What Is Separation Marriage : विवाह हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा आणि महत्त्वाचा क्षण असतो. भारतात लग्न करताना पती-पत्नी एकमेकांसोबत जगण्या-मरण्याची शपथ घेतात. तसेच आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन दिले जाते. पती-पत्नीने एकमेकांची काळजी घेणे, विश्वास ठेवणे, अडचणीच्या काळात साथ देणे आणि एकमेकांवर खूप प्रेम करणे हा भारतातील विवाहाचा खरा अर्थ आहे. पण वेगवेगळ्या देशांमध्ये विवाहाच्या पद्धती, चालीरिती भिन्न आहेत. यामुळे प्रत्येक देशातील संस्कृती, सामाजिक व्यवस्था, चाली-रितींनुसार विवाहाची पद्धत आणि अर्थ बदलतो. पण जपानसह काही देशांमध्ये लग्नाबाबत एक नवीन ट्रेंड सुरु झाला आहे, ज्याला सेपरेशन मॅरेज किंवा वीकेंड मॅरेज असे नाव देण्यात आले आहे.
सपरेशन मॅरेज हे नाव ऐकताच तुमच्या मनात विचार आल असेल की, लग्नानंतर पती-पत्नी एकमेकांपासून वेगळे होतात किंवा लग्नाआधीच वेगळे होण्याची वेळ ठरवली जात असेल. पण याचा अर्थ तसा नाही. त्यामुळे जाणून घेऊ सेपरेशन मॅरेज म्हणजे नेमक काय? आणि विशेषत: जपानमध्ये लग्नाची ही पद्धत लोकांना का आवडते जाणून घेऊ..
सेपरेशन मॅरेज किंवा वीकेंड मॅरेजचा नेमका अर्थ काय?
सेपरेशन मॅरेजचा अर्थ विवाहाआधीच विभक्त होण्याचा निर्णय घेणे असा नाही तर विवाहानंतर जोपडे एकत्र राहत नाहीत असा आहे. जपानमध्ये वाढत्या सेपरेशन मॅरेज किंवा वीकेंड मॅरेज पद्धतीत जोडपी एकाच घरात राहतात पण ते एकाच खोलीत एकत्र झोपत नाहीत. काही जोडपी विवाहानंतर वेगवेगळ्या अपार्टमेंटमध्ये राहतात. याशिवाय एकाच शहरात किंवा एकाच सोसायटीमध्ये राहूनही ही जोडपी एकमेकांना रोज भेटत नाहीत. सेपरेशन मॅरेज करणारी जोडपी भावनिकदृष्ट्या एकमेकांशी जोडलेली नसतात असे नाही, तर ते देखील एकमेकांवर सामान्य विवाहित पती-पत्नीप्रमाणेच प्रेम करतात, आपल्या भावना एकमेकांना शेअर करतात. एकमेकांचा आदर करतात तसेच भविष्यातील अनेक निर्णय सोबत घेतात.
सेपरेशन मॅरेजचा अर्थ काय?
सेपरेशन मॅरेज करणाऱ्या लोकांच्या मते, लग्नानंतरही त्यांना स्वातंत्र्य उपभोगता येते आपल्या मनाप्रमाणे राहता येते. सपरेशन मॅरेज केलेले पती-पत्नीचा एकमेकांवर सामान्य जोडप्यांपेक्षा जास्त विश्वास असतो. कोणताही गोष्टीसाठी ते एकमेकांवर आंधळा विश्वास ठेवू शकतात. यात बहुतांश जोडप्यांची जीवनशैली एकमेकांपेक्षा खूप वेगळी असते, असे त्यांचे मत आहे. उदाहरणार्थ, जर बायकोला सकाळी ६ वाजता उठण्याची सवय असेल तर नवऱ्याला सकाळी ९ वाजेपर्यंत झोपून राहण्याची सवय असते. यात वेगळे राहून ते झोपेच्या वेळा आणि एकमेकांच्या इतर सवयी जुळवण्याचा कधी प्रयत्न करत नाहीत. यामुळे दोघंही एकमेकांना कशावरूनही बंधने लादत नाहीत. यामुळे दोघांमधील नाते अधिक घट्ट राहते. पत्नीला लवकर जाग येत असेल तरी तिला पतीच्या खूप वेळ झोपण्याचा त्रास होत नाही. यात जपानमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगली झोप घेणे या गोष्टीला खूप महत्त्व आहे.
सेपरेशन मॅरेजचे तोटे
सेपरेशन मॅरेजमध्ये पत्नीला एकटीलाच मुलांचे संगोपन करावे लागते. अगदी लहानपणी त्यांची काळजी घेण्यापासून ते मोठे होईपर्यंत पत्नीलाच सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. कारण अनेकदा यात पतीची मदत मिळच नाही. लग्नानंतर पतीलाही कपडे धुणे, जेवण बनवण्यापासून घरातील सर्व कामे त्यालाच करावी लागतात. यात पती असूनही पत्नीला स्वत:चे खर्च भागवण्यासाठी कमवावे लागते.
जपानच्या संस्कृतीत शरीराशी बाह्य संबंध कमी ठेवण्याची परंपरा खूप सामान्य आहे. जपानमध्ये पती-पत्नीने रात्री एकमेकांपासून वेगवेगळे झोपतात. पण असं करणं तिथे सक्तीचे नाही. पती-पत्नीला एकत्र झोपायचे असेल तर ते झोपू शकतात.