Shop lifting हा शब्द तुम्ही ऐकला असेल. शॉपलिफ्टिंग किंवा उचलेगिरी म्हणजे काय? याचा नीट विचार केला तर या शब्दातच अर्थ लपलेला आहे. कुठल्याही दुकानातून वस्तू उचलणे किंवा चोरी करणे याला शॉपलिफ्टिंग म्हणतात. अनेक दुकांमध्ये अशा घटना घडतात. आपण आता जाणून घेऊ शॉपलिफ्टिंगसाठी शिक्षा काय? कायदा नेमकं काय सांगतो?
शॉप लिफ्टिंगबाबत कायदा काय सांगतो?
शॉप लिफ्टिंग म्हणजेच कुठल्याही दुकानातून उचलेगिरी करणं. ही उचलेगिरी केल्यानंतर तीच शिक्षा होते जी चोरी केल्यानंतर होते. भारतीय दंड संहितेनुसार कलम ३७९ मध्ये सांगितलं आहे. तर कलम ३८० मध्ये दुकान किंवा घरात उचलेगिरी किंवा चोरी झाल्यास काय शिक्षा आहेत ते सांगितलं आहे.
काय शिक्षा आहे?
शॉप लिफ्टिंग आणि चोरीसाठी एकच शिक्षा आहे. ठराविक वेळेसाठी तुरुंगवास जो जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे उचलेगिरीसाठी दंडाचीही तरतूद आहे. दंड आणि तुरुंगवास अशा दोन्ही शिक्षाही सुनावल्या जाऊ शकतात. गुन्हा किती गंभीर आहे? किती पैसे चोरलेत किंवा किती किंमत असलेली वस्तू उचलली आहे त्यावरुन शिक्षा ठरवली जाते. दुकानाच्या आत चोरी झाली तर कलम ३८० द्वारे गुन्हा नोंदवण्यात येतो.
चोरीची व्याख्या काय आहे?
एखाद्या व्यक्तीच्या मालकीची असलेली वस्तू, पैसे किंवा तत्सम सामान त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय आणि कुणालाही लक्षात न येता घेऊन जातो याला चोरी असं म्हणतात. यासाठी कमीत कमी तीन वर्षे शिक्षेची तरतूद आहे.