सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्या म्हणजेच १३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने प्रेक्षकांना अवघ्या ९९ रुपयात सिनेमागृहांमध्ये चित्रपट पाहता येईल. एमएआय तिकिटात इतकी सवलत का देत आहे? राष्ट्रीय चित्रपट दिन नेमका का साजरा केला जातो? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

राष्ट्रीय चित्रपट दिन म्हणजे काय आणि तो का साजरा केला जातो?

‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, २०२२ मध्ये मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे (MAI) राष्ट्रीय चित्रपट दिनाची सुरुवात करण्यात आली होती. एमआयएने करोनाच्या साथीनंतर सिनेमा हॉल पुन्हा सुरू झाल्यामुळे या दिनाची सुरुवात केली. असोसिएशनने या दिवशी चित्रपटाच्या तिकिटांवर मोठी सवलत देण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे करोनाकाळात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या सिनेमा हॉल मालकांना मदत होईल आणि दर कमी असल्याने प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर येतील.

star pravah mi honar superstar chhote ustaad season 3 show winner
मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद ३ : यवतमाळची गीत बागडे ठरली महाविजेती! मिळालं ‘एवढ्या’ लाखांचं बक्षीस
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
neetu kapoor ridhhima kapoor sahni dance on jamal kadu
Video : आई अन् लेकीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स, रिद्धिमा कपूर साहनीबरोबर नीतू कपूर यांनी धरला ठेका; पाहा व्हिडीओ
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
canada tourist visa
कॅनडाने १० वर्षांचा टुरिस्ट व्हिसा का थांबवला? कॅनडाला वारंवार भेट देणार्‍या नागरिकांवर होणार परिणाम?
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी

राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वाढल्यामुळे स्पर्धा निर्माण झाली आहे. करोना काळात ही स्पर्धा वाढली. प्रेक्षक मोठ्या प्रमाणात ओटीटीकडे वळले, त्यामुळे सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची संख्या लक्षणीयरित्या घटली. सिनेमागृहे पुन्हा प्रेक्षकांनी गजबजावी, या उद्देशाने हा दिवस साजार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदा ‘जवान’, ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना प्रमोट करण्याचा सिनेमा हॉल मालकांचा प्रयत्न आहे, कारण या चित्रपटांनी प्रेक्षकांना थिएटरमध्ये परत आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

‘राष्ट्रीय चित्रपट दिना’निमित्त केवळ ९९ रूपयांमध्ये पाहता येणार चित्रपट; कुठे करता येणार बुकिंग? जाणून घ्या

या वर्षी राष्ट्रीय सिनेमा दिन ४ हजारपेक्षा जास्त स्क्रीनवर साजरा केला जाईल. ज्यामध्ये पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, मिराज, सिटी प्राइड, एशियन, मिक्ता ए2, मूव्ही टाइम, वेव्ह, एम2के आणि डिलाइट सारख्या प्रसिद्ध सिनेमागृहांचा समावेश आहे.

एमएआय म्हणजे काय?

एमएआयची स्थापना २००२ मध्ये फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) च्या छत्रछायेखाली आघाडीच्या सिनेमा ऑपरेटरद्वारे करण्यात आली. एमएआय ११ हून अधिक सिनेमा चेन्सचे प्रतिनिधित्व करते. त्यांचे देशभरात ५०० पेक्षा जास्त मल्टिप्लेक्स आहेत आणि २५०० पेक्षा जास्त स्क्रीन्स आहेत.

राष्ट्रीय चित्रपट दिन कधी साजरा केला जातो?

मल्टिप्लेक्स मालकांनी राष्ट्रीय चित्रपट दिनाची तारीख निश्चित केलेली नाही. काही तारखांच्या बदलांनंतर, गेल्या वर्षी २३ सप्टेंबर रोजी ७५ रुपयात तिकिटं प्रेक्षकांसाठी उपलब्ध होती. त्यादिवशी ६.५ मिलियन लोकांनी तिकिटं खरेदी केली होती. यंदा हा दिवस १३ ऑक्टोबरला साजरा केला जात आहे आणि प्रेक्षकांना कोणत्याही चित्रपटाचं तिकिट फक्त ९९ रुपयांना मिळेल.

राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त तुमच्यासाठी खास काय?

एमआयएने १३ ऑक्टोबर रोजी सर्व चित्रपटांसाठी ९९ रुपयांत चित्रपटाची तिकिटं देण्याचा निर्णय घेतला आहे. यात (कन्व्हिनियन्स फी + जीएसटी) समाविष्ट नाही. ही ऑफर आयमॅक्स, 4DX किंवा रिक्लिनर सीट सारख्या प्रीमियम फॉरमॅटवर लागू होत नाही. आंध्र प्रदेश, पाँडिचेरी, तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणा ही राज्ये वगळता संपूर्ण देशात तुम्हाला ९९ रुपयात ‘जवान’, ‘फुकरे’, ‘मिशन रानीगंज’सह इतर चित्रपट पाहता येईल.

‘धक धक’ आणि ‘गुठली लड्डू’ला राष्ट्रीय चित्रपट दिनाचा होणार फायदा

रत्ना पाठक शाह, फातिमा सना शेख, दिया मिर्झा आणि संजना संघी यांचा आगामी चित्रपट ‘धक धक’ १३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त तिकिटांचे दर कमी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या चित्रपटांना फायदा होईल, असं म्हटलं जात आहे. या व्यतिरिक्त देशातील प्रचलित जातिभेदाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकणारा संजय मिश्रा यांचा ‘गुठली लड्डू’देखील प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे या सिनेमालाही ऑफरचा लाभ मिळेल. तुम्ही बूक माय शो सारख्या प्लॅटफॉर्मवर तिकिटे ऑनलाइन बुक करू शकता.