वारसा स्थळां(World Heritage Site)मध्ये सांस्कृतिक, नैसर्गिक व मिश्र अशा स्थळांचा समावेश होतो. आता या वारसा स्थळांमध्ये एखाद्या ठिकाणाचा समावेश करण्यासाठी कोणते निकष वापरले जातात? कोणत्या नियमांच्या आधारे ही वारसा स्थळे निवडली जातात. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अ‍ॅण्ड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) ही संघटना जागतिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या संरक्षणाशी संबंधित स्थळांचे संरक्षण आणि जतन करण्याचा प्रयत्न करते. हा आंतरराष्ट्रीय करार १९७२ मध्ये तयार करण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्या देशांनी कराराला मान्यता दिली आहे, ते त्यांच्या देशातील ठिकाणे जागतिक वारसा समितीला नामनिर्देशित करतात. जागतिक वारसा स्थळामध्ये एखाद्या ठिकाणाचा समावेश केला जातो, त्यावेळी काही निकषांची पूर्तता करणे आवश्यक असते. त्या ठिकाणाला वैश्विक मूल्य असणे आणि खालीलपैकी एका निकषाची पूर्तता करणे गरजेचे आहे.

निकष खालीलप्रमाणे

१. जी ठिकाणे मानवाच्या सर्जनशीलतेचे प्रतिनिधित्व करतात.

२. तसेच विचाराधीन असलेले स्थळ किंवा स्मारक, पुरातत्त्व कला, तंत्रज्ञान किंवा शिल्प यांच्या विकासादरम्यान ते कोणत्या तरी खास काळादरम्यान जगातील सांस्कृतिक क्षेत्रात मानवीय मूल्यांची देवाण-घेवाण करणारे असले पाहिजे.

३. हरवलेली किंवा सध्या अस्तित्वात असलेली संस्कृती किंवा सांस्कृतिक वारशामध्ये त्याचे काहीतरी वेगळेपण असावे.

४. ते बांधकामाचे असे सर्वोत्तम उदाहरण असावे; जे वास्तुकला, स्थापत्य कला किंवा तंत्रज्ञान किंवा नैसर्गिक लँडस्केपचे उत्कृष्ट उदाहरण असेल किंवा मानवाच्या इतिहासातील एखाद्या उल्लेखनीय कालखंडाची ओळख असेल.

५. एखाद्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा एखादा भूभाग, समुद्रातील भाग किंवा पारंपरिक मानवनिर्मित कलेचा सर्वोत्तम नमुना असेल किंवा सध्या असुरक्षित बनलेला असा एखादा घटक ज्याचे पर्यावरण आणि मानवतेशी खास नाते राहिले असेल.

६. मूर्त किंवा अमूर्तपणे कार्यक्रम, परंपरा, कल्पना किंवा श्रद्धा, जागतिक महत्त्व असलेल्या कलात्मक किंवा साहित्यिक गोष्टींशी असलेला संबंध.

७. अपवादात्मक नैसर्गिक सौंदर्य असलेले ठिकाण.

८. भूरूपे, जीवनाची नोंद, भूस्वरूपांच्या विकासातील महत्त्वपूर्ण चालू असलेल्या भूवैज्ञानिक प्रक्रिया किंवा महत्त्वपूर्ण भौगोलिक वैशिष्ट्ये आदी बाबींसंदर्भात पृथ्वीचा इतिहास सांगणारी महत्त्वाची ठिकाणे.

हेही वाचा: लाडक्या सुनेचा वाढदिवस! मृणाल कुलकर्णींची शिवानी रांगोळेसाठी खास पोस्ट; म्हणाल्या, “काहीतरी गंमत…”

९. स्थलीय, ताजे पाणी, किनारी व सागरी परिसंस्था आणि वनस्पती, प्राणी यांच्या समुदायांच्या उत्क्रांती आणि विकासातील महत्त्वपूर्ण चालू पर्यावरणीय आणि जैविक प्रक्रियांचे प्रतिनिधित्व करणारी उत्कृष्ट उदाहरणे

१०. जैवविविधता असलेले महत्त्वाचे नैसर्गिक अधिवास; ज्यामध्ये धोका असलेल्या प्रजातींचा समावेश आहे आणि ज्यांना वैज्ञानिक किंवा संवर्धनाच्या दृष्टीने वैश्विक मूल्य आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is selection criteria site to be included on the world heritage list nsp