What is Pet Passport: बहुतेक लोकांना आपल्या कुत्रा मांजर किंवा अन्य पाळीव प्राण्यांसह फिरण्याची हौस असते. या पाळीव प्राण्यांना ते आपल्या कुटुंबाचा एक भाग मानतात. पण जेव्हा पूर्ण कुटूंब कुठे फिरायाला जाते तेव्हा आपल्या कुत्र्या- मांजरींना घरी एकटे सोडून जावे लागते तेव्हा खरी समस्या निर्माण होते. पण काही लोक पाळीव प्राण्यांना स्वत:बरोबर घेऊन जाता पण असे तेव्हाच शक्य होते जेव्हा आपल्या देशात फिरतो. बहुतेकदा लोक परदेशात फिरायला जातात तेव्हा त्यांना आपल्या पाळीव प्राणी आणि कुत्र्यांना आपल्याबरोबर घेऊन जायचे असते. पण असे करण्यासाठी मुळात त्यांना पेट पासपोर्टबाबत (Pet Passport) माहिती असणे आवश्यक आहे. कारण त्याशिवाय तुम्ही पाळीव प्राण्यांना तुमच्याबरोबर परदेशात घेऊन जाऊ शकणार नाही.

तुम्ही आतापर्यंत माणसांच्या पासपोर्टबाबत ऐकले असेल पण आता तुम्ही म्हणाल हे पेट पासपोर्ट काय असतं? काळजी करू नका आज आम्ही तुम्हाला या पेट पासपोर्टबाबत माहिती देणार आहोत. हा कोणत्या पाळीव प्राण्याला परदेश प्रवासासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कित्येक देशामध्ये पासपोर्टशिवाय प्राण्यांना प्रवेश देतात पण काही देश असे आहेत जिथे हा पेटपोर्ट शिवाय पाळीव प्राण्यांना प्रवेश दिला जात नाही. म्हणूनच पेट पासपोर्ट अत्यंत आवश्यक आहे.

canada tourist visa
कॅनडाने १० वर्षांचा टुरिस्ट व्हिसा का थांबवला? कॅनडाला वारंवार भेट देणार्‍या नागरिकांवर होणार परिणाम?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
aai kuthe kay karte fame Radhika Deshpande expresses her point about women bindi on forehead
स्त्रीने टिकली लावण्याविषयी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली, “आपण आपली संस्कृती…”
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
peticoat cancer
साडी नेसणार्‍या महिलांना ‘पेटिकोट कॅन्सर’चा धोका? हा प्रकार काय आहे? अभ्यास काय सांगतो?
Viral Video Shows Driver created Home for his pets
वाह, मालकाची कमाल! पाळीव श्वानांना प्रवासात नेण्यासाठी केला जुगाड; VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या

वाराणसीचा ‘मोती जाणार आहे इटलीला

नुकतेच वाराणसीतील असेच एक प्रकरण चर्चेत आले आहे. मोती हा येथील रस्त्यावर फिरणारा कुत्रा वाराणसीहून इटलीला जाणार आहे. इटालियन लेखिका वारा लझारेट्टीने गेल्या दहा वर्षांपासून ती आपले पाळीव प्राणी म्हणून सांभाळले आहे. त्याचे प्रशिक्षण आणि आवश्यक कागदपत्रांचे कामही पूर्ण झाले आहे. तिचा पासपोर्टही तयार आहे, जो मोतीसाठी परदेशात जाण्यासाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे.

हेही वाचा – बेघर महिलेसह बिनधास्तपणे नाचताना दिसली तरुणी; तुमच्या चेहऱ्यावर हास्य घेऊन येईल ‘हा’ सुंदर व्हिडिओ

पाळीव प्राणी पासपोर्ट म्हणजे काय?

जर तुम्हाला तुमच्या पाळीव प्राण्याला परदेशात घेऊन जायचे असेल तर तुमच्याकडे पाळीव प्राण्यांचा पासपोर्ट म्हणजेच पेट पासपोर्ट असणे आवश्यक आहे. हा एक कागदपत्र आहे ज्यामध्ये पाळीव प्राण्याबद्दलची सर्व माहिती रेकॉर्ड केली जाते. दोन देशांमधील प्राण्यांचा प्रवास सुलभ करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. काही देशांना प्राण्यांसाठी अधिकृत पासपोर्टची आवश्यकता नसते, परंतु त्यांनी संबंधित देशाला त्यांच्या पाळीव प्राण्याबद्दल संपूर्ण माहिती देणे आणि संबंधित कागदपत्रे प्रदान करणे आवश्यक आहे.

पेट पासपोर्ट कसा असतो?

हे कागदाच्या किंवा छोट्या पुस्तिकेच्या स्वरूपात असू शकते. यात सर्वात महत्त्वाचा मायक्रोचिप क्रमांर आहे, जो परदेशात प्रवास करताना आवश्यक असल्यास पाळीव प्राण्याच्या गळ्यात किंवा त्वचेच्या आत लावली जाते. ही त्याची प्रमुख ओळख आहे. याशिवाय, पाळीव प्राण्याला रेबीजचे इंजेक्शन केव्हा आणि किती दिवसांपूर्वी दिले होते याची नोंद पासपोर्टमध्ये असते. हे विशेष आहे की केवळ पशुवैद्यच पाळीव प्राणी पासपोर्ट जारी करू शकतात.

हेही वाचा – अ‍ॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनच्या नादात जोडप्याने फिरण्यासाठी केली UBER कॅब अन् बिल आलं तब्बल २४ लाख रुपये!

पाळीव प्राणी पासपोर्टसाठी या सर्वात महत्वाच्या अटी आहेत

पेट पासपोर्ट बनवण्याची पहिली अट म्हणजे मायक्रोचिप बसवणे, जी प्राण्याची मुख्य ओळख आहे.
रेबीज लसीकरणाची तारीख आणि रेबीज अँटीबॉडी चाचणी अहवाल.
पिसू, टिक्स आणि इतर कीटकांवर उपचार करण्याचे प्रमाणपत्र.
प्राण्याला कोणताही आजार नसल्याची पशुवैद्यकीय खात्री.

परदेशातून भारतात प्राणी आणण्याचे नियम

बाहेरून येणारे पाळीव प्राणी मायक्रोचिपने सुसज्ज असले पाहिजेत.
जर एखाद्या पर्यटकाने तात्पुरता प्राणीबरोबर आणला तर त्याला परदेशी व्यापार महासंचालनालयाकडून परवाना घ्यावा लागेल.
भारतात दाखल होण्याच्या ३१ दिवस आधी रेबीज लसीकरण आवश्यक आहे.
प्राण्याला अलग ठेवणे आवश्यक असल्यास, ते किमान १४ दिवस आणि जास्तीत जास्त ३० दिवसांसाठी असते.
जर तुमचे पाळीव प्राणी कार्गोमधून आले असेल तर तुम्हाला ते घेण्यासाठी किमान ३० दिवसांच्या आत पोहोचावे लागेल.