Causes of smartphone vision syndrome : स्मार्टफोन आणि स्क्रीन ही आपल्या दैनंदिन जीवनातील जणू काही एक गरज ठरते आहे. आपल्या सगळ्यांची बहुतेक कामे आता स्क्रीनशी जोडलेली असल्याने नेहमी मोबाईलशी कनेक्ट राहण्याची आवश्यकता असते. पण, दीर्घकाळ स्क्रीन एक्स्पोजरमुळे आपल्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो आणि स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोम होऊ शकतो. तसेच स्मार्टफोनच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने डोळ्यांमध्ये जळजळसुद्धा जाणवते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एचटी लाइफस्टाईलला दिलेल्या मुलाखतीत, शार्प साईट आय हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर अभिनव सिंग म्हणाले, “सोशल मीडियावर अपडेट राहण्यापासून ते मीटिंग्जमध्ये सहभागी होण्यापर्यंत आदी दैनंदिन कामे सांभाळण्यापर्यंत स्मार्टफोनची गरज भासते. पण, या गरजेची नकारात्मक बाजूसुद्धा आहे आणि ती म्हणजे व्हिजन सिंड्रोम (SVS). ही एक वाढती चिंता दीर्घकाळ स्मार्टफोन वापरामुळे डोळ्यांना जाणवणारा ताण आणि अस्वस्थता यांचा संदर्भ देते .

स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोमची कारणे

एक्स्टेन्ड (विस्तारित) स्क्रीन टाईम – काम, मनोरंजन किंवा सोशल मीडियावरून स्क्रोलिंग यांसाठी स्मार्टफोनचा सतत वापर.

डोळे मिचकावण्याचे प्रमाण कमी होणे : स्क्रीन वापरताना, डोळे मिचकावण्याचे प्रमाण सुमारे ६० टक्क्यांनी कमी होते, ज्यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा येऊन अस्वस्थता जाणवते.

फोन जवळून पाहणे : फोन डोळ्यांच्या खूप जवळ ठेवल्याने डोळ्यांच्या स्नायूंवर ताण वाढतो.

अपुरा प्रकाश : अपुऱ्या प्रकाशाच्या वातावरणात स्मार्टफोन वापरल्याने डोळ्यांवरील ताण वाढतो.

स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोमची सुरुवातीची लक्षणे

डोळ्यांची अस्वस्थता आणि थकवा : डोळ्यांच्या आजूबाजूला सतत ताण जाणवणे.

अंधुक दृष्टी : मोबाईलच्या विस्तारित वापरानंतर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे.

डोकेदुखी : डोळ्यांच्या दीर्घ ताणामुळे वारंवार डोकेदुखी जाणवणे.

कोरडे डोळे : डोळे मिचकावल्यावर जळजळ होणे.

मान आणि खांदे दुखणे : स्मार्टफोन वापरताना चुकीच्या पद्धतीत बसल्यामुळे मस्क्युकोस्केलेटल ताण वाढवते.

तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मस्क्युकोस्केलेटल म्हणजे काय? तर मस्क्युकोस्केलेटल ही स्नायू, हाडे, कंडरे, अस्थिबंधन, सांधे आदींशी संबंधित प्रणाली आहे. ही प्रणाली मानवी आरोग्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. या प्रणालीमुळे शरीराची रचना आणि हालचाली होऊ शकतात. मस्क्युकोस्केलेटल डिसऑर्डर (MSD) म्हणजे शरीराच्या मस्क्यूकोस्केलेटल प्रणालीला होणारे विकार किंवा दुखापत. या विकारांमुळे शरीराच्या हालचालींवर परिणाम होतो.

झोपेची अडचण : निळ्या प्रकाशाचा अतिरेक शरीराच्या सर्कॅडियन लयीमध्ये (circadian rhythm), झोपेच्या पद्धतींमध्ये व्यत्यय आणतो.

या समस्येवर उपचार कसा करायचा?

डॉक्टरांनी सांगितले की, स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोमच्या उपचारांमध्ये लक्षणे आणि मूळ कारणे संबोधित करणे समाविष्ट आहे.

आर्टिफिशियल अश्रू (Artificial tears) : डोळे मिचकावल्यामुळे येणारा कोरडेपणा आणि चिडचिड कमी करू शकतात.

ब्ल्यू लाईट ग्लास (Blue light glasses) : ब्ल्यू लाईट ग्लास किंवा फिल्टर करणाऱ्या विशेष लेन्स वापरल्याने डोळ्यांवरील ताण कमी होऊ शकतो.

डोळ्यांचे व्यायाम : २०-२०-२० नियम म्हणजे ‘दर २० मिनिटांनी २० सेकंदांनी २० फूट दूर काहीतरी पाहणे’ डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळण्यास मदत होते.

नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे : तुम्हाला संभाव्यत: चष्मा वापरण्याची आवश्यकतासुद्धा असू शकते. नेमकी परिस्थिती समजून घेण्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

थेराप्युटिक ड्रॉप्स (Therapeutic drops) : तज्ज्ञांनी लिहून दिलेले ड्रॉप्स डोळ्यांचे हायड्रेशन सुधारू शकतात.

या समस्येवर प्रतिबंध घालण्यासाठी टिप्स :

स्क्रीन वेळ मर्यादित करा : आवश्यक असेल तेव्हाच तुमचा स्मार्टफोन वापरा किंवा दररोज किती वेळ स्मार्टफोन बघायचा हे ठरवा.

स्क्रीन सेटिंग्ज समायोजित करा : ब्राइटनेस कमी करा, ब्ल्यू लाईट फिल्टर एनेबल करा आणि स्मार्टफोनमधील टेक्स्ट वाचनासाठी फॉन्ट आकार वाढवा.

योग्य अंतर ठेवा : तुमचा स्मार्टफोन व डोळे यांच्यामध्ये १६ ते २४ इंचांचे अंतर ठेवा .

डोळे मिचकावणे : कोरडेपणा टाळण्यासाठी अधिक वेळा डोळे मिचकावण्याचा प्रयत्न करा.

२०-२०-२० नियमाचे पालन : हा सराव डोळ्यांचा थकवा कमी करू शकतो.

ब्रेक घ्या : सतत स्मार्टफोन वापरणे टाळा. तुमच्या डोळ्यांना मधे-मधे विश्रांती द्या.

हायड्रेशन : दररोज दोन ते तीन लिटर पाणी पिऊन स्वतःला हायड्रेट ठेवा.