बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची ड्रग्ज प्रकरणात सध्या चौकशी सुरू आहे. वारंवार नवनवे खुलासे या प्रकरणात होत आहेत. सध्या तो एनसीबीच्या ताब्यात आहे. बॉलिवूडमधलं हे काही पहिलंच ड्रग प्रकरण नाही. याआधीही अनेक सेलिब्रिटी ड्रग्ज बाळगणे, त्यांचं सेवन करणे यामुळे अडचणीत आले आहेत. आता आर्यन खानच्या निमित्ताने जाणून घ्या भारतातला ड्रग्जविरोधी कायदा काय सांगतो? दोषी आढळल्यास काय शिक्षा होऊ शकते.

काय आहे अंमली पदार्थ विरोधी कायदा?

नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रापिस सब्सटंन्स अॅक्ट म्हणजेच NDPS Act 1985 आणि NDPS Act 1988 हे दोन कायदे सध्या भारतात लागू आहेत. या कायद्यांनुसार, अंमली पदार्थ बनवणे, जवळ बाळगणे, खरेदी-विक्री करणे, त्यांचा व्यापार, आयात निर्यात करणे हा गुन्हा आहे. केवळ वैद्यकीय आणि शास्त्रीय कारणासाठी अंमली पदार्थांचा वापर करण्यास भारतात परवानगी आहे. या नियमांचा भंग करणाऱ्यांच्या विरोधात खासगी किंवा सार्वजनिक ठिकाणी कारवाई करण्याचा अधिकार तपास यंत्रणांना या कायद्याने दिलेला आहे. तपासयंत्रणा आरोपी अथवा संशयिताविरोधात शोधमोहीम, जप्ती आणि अटक करु शकतात.

nashik md drugs loksatta
नाशिक : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन महिलांसह चौघे ताब्यात
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
drugs parli connection loksatta news
“गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्जचे परळी कनेक्शन”, आमदार सुरेश धस यांचा धाराशिवमध्ये गौप्यस्फोट
Drugs worth Rs 44 lakh seized in Katraj area one arrested by anti-narcotics squad
कात्रज भागात ४४ लाखांचे अमली पदार्थ जप्त, अमली पदार्थ विरोधी पथकाकडून एकाला अटक
two arrested with banned drugs at kalyan bail bazaar
कल्याणमध्ये बैलबाजारात प्रतिबंधित औषधांसह दोन जण अटकेत
Stock of illegal drugs cigarettes seized at airport Mumbai news
विमानतळावर अवैध औषधे, सिगारेटचा साठा जप्त
Alcohol consumption also increases the risk of cancer What is the warning from the US Surgeon General
मद्यसेवनामुळेही कर्करोगाचा धाेका? अमेरिकी सर्जन जनरलचा इशारा काय? बाटल्यांवर वैधानिक उल्लेख अनिवार्य?

ड्रग्ज नियंत्रणांतर्गत ३ श्रेणींमधल्या ड्रग्जचा उल्लेख कायद्यामध्ये आहे. यात एलएसडी, मॅथसारखे सायकोट्रॉपिक पदार्थ, चरस, गांजा अफीमसारखे नार्कोटिक्स पदार्थ आणि मादक पदार्थांचे केमिकलमिश्रित पदार्थ यांचा समावेश आहे. या प्रकरणात जर आरोप सिद्ध झाले तर किमान १० वर्षांची शिक्षा होऊ शकते तसंच एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूदही करण्यात आली आहे.

कोकेन ते गांजा असे २२५ पेक्षा अधिक सायकोट्रॉपिक आणि ड्रग्स भारतात प्रतिबंधित आहेत. यापैकी कोणत्याही प्रकारच्या मिश्रणाला, पदार्थाला जवळ बाळगले, त्यांचा वापर केला, कुठल्याही प्रकारे त्यांचा वापर केला, तर तो या कायद्याचा भंग मानला जातो. आणि गुन्हा समजून शिक्षा होऊ शकते. प्रकरणाचं गांभीर्य आणि सेवन करणाऱ्याचा हेतू पाहून किमान १० आणि कमाल २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते तसंच किमान १ लाखांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये स्वविवेकाने मृत्यूदंडाची शिक्षाही सुनावली जाऊ शकते. विदेशात अनेकदा अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Story img Loader