण्यासाठी काही टूल किटही आम्ही वापरतो. कॅमेरावर सीन परफेक्ट कसा देता येईल हे सांभाळण्याची जबाबदारी इंटीमसी को ऑर्डिनेटरची असते.
बॉलिवूडने स्वीकारला आहे हा ट्रेंड
बॉलिवूडने आता इंटीमसी को ऑर्डिनेटरचा ट्रेंड स्वीकारला आहे. इंटीमेट सीन शूट होत असताना प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा असो अॅक्टर्सना तो सीन करण्यासाठी सहज वाटलं पाहिजे असं इंटीमेट को ऑर्डिनेटर्सचं लक्ष्य असतं. आता इंडस्ट्रीत इंटीमेट को ऑर्डिनेटरचा ट्रेंड रुळतो आहे. अनेकदा सिनेमांसाठी हे को ऑर्डिनेटर्स हायर केले जातात.
इंटीमसी को ऑर्डिनेटर कसं काम करतात?
मोठ्या प्रोजेक्टसाठी एक इंटिमेट को ऑर्डिनेटर असतो. त्याच्यासह त्याचे दोन सहकारी असतात. जेव्हा शूटिंग होणार असते त्यावेळी त्यात इंटिमेट, बोल्ड सीन किती आहेत याची माहिती घेतली जाते. त्यानंतर ज्या दोघांमध्ये तो बोल्ड सीन केला जाणार आहे किंवा इंटीमेट सीन केला जाणार आहे त्या दोन्ही कलाकारांशी संवाद साधला जातो. त्यांना हा सीन करताना अधिकाधिक सोपं कसं वाटेल, ताण कसा येणार नाही याकडे लक्ष देणं ही या को ऑर्डिनेटर्सची मुख्य जबाबदारी असते. दिग्दर्शक, निर्माते यांच्याशीही आम्ही चर्चा करतो. जेव्हा असे सीन शूट होत असतात तेव्हा सीन करताना कमीत कमी लोक असतील याचीही काळजी को ऑर्डिनेटरकडून घेतली जाते. सुरुवातीला कॅमेराशिवाय एकदा सीनची प्रॅक्टीस केली जाते आणि त्यानंतर कॅमेरासमोर. त्यानंतर फायनल सीन शूट होतो. या सगळ्या प्रक्रिये दरम्यान इंटीमसी को ऑर्डिनेटर उपस्थित असतो. जर कुणाला अधिकचा वेळ लागत असेल तर त्या वेळात त्यांच्याशी इंटीमसी को ऑर्डिनेटर संवाद साधतात आणि त्यांच्याकडून पुढचा सीन कसा सहज होईल यावर लक्ष केंद्रीत करतात.
दहा वर्षांनी जेव्हा अनुरिताने केला इंटिमेट सीन
अनुरिता झा ने गँग्स ऑफ वासेपूर या सिनेमात एका छोट्या रोलमधून आपल्या करीअरला सुरुवात केली होती. अनुरीता दीर्घ काळापासून बॉलिवूडमध्ये काम करते पण तिने किसिंग सीन किंवा इंटिमेट सीन केला नव्हता. तिला त्याविषयीचं एक अवघडलेपण मनात होतं. अनुरीताने आत्तापर्यंत इंटीमेट सीन जास्त असलेल्या वेब सीरिज किंवा सिनेमाही नाकारले. प्रकाश झा यांच्या आश्रम या वेबसीरिजमध्ये अनुरिताने काही इंटीमेट सीन दिले आहेत. हे सीन देताना मी नर्व्हस झाले होते असं अनुरीताने सांगितलं. प्रकाश झा यांच्यासह मी काम करत होते त्यामुळे मला पूर्ण विश्वास होता की सीन अत्यंत कलात्मक पद्धतीने शूट केला जाईल. सुरुवातीला मला मानसिक तयारी करावी लागली त्यानंतर मी हे सीन करायला तयार झाले असंही अनुरीताने सांगितलं आहे. जेव्हा स्क्रिप्ट चांगली असते आणि भूमिकेची ती आवश्यकता असते तेव्हा इंटीमसी को ऑर्डिनेटर्सची मदत आम्हाला होते असंही अनुरीताने सांगितलं.
इंटीमसी को ऑर्डीनेटरचा कोर्स करता येतो
इंटीमसी को ऑर्डिनेटर होण्यासाठी सहा महिन्यांचा कोर्स करता येतो. जशी संस्था असेल त्याप्रमाणे हा कालावधी ठरतो काही संस्थांमध्ये हा कालावधी आठ महिनेही आहे. इंटीमसी को ऑर्डिनेटर ही देखील एक कला आहे. ती शिकावी लागते, आत्मसात करावी लागते त्याशिवाय इंटीमसी को ऑर्डिनेटर कलाकरांना कम्फर्टेबल करु शकत नाही. कोर्स करणाऱ्यांना प्रमाणपत्र दिलं जातं तसंच या कोर्समध्ये इंटीमसी, लिंगभेद, लैंगिक संबंध, त्यामध्ये निर्माण होणाऱ्या भावना याविषयींचा अभ्यास असतो.