history of basata tradition भारतात लग्नाच्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. यार्षीच्या हंगामात जवळपास ३८ लाखांहून अधिक लग्ने होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं होणाऱ्या विवाहांमुळे, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या व्यापाऱ्यांच्या गटाने यावेळी देशात सुमारे ४.७४ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. लग्न ठरल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ‘लग्नाची खरेदी. लग्नाचा बस्ता हा मोठा कार्यक्रम. पांढरी शुभ्र चादर, लोड, गुबगुबीत गाद्यांवर अंथरुन, थंड सरबताने आपलं स्वागत दुकानदार करतात. वधू-वरापासून सर्व नातेवाईकांपर्यंत सगळ्यांची मर्जी सांभाळावी लागते. या सोहळ्यात वधू आणि वर आकर्षणाचे केंद्र असल्याने त्यांचा लुक सर्वाधिक आकर्षक असणे गरजेचे असते. त्यामुळे बदलत्या ट्रेंडमध्ये पारंपरिक ‘लग्नाचा बस्ता’ कार्यक्रमाची क्रेझ आजही कायम आहे.

अक्षता, आशीर्वाद यांच्या जोडीला साज श्रृंगार सांभाळून, वधू भांबावलेली असते. त्यात शालू हा आवरून, सावरून दमणूक होते. सध्या शालूला आधुनिक पर्याय स्वीकारले जावू लागले आहेत. पण, लग्नाचा शालू अनुभवणे म्हणजे “जावे त्यांच्या वंशा”सारखे आहे. अतिशय भावनिक अशी ही खरेदी असते. नवरीसाठी जोडीदार निवडणे हे एक वेळ सोपे ठरेल, पण तिचा शालू… तिची भावना, होणारे सासर आणि माहेर यामध्ये गुतंलेले असते.

Nagpur West constituency, Sudhakar Kohle,
पश्चिममध्ये ठाकरे विरुद्ध आता दक्षिणचे पुन्हा ‘सुधाकर’
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
share market down marathi news,
शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच आतिषबाजी!
Diwali 2024 horoscope three zodiac signs
दिवाळी घेऊन येणार सुखाचे दिवस; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिन्यात मिळणार भरपूर पैसा, प्रेम अन् मानसन्मान
2000-year-old underwater 'Indiana Jones' temple discovered
2,000-year-old temple:समुद्राखाली सापडलेले २००० वर्षे प्राचीन मंदिर कोणता इतिहास सांगते?
Loksatta article Justice Dhananjay Chandrachud out of court statement
न्याय की देवाचा कौल?
Arranged Marriage Goals
“Arranged Marriage असं गाजवा की लोकांना Love Marriage वाटलं पाहिजे!”, हळद लागताच नवरा-नवरीने केला भन्नाट डान्स, Video Viral
sobhita dhulpala naga chaitainya wedding
लवकरच सोभिता धुलिपाला नागार्जुनच्या घरची होणार सून, लग्नाआधीच्या समारंभाला झाली सुरुवात

ग्रामीण भागात लग्नाला सुरुवात झाली की हे सोहळे आठवणीत रहावेत म्हणून अनेक परंपरागत विधी केले जातात. त्यात वधू-वरांचा बस्ता हा महत्त्वाचा भाग असतो. हाच बस्ता बांधण्याची कामशेतच्या बाजारपेठेत ऐंशी वर्षांची परंपरा आहे. याच लग्नाच्या बस्त्यासंदर्भात आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

‘बस्ता’ म्हणजे काय?

लग्न ठरल्यावर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ‘लग्नाची शॉपिंग. म्हणजेच बस्ता. बस्ता म्हणजे काय? लग्न समारंभासाठी बस्ता बांधण्याची पंरपरा कधी सुरू झाली? त्याचा इतिहास, परंपरा याबद्दल जाणून घेऊ. साखरपुड्यापासून ते विवाहामधील काळात वधूचा पोशाख व दागदागिने यांची तसेच वराचा पोशाख यांची खरेदी केली जाते. ऐपतीनुसार वरपक्षाकडून वधूला वस्त्रे व दागिने खरेदी केले जातात. वधू पक्षाकडूनही वरासाठी एखादा दागिना व वरमाई आणि इतर मानपानाच्या साड्या, कपडे इत्यादींची खरेदी केली जाते. या कापडखरेदीला ‘बस्ता बांधणे’ असे नाव आहे. बस्ता हा शब्द अरबी भाषेतून मराठीत आलेला आहे.

काळाच्या ओघात कपड्यांचा ट्रेंड बदलत गेला. परंतु, गावकरी आणि व्यापाऱ्यांचे नाते जसेच्या तसेच घट्ट आहे. बस्ता झाल्यावर नातेवाईक आणि दुकानदार यांच्यात किमतीवर होणारी हुज्जतही अवीट प्रेमाचा भाग आहे. मात्र, किमतीत होणारी ओढाताण पाहण्यासारखी असते. पूर्वी खरेदीला आलेल्या नातेवाइकांची गप्पांच्या मैफलीत एक बस्ता बांधताना इतरांचीही लग्न तेथे ठरत. दीडशे-दोनशे रुपयांत नवरीच्या तीन साड्यांची खरेदी होत होती; तर नवरदेव धोतर, सदरा, लाल रंगाचा फेटा व उपरणे हा पेहराव घालून बोहल्यावर चढायचा. आता कपड्यांच्या अनेक व्हरायटी बाजारात आल्या. दोनशे रुपयांचा बस्ता सध्या बारा हजारांच्या वर पोचला आहे.

वरांची पसंती पारंपरिक

सध्याच्या काही वरांची पसंती लग्नात पारंपरिक भारतीय, तर रिसेप्शनला पाश्चात्त्य पोशाखाला दिली जाते. सध्या एकच रंग तसेच एकाच डिझाइनचे कपडे सर्व महिलांनी नेसण्याचाही ट्रेंड आहे. काही लग्नांमध्ये तर वधू, वर व करवलीसाठी सारख्याच रंगाचे पोशाख तयार करवून घेण्यात येत आहेत. २० हजारांपासून ते लाखो रुपयांचा बस्ता खरेदी करण्यात येत आहे.

लेहंग्याचा ट्रेंड

विविध प्रकारचे शालू, पैठणीकडे महिला वर्गाची पसंती आहे. बदलत्या ट्रेंडमध्ये बस्त्याला मागणी आहे. मुलींना हल्ली साडीपेक्षाही घागरा-चोली आवडते. वधूसाठी पूर्वी पैठणीला महत्त्व होते. आता लेहंग्याचा ट्रेंड सुरू आहे. शालूलापण मागणी आहे. साड्यांमध्ये सिल्क, दाक्षिणात्य शैलीतील ब्रोकेड, टिश्यू कांजीवरम तसेच बनारसीला मागणी आहे. संगीत कार्यक्रमासाठी आवर्जून हँडवर्क केलेल्या गाउनला पसंती दिली जाते. प्रत्यक्ष लग्न सोहळ्यात लेहंगा-चोलीला क्रेझ सध्या इतकी आहे, की वधूबरोबरच कुटुंबातील तरुण व मध्यमवयीन महिलाही हाच पेहराव करीत आहेत. चाळीस हजार ते तीन लाख रुपये किमतीपर्यंतचे लेहंगे खरेदी करण्यात येतात.

फॅशन तीच ट्रेंड नवा

फॅशन हा अनेकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. हौसेला मोल नसते, त्यामुळे विशेषतः तरुण फॅशनबाबत खिशाचा विचार करत नाहीत. पण, आता तरुणाई फार खर्चात न पडता नवनव्या फॅशन ट्राय करताना ड्रेस भाडेतत्त्वावर घेत आहेत. यामुळे वेळ नुसती मारून नव्हे, तर भारून नेता येत असल्याचे पटल्याने तरुणाईला हा नवा ट्रेंड आकर्षक वाटतो. लग्न, पार्टी, सण-समारंभ तसेच प्री वेडिंग फोटोशूट अशा समारंभासाठी महागडे कपडे घेतले जातात. जास्त वापर नसल्यामुळे ते नंतर पडून राहतात. असे महागडे कपडे घेणे आवाक्‍याबाहेरदेखील जाते. त्यामुळे हल्ली तरुणाई हा नवा ट्रेंड फॉलो करताना दिसत आहे.

भाडेतत्त्वावर कपडे खूप आधीपासून मिळतात. पण ते नाटक, नाटकातील पात्रे यासाठीच मिळत होते. आता त्याचे स्वरूप बदलले आहे. सण-समारंभासाठी पार्टीवेअर कपडे भाडेतत्त्वावर घेतले जातात. फॅशननुसार कपडे मिळत असल्यामुळे त्यांची मागणी वाढत आहे.

हेही वाचा >> मेहंदीचा रंग, नवऱ्याचं प्रेम अन् ५ हजार वर्षांचा इतिहास; वाचा मेहंदी लावण्याचे खरे कारण 

पैठणीचा इतिहास

लग्नाच्या बस्त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पोशाख म्हणजे पैठणी. कितीही नवे ट्रेंड येऊदेत, पैठणीशिवाय बस्ता पूर्ण होतच नाही. याच पैठणीचा इतिहास पाहूयात. पैठणी या महावस्त्राच्या इतिहासाला २००० वर्षांची पंरपरा आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या पैठण या ऐतिहासिक नगरीवरून या वस्त्राला पैठणी हे नाव मिळाले. प्राचीन काळी पैठणला प्रतिष्ठान, पाटन, पट्टून, पोतान, पैठान अशा अनेक नावांनी ओळखले जात होते. या शहराला सांस्कृतिक, धार्मिक महत्त्व आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याचा वैभवशाली इतिहास आहे. संतांची भूमी, विद्वान-पंडितांची, विद्यानगरी म्हणून पैठणची ओळख आहे. प्रतिष्ठान ही राजधानी असणाऱ्या सातवाहन राजवंशाच्या काळात पैठणी साडीच्या निर्मितीला सुरुवात झाली, असा ऐतिहासिक ग्रंथात उल्लेख आढळतो. पैठणी साडीची निर्मितीच प्रामुख्याने भारतातून परदेशात निर्यात करण्यासाठी आणि राजकोषात भर घालण्यासाठी झाली. भारतीय वीणकाम, वस्त्राचा पोत, रंगसंगती, नक्षीकाम टिकाऊपणा साडी नेसण्याची पद्धत या सर्व गोष्टी विदेशी ग्राहकांना आकर्षित करत.

खर्चाचा भार हा एकावरच का?

कोळी समाजात दिवसेंदिवस बस्त्याची प्रथा वाढत आहे. त्यामुळे वधूपित्याच्या आर्थिक अडचणी वाढतात. लग्नामुळे दोन कुटुंबे एकत्र येतात असे म्हटले जाते, मात्र लग्नाच्या खर्चाचा भार हा एकावरच का? असा सवाल करत बस्त्याची प्रथा थांबविण्याची मागणी करणारा ठराव काही वर्षांपूर्वी कोळी समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात मंजूर करण्यात आला होता. मात्र, हल्ली नवरा आणि नवरीच्या बाजूनं अर्धा अर्धा खर्च केला जातो.