गेल्या काही वर्षांपासून भारतात ओटीटी (OTT) पाहण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ओटीटी लोकप्रियता पाहता हल्ली अनेक चित्रपट हे चित्रपटगृहांऐवजी ओटीटी अॅप किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मिशन मजनू, शेरशाह, बधाई दो यांसारखे अनेक चित्रपट हे ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. पण ओटीटी म्हणजे काय? त्याचे फायदे का? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
करोना काळात ओटीटीवर चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. करोना काळात परिस्थितीनुसार टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर करण्यात आली. यामुळे चित्रपटगृह बंद होते. त्यामुळे जगभरात हजारोंच्या संख्येने चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. या काळात मनोरंजन क्षेत्र हे पूर्णपणे ओटीटी प्लॅटफॉर्मवर अवलंबून होते.
ओटीटीचा फुल फॉर्म नेमका काय?
Over-The-Top (ओव्हर-द-टॉप) असा ओटीटीचा फुल फॉर्म आहे. OTT वर तुम्हाला प्रदर्शित होणारा नवीन चित्रपट, वेबसीरिज किंवा अन्य मीडिया कंटेंट पाहायला मिळतो. ओटीटी ही व्हिडीओ स्ट्रीमिंग सर्व्हिस (Video Streaming Service) आहे. याआधी अमेरिकेत या सर्व्हिसला खूप मागणी होती. पण आता जगभरात याला प्रचंड मागणी वाढली आहे. भारतात ओटीटीच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय होतो.
ओटीटी अॅप म्हणजे काय?
ओटीटी अॅपवर आपल्याला वेबसीरिज, चित्रपट, मालिका सहज आणि सोप्या पद्धतीने पाहता येतात. हे ओटीटी अॅप्स मोबाईलवर किंवा स्मार्ट टीव्हीवर सुद्धा डाऊनलोड करुन वापरता येतात. ओटीटी अॅप्सवर टीव्हीवरील मालिकाही हल्ली उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार, वेळेप्रमाणे आणि कोणत्याही ठिकाणी बसून तुम्ही ओटीटीवरील चित्रपट किंवा मालिकांचा आनंद घेऊ शकता. सध्या अनेक ओटीटी अॅप हे त्यांच्या वेबसीरिजमुळे लोकप्रिय झाले आहेत.
ओटीटीचा नेमका फायदा काय?
ओटीटी अॅप किंवा प्लॅटफॉर्मचे अनेक फायदे आहेत. आपल्याला आपल्या आवडीचे कार्यक्रम किंवा चित्रपट टीव्हीवर पाहण्यासाठी केबल किंवा D2h कनेक्शनची गरज लागते. पण ओटीटीसाठी आपल्याला केवळ इंटरनेटची आणि एका स्मार्टफोनची आवश्यकता असते. या दोन गोष्टींच्या मदतीने प्रेक्षक हे सहजरित्या ओरिजनल कंटेंट, वेबसीरिज, नवीन चित्रपट, जुने चित्रपट आणि डॉक्युमेंट्री पाहू शकतात. ओटीटीची सुविधा प्रेक्षकांसाठी खूप सोयीस्कर आहे. लोक त्यांच्या सोयीनुसार हवं तेव्हा, हवं त्या ठिकाणी ओटीटी अॅपचा वापर करू शकतात.
गेल्या काही वर्षांपासून Amazon Prime, Netflix यांसारख्या ओटीटी सुविधा देणाऱ्या कंपन्या किंवा प्लॅटफॉर्म त्यांचा स्वतःचा ओरिजनल कंटेंट, वेब सीरिज आणि चित्रपट बनवत आहेत. हा कंटेट इतरत्र कुठेही उपलब्ध नसतो. केवळ त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा कंटेट पाहू शकता.
स्मार्टफोन, टॅबलेटमध्ये ओटीटी उपलब्ध आहेत. हे अॅप गुगल प्ले स्टोर किंवा अॅप स्टोरवरुन डाउनलोड करता येतात. आजकाल बाजारात मिळणाऱ्या स्मार्ट टीव्हींवर मध्ये सुद्धा OTT App ची सुविधा उपलब्ध असते. त्यामुळे ते फार सहजरित्या वापरता येते.
ओटीटी सर्व्हिसचे प्रकार
1) Transactional Video On Demand (TVOD)
या प्रकारच्या ओटीटी सर्व्हिसमध्ये कोणताही चित्रपट किंवा टेलिव्हिजन शो पाहण्यासाठी pay-per-view आधारे पैसे आकारले जातात. Apple iTunes याचे एक उदाहरण आहे.
2) Subscription Video On Demand (SVOD)
या सर्व्हिस मध्ये व्हिडीओ स्ट्रिमिंग कंटेंट पाहण्यासाठी पैसे देऊन त्या अॅपचे मासिक किंवा वर्षाचे सबस्क्रिप्शन विकत घ्यावे लागते. अमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्स हे ग्राहकांसाठी सबस्क्रिप्शन सुविधा पुरविते. हे प्लॅटफॉर्म सबस्क्रिप्शनच्या आधारावर ओरिजनल कंटेंट आणि वेबसीरिज ग्राहकांना उपलब्ध करून देतात.
3) Advertising Video On Demand (AVOD)
या ओटीटी सर्व्हिस मध्ये युजरला जाहिरात (Advertise) पाहावी लागते. या ओटीटी सुविधेमध्ये युजरला कंटेंट मोफत उपलब्ध करून दिला जातो. पण त्यासोबत युजरला Ads पाहाव्या लागतात. या Ads व्हिडिओ स्वरूपात पाहाव्या लागतात.
भारतातील लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म
- नेटफ्लिक्स (Netflix)
- डिस्ने+हॉटस्टार (Disney+ Hotstar)
- सोनी लिव्ह (SonyLIV)
- वूट (Voot)
- अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video)
- झी5 (Zee5)
- अल्ट बालाजी (ALTBalaji)
- जिओ सिनेमा (JioCinema)