Who Pay Professional Tax : अनेक राज्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्यावसायिक कर नियमांमध्ये बदल केले आहेत. आसाम सरकारने १५ हजार रुपयांपर्यंत कमावणाऱ्या व्यक्तींना व्यावसायिक करातून सवलत दिली आहे तर, कर्नाटक सरकारने व्यावसायिक कर नियमांमध्ये सुधारणात करताना कर २०० रुपयांपर्यंत वाढला आहे. दरम्यान, व्यावसायिक कर कसं काम करतो आणि विविध राज्यात ते कसे आकारले जातात हे पाहूयात.
व्यावसायिक कर म्हणजे काय?
उत्पन्नावर आधारित कोणत्याही प्रकारच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांवर म्हणजे नोकरादर वर्ग किंवा व्यावसायिक, फ्रीलान्सर यांना व्यावसायिक कर आकारला जातो. विशिष्ट उत्पन्न पातळीपेक्षा जास्त उत्पन्न मिळवणाऱ्यांवर हा कर लादला जातो. प्रत्येक राज्य व्यावसायिक कर आकारत नाही आणि त्यानुसार नियम बनवत नाही. म्हणून, वेगवेगळ्या राज्यांमध्ये कर दर वेगवेगळा असतो. परंतु, संविधानाच्या कलम २७६ मध्ये प्रति व्यक्ती व्यावसायिक कर आकारण्यासाठी कमाल मर्यादा ₹ २,५०० ची तरतूद केली आहे.
राज्यनिहाय व्यावसायिक कर श्रेणी (States-Wise Professional Tax Range)

आंध्र प्रदेश: १५,००१ ते २०,००० पर्यंत उत्पन्न असलेल्यांवर दरमहा ₹ १५० चा व्यावसायिक कर आकारला जातो . २०,००० पेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना २०० भरावे लागतात.

बिहार: राज्य सरकार ३ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांसाठी १,००० ते ₹ २,५०० पर्यंत व्यावसायिक कर आकारते .

छत्तीसगड: वार्षिक १ लाखापेक्षा जास्त उत्पन्नावर १३० ते २१० पर्यंत व्यावसायिक कर आकारला जातो.

गुजरात: १२,००० पेक्षा जास्त मासिक उत्पन्नासाठी २०० चा व्यावसायिक कर आकारला जातो.

झारखंड: राज्य दरवर्षी ३ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी १०० ते २०८ रुपयांपर्यंत व्यावसायिक कर आकारते.

कर्नाटक: २५ हजारापेक्षा जास्त मासिक उत्पन्नावर २०० चा व्यावसायिक कर आकारला जातो.

केरळ: १२ हजारापेक्षा जास्त असलेल्या अर्धवार्षिक उत्पन्नावर १२० ते १,२५० पर्यंत व्यावसायिक कर आकारला जातो.

मध्य प्रदेश: १८ हजार ७५० पेक्षा जास्त मासिक उत्पन्नासाठी १२५ ते २१२ पर्यंत व्यावसायिक कर आकारला जातो.

आसाम: १५ हजार रुपयांपर्यंतच्या मासिक उत्पन्नावर व्यावसायिक करातून सूट आहे.

महाराष्ट्र: ७ हजार ५०० पेक्षा जास्त मासिक उत्पन्नावर १७५ ते ३०० पर्यंत व्यावसायिक कर आकारला जातो. १० हजारापर्यंत उत्पन्न असलेल्या महिलांना कर सवलत दिली जाते.

मणिपूर: ५० हजारापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्नासाठी व्यावसायिक कर १,२०० ते ₹ २,५०० दरम्यान आहे.

मेघालय: ४ हजार १६६ आणि त्याहून अधिक मासिक उत्पन्नावर १६.५ ते २०८ पर्यंतचा व्यावसायिक कर आकारला जातो .

मिझोरम: ५ हजारापेक्षा जास्त मासिक उत्पन्नावर व्यावसायिक कर आकारला जातो, जो ७५ ते २०८ पर्यंत असतो.

नागालँड: ४ हजारापेक्षा जास्त मासिक उत्पन्नासाठी ३५ ते २०८ पर्यंत व्यावसायिक कर आकारला जातो.

ओडिशा: १ लाख ६० हजारापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींना दरमहा १२५ ते ३०० पर्यंत व्यावसायिक कर भरावा लागेल.

पुद्दुचेरी: १ लाखापेक्षा जास्त वार्षिक पगारासाठी २५० ते ₹ १,२५० पर्यंत कर आकारला जातो.

पंजाब: दरमहा २० हजार ८३३ पेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींना २०० चा व्यावसायिक कर आकारला जातो.

सिक्कीम: २०,००० पेक्षा जास्त मासिक उत्पन्नावर कर आकारला जातो, जो १२५ ते २०० पर्यंत असतो.

तामिळनाडू : २१ हजारापेक्षा जास्त मासिक उत्पन्नावर १०० ते १,०९५ दरम्यान व्यावसायिक कर आकारला जातो.

त्रिपुरा: दरमहा ७ हजार ५०० ते १५ हजारापर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना १५० चा व्यावसायिक कर भरावा लागेल. १५ हजारापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना २०८ भरावा लागेल .

तेलंगणा: १५ हजार ते २० हजार रुपयांच्या दरम्यान उत्पन्न असलेल्यांवर १५० रुपयांचा व्यावसायिक कर आकारला जातो आणि २०,००० रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांवर २०० रुपयांचा व्यावसायिक कर आकारला जातो.

पश्चिम बंगाल: १० हजारापेक्षा जास्त मासिक उत्पन्नासाठी व्यावसायिक कर ११० ते २०० च्या श्रेणीत असेल .