देशात सध्या इलेक्ट्रिक कारची मागणी वाढते आहे. अनेक लोकांचा कल हा इलेक्ट्रीक कार किंवा दुचाकी यांची खरेदी करण्याकडे असतो. इलेक्ट्रिक कार किंवा दुचाकी वाहनं ही पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत महाग आहेत. आपण जाणून घेऊ की किंमत जास्त असली तरीही कार चालवण्याचा खर्च कमी कसा आहे आणि इलेक्ट्रिक कारची बॅटरी किती काळ टिकते?
किती असतं बॅटरीचं आयुष्य?
विविध कंपन्या विविध दावे करतात. मात्र इलेक्ट्रिक कारची ‘बॅटरी लाईफ’ सरासरी आठ ते दहा वर्षे इतकं आहे. समजा किलोमीटरमध्ये समजून घ्यायचं असेल तर सुमारे १ लाख ते १ लाख ५० किमी पर्यंत ही बॅटरी चालू शकते. अर्थात ती चार्ज करावी लागतेच कारण हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की कुठलीही बॅटरी कायमस्वरुपी टिकत नाही. तुम्ही इलेक्ट्रिक कार घेतली आणि ती वर्षभर उभी ठेवली तरीही एक दिवस असा येणार आहेच की तुम्हाला तिची बॅटरी बदलावी लागेल.
इलेक्ट्रिक कारमध्ये कुठल्या बॅटरीचा वापर होतो?
सध्या इलेक्ट्रिक कारमद्ये लिथियम आयन बॅटरी वापरली जाते. स्मार्टफोन, लॅपटॉप आणि तत्सम इलेक्ट्रॉनिक गॅझेट्समध्येही अशाच प्रकारची बॅटरी वापरलेली असते. कारची क्षमता वेगवेगळी असते त्यानुसार बॅटरी वापरली जाते आणि चार्जिंगचा वेळ निश्चित केला जातो. topgear.com या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार कुठल्याही इलेक्ट्रिक कारची बॅटरी ही दीर्घकाळ टिकण्याच्या दृष्टीनेच तयार केलेली असते.
बॅटरीची देखभाल करणं आवश्यक का?
जास्त उष्णता किंवा जास्त थंडी याचा कारच्या बॅटरीवर परिणाम होतो
कारची बॅटरी संपूर्ण चार्ज करु नका किंवा संपूर्ण डिस्चार्ज होईपर्यंत वाटही पाहू नका.
२० टक्क्यांपेक्षा कमी बॅटरी असेल तर चार्जिंग करा. मात्र ८० टक्क्यांपेक्षा जास्त चार्जिंग नको. कारण ८० टक्क्यांपर्यंत चार्जिंग ठेवणं हे योग्य मानलं गेलं आहे.
कार नेहमी फास्ट चार्जरने चार्ज केल्यास बॅटरीचं आयुष्य कमी होऊ शकतं. त्यामुळे इलेक्ट्रिक कार वापरत असाल तर या गोष्टींची काळजी जरुर घ्या.