पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने शनिवारी (७ ऑक्टोबर) गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ला केला. यावेळी हमासचे शेकडो दहशतवादी सीमा ओलांडून इस्रायलमध्ये घुसले. दहशतवाद्यांनी गाझा सीमेलगत असणाऱ्या इस्त्रायली समुदायाच्या ‘सुपरनोव्हा संगीत महोत्सवा’च्या कार्यक्रमावर हल्ला केला. यामध्ये अनेक तरुण-तरुणींचा जीव गेला. तर अनेकांचं अपहरणही करण्यात आलं. याबाबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण हा सुपरनोव्हा संगीत महोत्सव नेमका काय असतो? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. चला तर मग जाणून घेऊयात…

‘सुपरनोव्हा’ संगीत महोत्सव नेमका काय असतो?

खरं तर, इस्रायलमध्ये २९ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत ज्यू धर्मियांचा पवित्र सण सुक्कोट साजरा करण्यात आला. या सणानंतर एकता आणि प्रेमाचा संदेश देण्यासाठी ‘सुपरनोव्हा म्युझिक फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येतो. याच कार्यक्रमाला ‘युनिव्हर्सो पॅरालेलो फेस्टिव्हल’ असंही म्हटलं जातं. असाच कार्यक्रम गाझा पट्टीच्या सीमेपासून अगदी जवळ असलेल्या इस्रायलच्या रेइम भागात आयोजित करण्यात आला होता. ज्यू लोकांना इजिप्तमधून इस्रायलमध्ये आणताना मिळालेल्या दैवी संरक्षणाचं स्मरण म्हणून सुक्कोट सण साजरा केला जातो.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
Peoples representatives do not want helmets then why police insisting Jan Manch organization Question
लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त

हेही वाचा- इस्रायलवर हल्ला करणारी पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ संघटना नेमकी काय आहे?

‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, इस्रायलमध्ये आठवडाभर चाललेल्या सुक्कोट धार्मिक सणाच्या समाप्तीनंतर शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एकता आणि प्रेमाचा संदेश देण्यासाठी सुपरनोव्हा संगीत महोत्सव सुरू झाला. खुल्या मैदानात सुरू झालेल्या या संगीत महोत्सवाला हजारो तरुणांनी हजेरी लावली होती.

याच कार्यक्रमस्थळी हमासने शनिवारी पहाटे हल्ला केला. यामध्ये अनेकांचा जीव गेला तर बऱ्याच जणांचं अपहरण करण्यात आलं. विशेष म्हणजे हा हल्ला झाला, त्यावेळी बरेच तरुण-तरुणी मद्य आणि ड्रग्जच्या नशेत होते. गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ला होत असताना हमासचे दहशतवादी वाहनं आणि दुचाकीवरून इस्रायलच्या सीमाभागात घुसले. त्यांच्याजवळ एके-४७ बंदुकीसह प्राणघातक शस्त्रे आणि दारुगोळा होता. त्यांनी घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर पॅलेस्टाईन-इस्रायल युद्धाला सुरुवात झाली.

Story img Loader