Mameru Ceremony in Gujarati Tradition : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांच्या बहुचर्चित विवाहसोहळ्याचे विधी सुरू झाले आहेत. १२ जुलैला हिंदू पद्धतीने त्यांचा विवाह होणार असून १३ जुलैला शुभ आशीर्वादाचा कार्यक्रम होणार आहे. तर, १४ जुलैला मोठा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तर या विधींना मामेरू या विधीने सुरुवात झाली. हा एक महत्त्वाचा विधी असतो. या विधीविषयी जाणून घेऊयात.

काय आहे मामेरू समारंभ?

बुधवारी (४ जुलै रोजी) मुकेश अंबानी यांच्या घरी ‘मामेरू’ समारंभ पार पडला. या समारंभासाठी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी व अंबानी कुटुंबियांचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते. नीता अंबानी यांच्या माहेरून त्यांची आई पूर्णिमा दलाल व बहीण ममता दलाल या समारंभासाठी आले होते, नीता अंबानी यांनी त्यांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं.

siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
mahakumbh 2025 kumbh mela kicks off with paush poornima in prayagraj
‘महाकुंभ’ आज पासून ; पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान; ४५ दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
Devdutt Padikkal smashes hundred in quarterfinal against Baroda in Vijay Hazare Trophy 2025
Vijay Hazare Trophy : १५ चौकार अन् २ षटकार… देवदत्त पडिक्कलची शतकी खेळी बडोद्यावर पडली भारी
Tuljabhavani Devi procession of goddess carried out on tiger vehicle
शाकंभरी नवरात्र महोत्सव, दुसर्‍या माळेला तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा
Mahant Ramgiri Maharaj on National Anthem
Mahant Ramgiri Maharaj: ‘जन-गण-मन आपले राष्ट्रगीत नाही’, महंत रामगिरी महाराज यांचे पुन्हा वादग्रस्त विधान; टागोर यांच्या नोबेल पुरस्काराबाबत म्हणाले…

मामेरू समारंभ ही गुजराती विवाह परंपरा आहे. या प्रथेमध्ये मामाला अधिक महत्त्व असतं. दोन्हींकडचे मामा आपल्या उत्सवमूर्तींसाठी भेटवस्तू आणि दागिने आणतात. तसंच, त्यांच्या आई-वडिलांसाठीही भेटवस्तू आणतात. मामाने आणलेले कपडे, दागिने नववधू-वर आणि आणि त्यांचे आई-वडिल परिधान करतात. त्यानंतर त्यांचं स्वागत केलं जातं. मुलीचे मामा नववधूला पनेतर साडी, दागिने, हस्तिंदती किंवा पांढऱ्या बांगड्या देतात. तर, मुलाचे मामाही वरासाठी असंच खास आकर्षक भेटवस्तू देतात.

मामेरू सोहळ्यासाठी अँटिलियावर सजावट

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा रिलायन्स कंपनीच्या जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. परंतु, मामेरू सोहळ्यासाठी संपूर्ण अँटिलियावर रोषणाई करण्यात आली. अँटिलिया लाल, गुलाबी आणि नारिंगी फुलांनी सजले आहे. तर, सोनेरी दिव्यांची सजावट करण्यात आली आहे. तसंच, डिजिटल स्क्रीनवर अनंत आणि राधिकाचा फोटो लावून ऑल दि बेस्टचा संदेश लिहिण्यात आला आहे. मुंबईत होणाऱ्या या लग्नात देशासह जगभरातील अनेक प्रसिद्ध लोक उपस्थित राहणार आहेत. 

हेही वाचा >> Photos : बांधणी लेहेंगा, आईचे दागिने अन्…; अंबानींच्या होणाऱ्या सुनबाईंचा ‘मामेरु’ समारंभासाठी पारंपरिक गुजराती लूक

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वी अंबानी कुटुंबाने ५० गरीब जोडप्यांच्या लग्नाचं आयोजन केलं होतं. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी मंगळवारी पालघरमध्ये ५० गरीब मुलींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. नवीन जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण अंबानी कुटुंब पालघरला आले होते. सामूहिक विवाह सोहळा पार पडताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या इतर कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

Story img Loader